agriculture news in marathi success story of Nashik district farmer | Agrowon

प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्य

मुकुंद पिंगळे
सोमवार, 6 एप्रिल 2020

नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख यांच्या कुटुंबीयांची १६ एकर शेती आहे. शेतीमध्ये बदलत्या तंत्रज्ञानासोबत प्रयोगशील होत त्याला नियोजन, व्यवस्थापन आणि व्यावसायिकतेची जोड दिली असून, त्यातून संपन्नता मिळवली आहे. विशेष म्हणजे एकत्रित कुटुंबपद्धतीतून प्रत्येकाच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळाली आहे. एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी प्रयोगशीलतेमुळे आर्थिक स्थिरता साध्य करण्यात यश मिळाले आहे.

नाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख यांच्या कुटुंबीयांची १६ एकर शेती आहे. शेतीमध्ये बदलत्या तंत्रज्ञानासोबत प्रयोगशील होत त्याला नियोजन, व्यवस्थापन आणि व्यावसायिकतेची जोड दिली असून, त्यातून संपन्नता मिळवली आहे. विशेष म्हणजे एकत्रित कुटुंबपद्धतीतून प्रत्येकाच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळाली आहे. एकाच पिकावर अवलंबून राहण्याऐवजी प्रयोगशीलतेमुळे आर्थिक स्थिरता साध्य करण्यात यश मिळाले आहे.

१९९० च्या सुमारास शिवाजी देशमुख यांचे वडील शंकर देशमुख यांनी उपलब्ध पाण्यावर २ एकर क्षेत्रावर द्राक्षबागेची लागवड केली होती. तेव्हापासून आजवरच्या या तीन दशकांमध्ये द्राक्ष शेतीतील अनेक स्थित्यंतरे या कुटुंबाने पाहिली. बदलत्या काळासोबत परिश्रम वाचवणारे व कामास गती देणारे तंत्रज्ञान त्यांनी सातत्याने आत्मसात केले आहे.

सुरवातीच्या काळात सिंचन व्यवस्था नसल्याने पारंपरिक पिकांवर अवलंबून राहावे लागे. १९९१ मध्ये या परिसरातून आळंदी कालवा गेल्याने सिंचनाशी सोय झाली. सोबतच कूपनलिका, विहीर खोदून पाण्यासाठी शाश्वतता मिळवली. सूक्ष्मसिंचनाचा अवलंब संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली आणले. शेतीसाठी आवश्यक यंत्रामध्ये ट्रॅक्टरसह अत्याधुनिक फवारणी यंत्रे, विविध यंत्र सामग्री त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कष्ट कमी झाले, कामाला वेग आला, स्वयंपूर्णता साधली असून, खर्चात मोठी बचत झाली आहे.

द्राक्ष शेतीत आणली प्रयोगशीलता

 • सुरुवातीला १९९५ सालापर्यंत द्राक्ष लागवड दोन एकर क्षेत्रावर होती. याच दरम्यान पहिली द्राक्ष निर्यात झाली. मात्र कुटुंब विभक्त झाल्यानंतर वडील शंकर यांच्याकडून जबाबदाऱ्या मुलांकडे आल्या. शिवाजी यांनी आपल्या भावंडांसोबत शेतीची जबाबदारी स्वीकारली. १९९९ च्या दरम्यान त्यांनी नव्याने ६ एकर क्षेत्रावर द्राक्ष लागवड केली.
   
 • पुढे पारंपारिक मांडव पद्धतीनंतर Y व H प्रकारचे मांडवाची उभारणी त्यांनी स्वीकारली. २००२ सालापासून डॉगरीजवर रूटस्टॉक पद्धतीने लागवड केली. गुणवत्तापूर्ण उत्पादनासह उत्पादकता वाढीवर त्यांनी विशेष भर दिला आहे. आजमितीला त्यांच्याकडे ९ एकर जुनी, दोन एकर नवी द्राक्ष लागवड असून, आणखी दोन एकर द्राक्षबागेची लागवड प्रस्तावित आहे. यासाठी काही शेती करार पद्धतीने घेतली आहे.

