agriculture news in marathi success story of konewadi village from aurangabad district | Agrowon

उपक्रमशील शेतीतून प्रगतीकडे...

संतोष मुंढे
शुक्रवार, 4 डिसेंबर 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील मात्र जालना जिल्ह्याच्या सीमेलगत डोंगरांच्या कुशीत वसलेलं कोनेवाडी हे बदल स्वीकारून प्रगतीसाठी धडपडणारं गाव आहे. शेती, पूरक उद्योग, विक्री व्यवस्था, पीक पद्धतीत सुधारणा करीत गावानं विकासाला चालना दिली आहे.  
 

औरंगाबाद जिल्ह्यातील मात्र जालना जिल्ह्याच्या सीमेलगत डोंगरांच्या कुशीत वसलेलं कोनेवाडी हे बदल स्वीकारून प्रगतीसाठी धडपडणारं गाव आहे. शेती, पूरक उद्योग, विक्री व्यवस्था, पीक पद्धतीत सुधारणा करीत गावानं विकासाला चालना दिली आहे.  

औरंगाबाद जिल्ह्यातील सुमारे १३०० लोकसंख्येच्या कोनेवाडी गावाचे लागवडीलायक क्षेत्र जवळपास ३८२ हेक्‍टर आहे. वनाखालील क्षेत्र १७५ हेक्‍टर आहे. कपाशी, बाजरी, तूर ही गावची प्रमुख पारंपरिक पिके आहेत. अलीकडील वर्षांत सोयाबीन, मका, रब्बी ज्वारी, हरभरा, गहू आदी पिके शेतकरी घेतात. काही शेतकरी १९८५ पासून कांदा व अन्य भाजीपाला बीजोत्पादनातही काम करतात.

गावातील शेती दृष्टिक्षेपात

 • भाजीपाला पिकांत विविधता.  
 • फळपिकांखाली क्षेत्र- २५ हेक्‍टर
 • शंभरावर विहिरी, १५ सिमेंट बंधारे, १५ मातीबांध, चार पाझर तलाव, एक लघु प्रकल्प 
 • सुमारे १०० शेतकरी गटशेतीशी जोडलेले. त्यात निसर्ग राजा शेतकरी मंडळ, ‘हरितक्रांती’,
 • सरस्वती महिला शेतकरी गट, ‘सह्याद्री’, ‘लोकसेवा’ आदींचा 
 • महिला मासिक बचत करून कुटुंबाचे अर्थकारण सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्नशील. 

वृक्षलागवड, जलसंधारण
डोंगरांवर सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून वृक्षलागवड केली जात आहे. पाणलोट विकासकामांमधून गावालगतच्या ओढ्यांवर ३० माती व सिमेंट बंधारे झाले. त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी वाढून हंगामी सिंचनाची सोय झाली. कपाशीसह बहुतांश पिके सूक्ष्म सिंचनाखाली आली आहेत. दहा शेततळ्यांद्वारे शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायावर भर दिला आहे. काहींचे मासे विक्रीसाठी तयार आहेत. 

पूरक उद्योगाची धरली कास
काही वर्षांपूर्वी गावातील प्रत्येक कुटुंबाकडे शेळी व मेंढी संगोपन व्हायचे. आता ते कमी करून दुग्ध व्यवसाय व परसबागेतील कुक्कुटपालनाची कास धरली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची ९५ टक्के संख्या असलेल्या कोनेवाडीत पूरक उद्योग गावाच्या अर्थकारणाला गतिमान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावीत आहे. 

शेळीपालन

 • सुमारे ९० कुटुंबांकडे शेळीपालन. घरटी पाचपासून ते वीसच्या पुढे शेळ्यांचा सांभाळ 
 • बोकडांची विक्री अडचणीचा काळात करून आर्थिक गरज भागत असल्याने प्रत्येक कुटुंब शेळीपालन करण्याला प्राधान्य देते. 

दूध संकलन

 • दोन दूध संकलन करणाऱ्या डेअऱ्या.
 • दररोज २५० ते २७५ लिटर दूधसंकलन 
 • सुमारे ६० शेतकरी कुटुंबांकडे एक ते चार संकरित गायी
 • दुधासोबत शेणखतही उपलब्ध 

शेतीतील उपक्रमशीलता

 • ८ ते १० शेतकरी कंपन्यांच्या सहभागातून कांदा, कपाशी व अन्य पिकांचे बीजोत्पादन करतात. तुळशीराम भेरे यांनी त्यात १९८५ पासून सातत्य ठेवले.
 • गावातील शेतकऱ्यांनी सीताफळ लागवडीला प्राधान्य दिले आहे. नव्याने २० एकरांत लागवड झाली आहे. काहींनी तुती लागवडीला प्राधान्य दिले आहे. पोक्रा योजनेत गाव असल्याने फळबागा व भाजीपाला पिकांचे ‘क्‍लस्टर’ तयार करून थेट विक्रीला प्राधान्य देण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. 

