संयुक्त कुटुंबाने उभारला एकात्मिक शेती व्यवस्थापनाचा आदर्श

बोराळे (जि. नाशिक) येथील राजपूत कुटुंबीयांची निर्यातक्षम केळीची बाग.
बोराळे (जि. नाशिक) येथील राजपूत कुटुंबीयांची निर्यातक्षम केळीची बाग.

नाशिक जिल्ह्यातील बोराळे (ता. नांदगाव) येथे राजपूत कुटुंबाची ४० एकर शेती आहे. दुष्काळी स्थितीत ठिबकद्वारे क्षेत्र ओलिताखाली आणले. केळी, कांदा, कापूस, ऊस आदी नगदी पिकांची निवड केली. केळीची निर्यातही सुरू केली. तीस गायींच्या संगोपनातून दूध, शेणखत व पूरक उत्पन्नाची सोय केली. मोठे कुटुंब व त्यातील प्रत्येकाने वाटून घेतलेली जबाबदारी, कष्ट व चोख व्यवस्थापन याद्वारे शेतीत भक्कम आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत झाली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील बोराळे (ता. नांदगाव) हे जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर गिरणा नदीच्या काठावरील गाव आहे. येथील राजपूत कुटुंबामध्ये १५ सदस्य आहेत. संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आहे. सन १९८० च्या दशकात दादाभाऊ दगाजी राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबाची पारंपरिक शेती बागायती झाली. सध्या नव्या पिढीतील नितेंद्र शिक्षक आहेत. मात्र, दिवसभरातील नोकरी सांभाळून सकाळी व संध्याकाळी ते नेमाने शेती कसतात. लहान चुलतभाऊ बलरामसिंग मार्केटिंग, निर्यात, विक्री या जबाबदाऱ्या सांभाळतात. नितेंद्र यांचे वडील साहेबराव, मोठे काका भिलासाहेब,आत्येभाऊ सुवर्णसिंग हे मदत करतात.  

पीक पध्दतीची निवड  केळी व्यवस्थापन 

  •  सन १९८४ पासून केळीची लागवड. दरवर्षी ८ ते १५ एकर क्षेत्र.   
  •  संपूर्ण क्षेत्रावर ठिबकसिंचन.
  •  उपलब्ध पाण्याचा गरजेनुसार वापर करून अधिक पिके कशी घेता येतील यासाठी पाणीव्यवस्थापन.
  •  परिसरात वीजपुरवठा करण्यात तांत्रिक अडचणी. अशावेळी ट्रॅक्टरचलित जनरेटरच्या माध्यमातून सिंचन. 
  •  शेती वेगवेगळ्या ठिकाणी विभागली आहे. प्रत्येक ठिकाणी जमिनीचा पोत वेगळा. वाळू मिश्रित, काळी व पोयटा असलेली जमीन. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी शेणखताला अधिक प्राधान्य.
  •  केळीचे सोट, पाने, पिल, कोंब, गवत आदी घटक कुजवून त्यापासून कंपोस्ट खत.
  •  केळी लागवडीनंतर जमिनीत नत्राची वाढ व्हावी यासाठी आंतरपीक मूग पेरला जातो. मुगाची वाढ झाल्यानंतर तो केळीच्या दोन्ही रांगेमध्ये नांगरून दाबून दिला जातो. त्याद्वारे कंपोस्ट 
  • खत व नत्र पुरवठा संतुलित प्रमाणात.
  •  रासायनिक खतांचा वापर गरजेनुसार. 
  •  उत्पादन- एकरी ३५ ते ४० टन.
  •  विक्री- व्यापाऱ्यांमार्फत सोलापूर, मुंबई, पंजाब, अमृतसर, दिल्ली आदी ठिकाणी.
  • वेफर्स व्यावसायिकांनाही देखील विक्री.
  •  स्थानिक दर- ९ ते १३ रुपये प्रतिकिलो.   
  •  कटाईची जबाबदारी व्यापाऱ्यांकडेच. त्यामुळे मजुरी कमी होते. 
  • केळी निर्यात  