विविध द्राक्ष वाणांची लागवड  

 • थॉमसन, सोनाका, माणिकचमन, तास इ गणेश, आरा

द्राक्ष निर्यातीसाठी विशेष प्रयत्न

 • स्थानिक बाजारपेठेपेक्षा निर्यातीमधून उत्पन्न अधिक मिळते, ही बाब ओळखून द्राक्ष निर्यातीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यासाठी आवश्यक ती छाटणी, खत व पाणी व्यवस्थापन, कीडनाशकांच्या फवारण्या यांचे सुयोग्य नियोजन केले जाते. ते सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीसह २००३ सालापासून निर्यात करत आहेत. त्यांच्या तज्ज्ञांकडून आवश्यक ते तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध होते.
   
 • आता एकूण द्राक्ष उत्पादनांपैकी ७५ टक्के निर्यात होते, तर २५ टक्के माल स्थानिक बाजारात विकला जातो. मोबाईल प्रणालीद्वारे बाजारपेठेची अद्ययावत माहिती मिळवून नियोजन केले जाते. त्यांचा माल युरोप, रशिया, बांगलादेश, दुबई येथे पाठवला जातो.

असे आहे वार्षिक नियोजन

 • एप्रिल - खरड छाटणी
 • सप्टेंबर - गोडी बहार छाटणी
 • जानेवारी- फेब्रुवारी - द्राक्ष काढणी

हंगामनिहाय कामाचे स्वरूप

 • मजुरांच्या उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने दोन एकरच्या फरकाने बागांची छाटणी करण्यात येते.
 • जमीन मुरमाड व खडकाळ आहे. पिकांच्या विविध अवस्थांमध्ये मृदा, पाणी व देठ परीक्षणानुसार खत व पाण्याचे व्यवस्थापन केले जाते.
 • पाण्याच्या बचतीसाठी, जमिनीमध्ये आवश्यक आर्द्रता टिकवण्यासाठी जैविक मल्चिंग केली जाते.
 • जैविक कर्ब वाढण्यासाठी शेणखताचा एकरी १२ टन वापर केला जातो. द्रव्य जिवाणू खते दिली जातात.

विविध पिकाखालील क्षेत्र

 • द्राक्ष लागवड - १३ एकर
 • स्ट्रॉबेरी - ३० गुंठे
 • गिलके - १ एकर
 • गहू - ३० गुंठे
 • आंबा (केसर, हापूस, राजापुरी, बदाम) - १० गुंठे
 • २ एकर द्राक्ष लागवड प्रस्तावित

कामाचे नियोजन करून अतिरिक्त खर्चात बचत 

 • शेतीच्या एकूण वार्षिक खर्चात काटकसर करून बचत करणे, हे देशमुख यांचे वैशिष्ट्य आहे.
 • नियोजन करून, त्यानंतर वेळच्या वेळी अचूक व्यवस्थापन करण्यावर त्यांचा भर असतो.
 • कृषीनिष्ठा व खतांची खरेदी एकत्रित घाऊक पद्धतीने केल्याने त्यांची १० ते १२ टक्क्यांपर्यंत बचत होते.
 • घरातील प्रत्येक सदस्य शेतीमध्ये काम करतो. पर्यायाने बाहेरून अत्यंत कमी मजूर घ्यावे लागतात. त्या खर्चात बचत होते.

थेट विक्रीतून अधिक उत्पन्नासाठी प्रयत्न
दरवर्षी घरगुती स्वरूपात बेदाणे निर्मिती केली जाते. हा माल थेट उत्पादक ते ग्राहक पद्धतीने विकला जातो. त्यामुळे दोन पैसे अधिक मिळतात. व ग्राहकांची साखळी वाढत जाते असे ते आवर्जून सांगतात. चालू वर्षी त्यांनी शेतातील स्ट्रॉबेरी थेट विकल्याने त्यांना ६० रुपये सर्वसाधारण दर मिळाला. शिवाजी यांचा थोरला मुलगा प्रतीक याने संपूर्ण व्यवस्थापन करीत थेट विक्रीचे नियोजन केल्याने उत्पन्नात भर पडली.

शेतीकामाचे व्यक्तिनिहाय विभाजन 

 • एकत्र देशमुख कुटुंबामध्ये शिवाजी हे कुटुंबप्रमुख असून, त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ अनिल व संपत यांचीही महत्त्वाची साथ असते.
 • आर्थिक नियोजनाची जबाबदारी शिवाजी यांच्याकडे आहे. पीकसंरक्षण व पाणी व्यवस्थापन ही जबाबदारी अनिल यांच्याकडे आहे. शेतातील मजूर, मशागती व इतर कामे ही कामे संपत पाहतात. यासह नवीन पिढीतील प्रतीक, तुषार हेही शेतीकामाला मदत करू लागले आहेत.
 • नियोजनानुसार प्रत्येकजण आपली जबाबदारी ओळखून कामे केली जातात. कुटुंबाची एकी व कामाचे विभाजन ही खरी त्यांची ताकद ठरली आहे.

