agriculture news in marathi Success story of marigold flower grower farmer from nashik district | Agrowon

झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीक

मुकुंद पिंगळे
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर,जि.नाशिक) येथील प्रयोगशील शेतकरी सुदाम काटे यांनी वर्षभर झेंडू लागवडीचे नियोजन केले आहे. वर्षभर टप्याटप्याने दोन एकरावर झेंडू आणि उर्वरित क्षेत्रावर हंगामी भाजीपाला पिकांची लागवड असते.

शहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर,जि.नाशिक) येथील प्रयोगशील शेतकरी सुदाम काटे यांनी वर्षभर झेंडू लागवडीचे नियोजन केले आहे. वर्षभर टप्याटप्याने दोन एकरावर झेंडू आणि उर्वरित क्षेत्रावर हंगामी भाजीपाला पिकांची लागवड असते. बाजारपेठेचा अभ्यास आणि पीक उत्पादनात सातत्य असेल तर शेती किफायतशीर होते, असा त्यांचा अनुभव आहे.

मोह (ता.सिन्नर,जि.नाशिक) येथील सुदाम एकनाथ काटे यांची आठ एकर शेती आहे. सुरवातीला पारंपारिक पिके असल्याने उत्पन्नाच्या अडचणी होत्या. यातून पुढे त्यांनी टोमॅटो लागवडीवर भर दिला; मात्र होणारे नुकसान, अधिकच्या उत्पादन खर्चामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी २०१४ सालापासून झेंडू लागवडीला सुरवात केली. 

पीक बदलाला सुरवात 
सुदाम काटे यांची आठ एकर शेती असून तीन ठिकाणी विखुरलेली आहे.  परिस्थिती बेताची असताना टप्याटप्याने शेती विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. या माध्यमातून टोमॅटो लागवडीचा निर्णय घेतला. मात्र खर्च आणि उत्पन्नाचे गणित जुळत नव्हते. या दरम्यान २०१४ साली परिसरातील प्रयोगशील शेतकरी अनिल ढेरिंगे यांनी झेंडू लागवड केली होती. त्यांचा सल्ला घेत सुदाम यांनीही झेंडू लागवडीचा प्रयोग करण्याचे ठरविले. लागवड ते विक्री पद्धती समजून घेतली आणि पुढे झेंडू हेच  मुख्य पीक झाले आहे.

झेंडू पिकात केली ओळख 
सुदाम काटे यांनी २०१४ साली झेंडू लागवडीस सुरवात केल्यानंतर पीक व्यवस्थापन समजून घेतले. यातून पुढे गुणवत्तापूर्ण फुलांचे उत्पादन ते घेऊ लागले. मात्र विक्री हे सर्वात मोठे आव्हान होते. यावर मात करण्यासाठी त्यांनी नाशिक मधील फुलविक्रेते, फूल सजावट व्यावसायिक यांच्याशी संपर्क करून वर्षभराचे कायमचे ग्राहक मिळविले. धुळे येथेही त्यांच्याकडून फुले जातात. हंगामनिहाय वर्षभर चार टप्यामध्ये दरवेळी दोन एकर झेंडू  आणि इतर सहा एकरात हंगामानुसार भाजीपाला,टोमॅटो, कलिंगड, खरबूज, कांदा लागवडीचे नियोजन त्यांनी ठेवले आहे. पीक फेरपालटीवर त्यांचा भर आहे. 

झेंडू लागवडीचे तंत्र

 • वर्षभर झेंडू लागवड करताना बाजाराची गरज ओळखून पिवळा व केशरी रंगाच्या झेंडूची लागवड. फुलांचा आकार, रंग आणि जातीला प्राधान्य. 
 • पिवळ्या रंगांमध्ये मोठी फुले आणि केसरी रंगात मध्यम आकाराच्या झेंडूची लागवड.
 • वर्षभराच्या नियोजनात मे, जुलै, ऑक्टोबर आणि मार्च महिन्यात दोन एकरावर झेंडू लागवड.
 • ४ फूट बाय २ फूट अंतरावर लागवड केल्याने फवारणी तसेच फुले तोडणी सोपी. योग्य अंतरामुळे पिकात हवा खेळती राहिल्याने रोपांची चांगली वाढ, फुलांचे दर्जेदार उत्पादन. ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत शक्य.
 • पावसाळ्यात सरी पद्धत आणि हिवाळा,उन्हाळ्यात मल्चिंग पेपरवर लागवड.
 • लागवडीपूर्वी शेणखताची पुरेशी मात्रा. वेळेवर लागवडीचे नियोजन. 
 • लागवडीपासून फुलधारणा कालवधीत खतांची योग्य मात्रा. कीड,रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक फवारणी.एकात्मिक पद्धतीने नियंत्रणावर भर.
 • ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांची मात्रा. गरजेनुसार दाणेदार खतांचा वापर.
 • फुलधारणा झाल्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर.
 • पीक फेरपालट पद्धतीने हंगामनिहाय क्षेत्र बदलून लागवड.
 • पाणी आणि मजुरांची बचत हाच एक उत्पन्नाचा भाग.
 • शेतमजुरांना हक्काचा वर्षभर रोजगार