  •  केळी निर्यातीची ऑर्डर ऑनलाइन किंवा थेट संपर्कातून मिळवण्यात येते.
  •  मागणीनुसार आगाऊ रक्कम प्राप्त झाल्यानंतर काढणी. 
  •  निर्यातीच्या निकषांनुसार केळीचे उत्पादन. हिरव्या रंगाचे असताना १८ ते २० सेंमी लांब व ३५ मिमी रुंद आणि १४० ते १५० ग्रॅम वजनाचे फळ झाल्यानंतर कटाई. त्यानंतर साफ करून पॅकहाउसमध्ये आणली जाते.  निर्यातीच्या निकषांप्रमाणे तुरटीच्या पाण्यात धुऊन घेतली जाते. हाताळणी व प्रतवारी होते.  यासाठी पश्चिम बंगाल राज्यातील मनुष्यबळ. त्यानंतर केळीला लेबलिंग.
  •  मागणीप्रमाणे १८.५ किंवा १३.५ किलो वजनाच्या बॉक्‍समध्ये १०० गेजच्या पॉलिथीन पिशव्यांमध्ये पॅकिंग करून हवाबंद केले जाते. 
  • कापसाचे हुकमी पीक 

  • फेरपालट करून केळीचा हंगाम संपल्यानंतर १२ ते १५ एकरांवर ठिबक सिंचनावर पूर्वहंगामी कापसाची लागवड असते. चालू वर्षीच्या पिकाला फूललधारणा चांगली असून बोंडे लागली आहेत. पुढील महिन्यात कापूस वेचणीला सुरवात होईल. एकरी १० ते १५ क्विंटल उत्पादन (एका वेचणीचे) दरवर्षी मिळते. 
  • कांदा कपाशीनंतर कांदा घेण्यात येतो. त्याचे एकरी २० टनांपर्यंत उत्पादन मिळते. चाळीत कांदा साठवला जातो. त्यामुळे बाजारपेठेतत्याला चांगला दर मिळतो.  

    उसाचा वापर चाऱ्यासाठी  जनावरांसाठी स्वतंत्र पाच एकरांत चारापिके घेतली जातात. ज्यामध्ये शाळू, मका असतोच. शिवाय ऊसही चारा म्हणूनच घेतला जातो व त्याची विक्री केली जाते. त्याचे एकरी ६० टनांपर्यंत उत्पादन मिळते. सध्या चाऱ्याला ३८०० रुपये प्रतिटन दर सुरू असल्याचे नितेंद्र यांनी सांगितले.  जनजागृतीसाठी पुढाकार  भिलासाहेब हे भारतीय कापूस महामंडळातून खरेदी अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. कापूस खरेदी विक्रीचा त्यांना दांडगा अनुभव आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या हित जोपासण्यासाठी त्यांनी चाळीसगावला बदली करून घेत संघटितपणे कापसाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना जागृत केले. कापूस उत्पादकांना अधिक दर देण्यासाठी तसेच गैरव्यवहार होऊ नये यासाठी त्यांचा पुढाकार असतो. गावात सर्वांशी स्नेहाचे संबंध जोपासत शेतीविकासाला हे कुटुंब अधिक प्राधान्य देते.  कृषी शिक्षणाचा वसा  भिलासाहेब १९७९ साली कृषी पदवीधर झाले. पुढील पिढीचे बलरामसिंग देखील कृषी पदवीधर झाले. त्यांनी कृषी व्यवसाय व्यवस्थापन शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. आफ्रिका, दुबई, थायलंड, इराण, इराक आदी देशांत नोकरीच्या माध्यमातून शेतमाल निर्यातीचा अभ्यास केला. याच बळावर २०१७ सालापासून कृषी निर्यातीत वाटचाल सुरू केली.

    राजपूत यांच्या शेतीतील ठळक बाबी 

  •  शेतीत संपूर्ण यांत्रिकीकरण
  •  बहुपीक पद्धतीचा अवलंब व पीक फेरपालट
  •  कुटुंबकेंद्रित शेतीकामांचे नियोजन 
  •  शेती जमा खर्चाचे सर्व वार्षिक ताळेबंद
  •  परदेशात निर्यातीचे प्रयत्न 
  •  व्यवहार धनादेश, ऑनलाइन पद्धतीने. गरजेनुसार रोखीने व्यवहार
  • पशुपालनाची जोड 

  •  शेतीला पूरक म्हणून गोपालन केले आहे. सध्या जातिवंत देशी व संकरित सह ३० गायी आहेत.
  •  घरच्यापुरते दूध ठेऊन उर्वरित १० ते १५ लिटर दुधाची २४ ते २८ रुपये प्रतिलिटर दराने विक्री होते. गावातील आर्थिक कमजोर कुटुंबाना अत्यंत कमी दरात देखील दूध दिले जाते. 
  •  जनावरांपासून २५ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्याचा वापर शेतीत होतो. 
  • -नितेंद्र राजपूत, ९६०४०३९६९३,  

    -बलराम राजपूत ८३२९४६२२०४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com