करार शेतीचा अवलंब

 • चालू वर्षीच्या २०१९ -२० च्या हंगामात सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून ३० गुंठे क्षेत्रावर नाबेला व कॅमरोला वाणाच्या स्ट्रॉबेरी लागवड केली आहे.
 • करार पद्धतीने लागवड केल्यामुळे रोपे, लागणारे साहित्य, निविष्ठा व तांत्रिक मार्गदर्शन त्यांना मिळत असते. त्यामुळे चालू वर्षी काढणी सुरु झाल्यापासून या क्षेत्रावर ४ टनापर्यंत उत्पादन घेतले आहे.
 • मागणीप्रमाणे कंपनीच्या किरकोळ विक्रीसाठी हा माल पाठवला जातो. तर उरलेल्या मालाची स्वतः विक्री करतात. या फळांची अजून काढणी सुरु आहे. यापूर्वीही त्यांनी हा प्रयोग स्वतः १९९५ साली केला होता.

प्रयोगातून आर्थिक धोके कमी करण्याकडे कल

 • २००२ साली नवीन द्राक्ष बाग लागवडीमध्ये टरबूज, खरबूज ही आंतरपिके घेण्यास सुरुवात केली. यातून जागेचा योग्य उपयोग झाला. त्यानंतर सातत्याने स्ट्रॉबेरी, कारली, गिलके, कोबी, फ्लॉवर यासह परदेशी भाज्यांमध्ये ब्रोकोली, चायनीज कॅबेज यांची लागवड व प्रयोग केले आहेत. द्राक्ष शेती ही अत्यंत संवेदनशील असून, हवामानातील कोणत्याही आपत्तीमध्ये बसणारी आर्थिक झळ मोठी असते. अशा वेळी ही अन्य पिके अत्यंत महत्त्वाची ठरतात. त्यातून मिळणारे उत्पन्नातून आमच्या मोठ्या कुटुंबाच्या खर्चाची तजवीज होत असते, असे शिवाजी देशमुख म्हणतात.
   
 • चालू वर्षी २०१९-२० च्या हंगामात अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादन घटले आहे. मात्र या परिस्थितीत ४०० क्विंटल उत्पादन घेण्यात ते यशस्वी झाले. प्रतिकिलो ४० ते ५० रुपये प्रमाणे त्यांनी विक्री केली. तसेच ज्या दोन एकर बागेत द्राक्ष लागवड केली आहे. त्या उभारलेल्या बागेत उपलब्ध मांडवाचा वापर करून गिलके लागवड करून ७०० क्रेट (प्रती क्रेट सरासरी १५ किलोप्रमाणे) उत्पादन घेतले आहे. त्यास सरासरी १५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे.

शेतीच्या उत्पन्नातून १० टक्के रक्कम बचत

 • गरजेनुसार बँकेकडून कर्ज घेतले जाते. मात्र, वर्षभर नियमित कर्जाची परतफेड करण्याला प्राधान्य दिले जाते.
 • शेतीच्या वार्षिक उत्पन्नातून दरवर्षी १० टक्के रक्कम बाजूला ठेवली जाते. या रकमेचा वापर आपत्कालीन खर्च, वैद्यकीय खर्च, गरज पडल्यास शेती खर्चामध्ये केला जातो. उत्पादनातील वाढ, उत्पन्न वाढीसाठी विविध प्रयत्न यासोबत बचतीलाही प्राधान्य दिले जाते. परिणामी एक प्रकारचे आर्थिक स्थैर्य कुटुंबाने मिळविले आहे.
 • कुटुंबामध्ये एकूण १४ सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याचा विमा उतरविला आहे. उत्पन्नातून विशेष तरतूद करून दरवर्षी हप्त्याची रक्कम भरली जाते.
 • नव्या पिढीसाठी उच्चशिक्षण ः देशमुख कुटुंबातील मुलांनी उच्चशिक्षण घेतले आहे. प्रतिक हा कृषी अभियांत्रिकी शाखेत पदवीधर असून, तुषार हा कृषी शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. दीया व प्रज्वल हे दोघे अनुक्रमे विज्ञान व वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहेत.

संपर्क - शिवाजी देशमुख, ९८२२६५१२६३
प्रतिक देशमुख, ९४०५५३६८३०


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...