नैसर्गिकरित्या पिकवलेल्या केशर आंब्याचा ब्रॅण्ड

शेतीची कितीही आवड असली तरी नोकरीत व्यस्त असताना अनेकवेळा त्यास पूर्ण न्याय देणे शक्य होत नाही. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर (ता.अक्कलकोट) येथील विजयकुमार बरबडे अलिकडेच कृषी विभागातून सेवानिवृत्त झाले. आता पूर्णवेळ लक्ष देताना शास्त्रीय व तंत्रशुद्ध पद्धतीने शेती विकसित करण्यास सुरुवात केली आहे. नैसर्गिकरीत्या आंबा पिकवून त्याचा विजयराज फार्मफ्रेश ब्रॅण्ड नावारूपाला आणला आहे. व्यापारी, मॅाल, मार्केटवर भिस्त न ठेवता थेट ग्राहक पद्धतीने विक्रीही यशस्वी केली आहे.
vijaykumar barbade's mango farm
vijaykumar barbade's mango farm

शेतीची कितीही आवड असली तरी नोकरीत व्यस्त असताना अनेकवेळा त्यास पूर्ण न्याय देणे शक्य होत नाही. सोलापूर जिल्ह्यातील जेऊर (ता.अक्कलकोट) येथील विजयकुमार बरबडे अलिकडेच कृषी विभागातून सेवानिवृत्त झाले. आता पूर्णवेळ लक्ष देताना शास्त्रीय व तंत्रशुद्ध पद्धतीने शेती विकसित करण्यास सुरुवात केली आहे. नैसर्गिकरीत्या आंबा पिकवून त्याचा विजयराज फार्मफ्रेश ब्रॅण्ड नावारूपाला आणला आहे. व्यापारी, मॅाल, मार्केटवर भिस्त न ठेवता थेट ग्राहक पद्धतीने विक्रीही यशस्वी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे विजयकुमार बरबडे यांची वडिलोपार्जित १८ शेती आहे. एमएस्सी ॲग्री असलेले बरबडे यांनी ३३ वर्षे कृषी विभागात अधिकारी, ग्रामीण विकास यंत्रणेत उपसंचालक व ‘आत्मा’ मध्ये प्रकल्प संचालक अशा विविध पदांवर काम केले. विशेषतः विस्तार कार्यात मौलिक कामगिरी बजावली. शेतीची जोपासलेली आवड

  • मागील वर्षी बरबडे सेवानिवृत्त झाले. शेतीची आवड असूनही नोकरीतील व्यापामुळे फारसे लक्ष देता येत नव्हते. त्या काळात पत्नी सौ. राजश्री शेती पाहत. आता मात्र निवृत्तीनंतर शेतीची आवड जोपासणे शक्य झाले आहे. धनंजय व धनराज ही दोन्ही मुले नोकरीत आहेत. आठ वर्षांपूर्वी बरबडे यांनी दोन एकर केशर आंब्याची बाग करण्याचे ठरवले. वर्षभरापूर्वी पाच एकर नव्याने लागवड करीत एकूण बाग सात एकरांपर्यंत नेली आहे. खरे तर निवृत्तीनंतरचे आयुष्य म्हणजे स्वतःसाठी, कुटुंबासाठी व्यतित करण्याचा काळ. पण आपल्या वडिलोपार्जित शेतीतच काहीतरी करण्याचा ध्यास बरबडे यांनी घेतला.
  • वयाची ६० वर्षे ओलांडली आहेत. मात्र न थकता ते मोठ्या उत्साहाने शेतीत राबतात. आंब्याच्या उत्पादन ते मार्केटिंगपर्यंत सर्व पातळ्यांवर स्वतःशीच स्पर्धा करीत काम करतात. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात.
  • नियोजनबद्ध शेती