फुलतोडणी आणि विक्री

 • लागवड ते काढणी हा चार ते पाच महिन्याचा कालावधी.
 • लागवडीनंतर दोन महिन्यानंतर फूल तोडणी सुरु.
 • स्वतः आणि किमान चार मजुरांकडून फुलांची दिवसभर तोडणी.
 • फुलांमध्ये पाणी असल्यास ती सुकवून क्रेटमध्ये भरणा. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत बाजारात विक्री.
 • मागणी अधिक असल्यास व्यापाऱ्यांकडून थेट  बांधावर खरेदी.
 • एकरी सरासरी १५० क्विंटल उत्पादनात सातत्य.२०१८ मध्ये अनुकूल हवामानामुळे एकरी ५०० क्विंटल उत्पादनाचा टप्पा. 
 • दररोज किमान २५० ते ३०० किलो फुलांची तोडणी आणि विक्री नियोजन.  
 • मागणीनुसार वर्षभरात 
 • सरासरी १० ते १५० रुपये  प्रति किलो दर.
 • दर हंगामात खर्च वजा जाता एकरी एक लाख उत्पन्नाचे टार्गेट.

लागवडपूर्व नियोजन 

 • वेळेवर रोपांची उपलब्धता.
 • शेणखताच्या उपलब्धतेसाठी गोपालन.
 • पूर्वमशागत ते लागवडी दरम्यान कामांसाठी स्व मालकीचा ट्रॅक्टर आणि  आवश्यक अवजारांची उपलब्धता.
 • स्वतः आणि पत्नी सौ.रंजना कष्टाने पीक नियोजन करतात. सुट्टीच्या दिवशी महेश आणि सार्थक या दोन्ही मुलांची मदत.

पाण्याचा काटेकोर वापर
काटे यांची शेती तीन ठिकाणी विभागलेली आहे. पाण्याची टंचाई असल्याने उन्हाळ्यात सिंचनासाठी अडचण यायची. हे लक्षात घेऊन त्यांनी एक विहीर, दोन कूपनलिका घेतल्या. पाणी साठवण्यासाठी घराजवळ दीड लाख लिटर क्षमतेची  टाकी बांधली आहे. ही टाकी उंचावर असल्याने  गुरुत्वाकर्षण पद्धतीने संपूर्ण क्षेत्रावर विद्युत पंपाशिवाय सिंचन करणे शक्य झाले आहे. संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन केले आहे. 

कष्टातून उभी केली शेती 

 • २००२ ते २०१० पर्यंत सुदाम काटे यांनी आयुष्यातील अत्यंत बिकट काळ अनुभवला. मात्र शून्यातून त्यांनी आपले विश्व निर्माण केले. पीक पद्धतीत बदल करताना पीककर्ज घेऊन त्यांनी शेती विकास केला. कर्ज घेतल्यानंतर त्याची वेळेवर परतफेड करून पत निर्माण केली.हा त्यांच्या व्यवहारातील आदर्श नमुना आहे. 
 • काटकसर करत कमावलेल्या पैशातून कुटुंबासाठी टुमदार बंगला बांधला.अलीकडेच ३६ गुंठे जमिनीची खरेदी केली. याचबरोबरीने दोन बहिणींची लग्ने आणि सध्या मुलांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा देण्यामध्ये कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. 

तेजी- मंदीचे जुळविले गणित 
सुदाम काटे यांनी फूल बाजारपेठेचा चांगला अभ्यास केला आहे. याबाबत ते म्हणाले की, वर्षभरातील ३६५ दिवसांपैकी ६५ दिवस तेजी,१०० दिवस मध्यम आणि २०० दिवस मंदी असते. मात्र वर्षभर मागणी पुरवठा साखळी संतुलित ठेवली आहे. तसेच दुकानदार,व्यापाऱ्यांशी व्यवहार जपल्याने बाजारात दराचा समतोल साधला जातो. नवरात्र,गणेशोत्सव, श्रावण व मार्गशीर्ष महिना, गुरुपौर्णिमा, लग्नसराई, दसरा-दिवाळी, नवीन वर्ष, गुढीपाडवा, अक्षयतृतीया, शिवजयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती असे  हंगामातील मुख्य व्यवसायाचे दिवस आहेत.

संपर्क- सुदाम काटे, ९८८१०७७६३०


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...