कुक्कुटपालन 

 • सुमारे ३० कुटुंबांकडे परसबागेतील देशी कुक्कुटपालन    
 • कोंबडी व अंडी विक्रीतून दरदिवशी किमान उत्पन्न मिळण्याची सोय

शेतकरी बाजार 
पणन मंडळामार्फतच्या संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराच्या आयोजनासाठी निसर्गराजा गटाने पाच वर्षांपासून पुढाकार घेतला आहे. हा गट औरंगाबाद शहरात आठवड्यातील तीन बाजारांत सहभाग घेतो. आजघडीला सुमारे १३ गट प्रत्यक्ष बाजारात सहभागी होत असल्याचे बाजाराचे आयोजक व निसर्ग राजा शेतकरी मंडळाचे प्रमुख विलास भेरे सांगतात. या गटाने लॉकडाउनमध्ये मार्च ते नोव्हेंबरपर्यंत सुमारे ५७ लाख रुपयांची उलाढाल थेट फळे व भाजीपाला विक्रीतून केली. 

शेतकरी उत्पादक कंपनी
जानेवारी २०२० मध्ये गावात कोनेवाडी फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली आहे. आसपासच्या गावांतील १८० शेतकरी त्यासोबत जोडले आहेत. पाचशे सभासद जोडण्याचे लक्ष आहे. कृषी निविष्ठा वाजवी दरात उपलब्ध करणे, शेळीपालन, दुग्ध व्यवसायास प्रोत्साहन, त्यासाठी प्रशिक्षण- मार्गदर्शन, शेतीमालाची थेट विक्री, स्लॉटर हाउस उभारून बोकडाचे मांस उपलब्ध करणे आदी उद्दिष्टे ठेवून कंपनीचे कार्य सुरू आहे. 

प्रतिक्रिया
सन १९८५ पासून सूर्यफूल, भोपळा, कांदा, मिरची, वांगी, कपाशी आदींचे बीजोत्पादन केले. आजमितीला आठ ते दहा शेतकरी या उपक्रमात सहभागी आहेत.
— तुळशीराम भेरे, ९९२१७९२१३३ 
 
चार एकर शेतीला यंदा शेळीपालन, कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. सोळा मोठ्या शेळ्या व तेवढीच  पिले आहेत. माझ्यासह पाच ते सहा शेतकऱ्यांनी तुतीची लागवडही केली आहे. 
— तानाजी भोसले
 
आमची एकत्र कुटुंबाची १५ एकर शेती आहे. साडेअकरा एकर डाळिंब आहे. दोन शेततळी आहेत. धरण जवळ असल्याने विहिरीलाही पाणी बरे असते. नाशिक किंवा वाशी मार्केटला विक्री करतो.दोन वर्षांपूर्वी ८० रुपया प्रति किलोचा दर निर्यातक्षम डाळिंबाला दर मिळाला. 
— बाळाभाऊ भेरे

दहा शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रत्यक्ष पुणे दौरा करून थेट आठवडी बाजारांत विक्री व्यवस्थेला चालना दिली आहे.
— गजानन वाघ
उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ, औरंगाबाद

आम्हाला जमीन नाही. पूरक व्यवसाय एका शेळीपासून सुरू केला. आज २२ शेळ्या व ४० पिले आहेत. एका कोंबडीपासून सुरू केलेले कुक्कुटपालन ९० गावरान कोंबड्यांवर पोचले आहे.
— कौशल्याबाई पाराजी बोरुडे

तंत्रज्ञानाचा स्वीकार, आंतरपिकांना प्राधान्य, महोगनी वृक्षलागवड, बैलांचा व्यापार ही देखील गावची अन्य वैशिष्ट्ये आहेत. उद्योगी राहण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. 
— विलास भेरे, ८३७८०८३५७१ 
अध्यक्ष, निसर्ग राजा शेतकरी मंडळ , 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
बीजमाता राहीबाई पोपेरे करणार लोकसभा...अकोले, जि. नगर : पारंपरिक बियाण्यांची जोपासना...
ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर नाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड...
सोयाबीन विक्रमी टप्पा गाठेल कमी उत्पादन, चांगली निर्यात आणि वाढलेला वापर हे...
कृषी पंढरीतील यात्रेची उत्सुकता शिगेला माळेगाव, बारामती ः येथील कृषी पंढरीत आजपासून (ता....
‘पोकरा’ अनुदानातून अनेक घटक वगळले पुणे : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (...
कृषी आयुक्‍त थेट बांधावर औरंगाबाद : कृषी विभागाच्या क्षेत्रीय भेट व आढावा...
ठिकठिकाणी ढगाळ वातावरण पुणे ः मागील दोन दिवसांपासून अरबी समुद्राच्या...
समविचारी शेतकऱ्यांचे राष्ट्रीय संघटन...नागपूर ः शेती प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी...
दुष्काळी स्थितीतही द्राक्षाने दिले...सांगली जिल्ह्यातील वायफळे (ता. तासगाव) येथील...
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...