  • आंबा हे मुख्य पीक निवडले आहे. सोबत दोन एकर चिंच आहे. बाकी खरिपात तूर, रब्बीत गहू, हरभरा आदी पिके असतातच. आंब्याच्या जुन्या बागेतील लागवड १५ बाय १५ फूट आहे.
  • आता नव्या पाच एकरांत सघन पध्दतीचा वापर करताना ते १२ बाय १० फूट ठेवले आहे.
  • साधारण मेमध्ये आंब्याची उतरणी पूर्ण होते.
  • फळांची प्रतवारी केली जाते. बागेची चाळणी होते.
  • ट्रॅक्टरच्या साह्याने बागेतील आंतरमशागत व संपूर्ण बाग स्वच्छ केली जाते.
  • अनावश्यक फांद्या काढून हलकी छाटणी केली जाते.
  • जून-जुलैमध्ये पाऊस झाल्यानंतर प्रतिझाड १५ टोपली शेणखत वापरण्यात येते.
  • त्याचवेळी सुपर फॅास्फेट, युरिया आणि पोटॅशचा प्रतिझाड अडीत ते तीन किलोचा डोस दिला जातो.
  • पुन्हा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हाच डोस असतो.
  • ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गरजेनुसार ठिबकद्वारे १९-१९-१९, १३-०-४६ आदींचा वापर होतो.
  • जानेवारीत फूलकिडे आणि भुरीचे रासायनिक नियंत्रण केले जाते.
  • जून ते डिसेंबरपर्यंत दर पंधरा दिवसातून एकदा तर जानेवारी ते मार्चपर्यंत दर आठ दिवसांनी पाणी दिले जाते.
  • फळांना आच्छादन सोलापूर भागात उन्हाची तीव्रता जानेवारी-फेब्रुवारीपासूनच जाणवण्यास सुरुवात होते. अशावेळी आंब्याला ‘सनबर्न’चा त्रास होतो. त्यावर उपाय म्हणून जुनी साडी किंवा वर्तमान पेपर आदी घटकांचे आच्छादन केले जाते. त्यामुळे डागरहित फळ मिळते व नुकसान टळते असा अनुभव आहे. पक्व आंब्यांची काढणी

  • साधारण मार्चमध्ये आंब्याची उतरणी सुरु होते. सुमारे ७५ टक्के आंबे पिकल्यानंतरच उतरणी होते. त्यापूर्वी विद्यापीठाची विशिष्ट पद्धत वापरली जाते. साध्या आणि मिठाच्या पाण्यात बुडवून त्याची पिकवणक्षमता तपासली जाते आणि मगच आंबे काढणीला घेतले जातात.
  • कोणत्याही प्रकारे रसायनांचा वापर न करता आंबे पिकवण्याचे तंत्र अवलंबले आहे. त्यासाठी गव्हाचे काड, उसाचे पाचट किंवा वर्तमानपत्राचा वापर केला जातो. गव्हाचे काड अंथरून त्यावर आंबे पसरून गोणपाट टाकले की पाच ते सहा दिवसांत आंबे पिकतात.
  • थेट ग्राहक तयार केले गेल्या तीन वर्षांत एकरी सव्वा ते दीड टन व यंदा त्यापुढे उत्पादन मिळाले आहे. किलोला १२० रुपये, १५० रुपये ते कमाल २०० रुपयांपर्यंत दर त्यांना मिळाला आहे. आपण पिकवलेला आंबा स्वतःच विकण्यावर बरबडे यांनी भर दिला आहे. आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांनी अनेक मित्र, परिचित व व्यापारीही जोडले. दरवर्षी ते हुरडा पार्टी किंवा जेवणाचा आनंद घेण्यासाठी परिचितांना आवर्जून बोलावतात. त्याचा फायदा ग्राहक तयार करण्यासाठी झाला आहे. यंदा कोरोना लॉकडाऊनमध्ये त्यांनी सुमारे अडीच टन आंब्याची थेट विक्री केली. दर्जेदार गुणवत्तेचा आंबा विजयराज फार्मफ्रेश हा आंब्याचा ब्रॅण्ड तयार केला आहे. ग्रेडिंग, पॅकिंग करून ते बॅाक्सद्वारे विक्री करतात. आंब्याची गुणवत्ता अत्यंत चांगली, आकार एकसमान, सुमारे २५० ते ३०० ग्रॅम वजनाचे फळ व अत्यंत उत्कृष्ट स्वाद अशा वैशिष्ट्यांमुळे ग्राहकांकडून आंब्यास मोठी मागणी असते. अडीच किलो बॉक्समध्ये सुमारे १० ते १२ आंबे बसतात. ग्राहकांच्या मागणीनुसार पॅकिंग करण्यात येते. यंदा स्वतःच्या कारमधून त्यांनी घरोघरी बॉक्स वितरित केले. मुख्य म्हणजे लॉकडाऊन काळात जवळपास सर्व कामे बरबडे दांपत्यानेच केली. संपर्क- विजयकुमार बरबडे- ८२७५२०७७९७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com