Agriculture news in marathi success story of purandar natural brand | Agrowon

‘पुरंदर नॅचरल ब्रॅण्ड’ने बाजारात मिळवली ओळख

संदीप नवले
बुधवार, 15 एप्रिल 2020

कोरोना संकटात शहरात शेतमाल पुरवठा करण्यासाठी बोपगाव (ता. पुरंदर, जि) येथील पुरंदर नॅचरल शेतकरी गटाने पुढाकार घेतला आहे. सध्या पुण्यातील निवासी सोसायट्यांमधील चारहजार ते पाचहजार फ्लॅटधारक व पंधराशेपर्यंत घरांपर्यंत सुमारे ६० प्रकारची उत्पादने हा गट पुरवत आहे. त्याद्वारे शेतकरी ते थेट ग्राहक अशी साखळी बळकट करून आर्थिक सक्षमता मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे.

कोरोना संकटात शहरात शेतमाल पुरवठा करण्यासाठी बोपगाव (ता. पुरंदर, जि) येथील पुरंदर नॅचरल शेतकरी गटाने पुढाकार घेतला आहे. सध्या पुण्यातील निवासी सोसायट्यांमधील चारहजार ते पाचहजार फ्लॅटधारक व पंधराशेपर्यंत घरांपर्यंत सुमारे ६० प्रकारची उत्पादने हा गट पुरवत आहे. त्याद्वारे शेतकरी ते थेट ग्राहक अशी साखळी बळकट करून आर्थिक सक्षमता मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे.

बोपगाव (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील प्रयोगशील विचाराचे ज्ञानेश्वर फडतरे, शंकर फडतरे, रमेश फडतरे, तानाजी फडतरे समान ध्येयाने एकत्र आले. सन २०१७ पासून सेंद्रिय शेतीत काम करण्यास त्यांनी सुरूवात केली. काही संस्था, कृषी अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण घेतले. आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती यासारख्या विषयांतही गट कार्यरत झाला. कडधान्य प्रक्रिया, सेंद्रिय कीडनाशक निर्मितीचे प्रयत्न केले. त्यानंतर हे शेतकरी शासनाच्या गट शेतीयोजनेत सहभागी झाले. आत्माचे संचालक सुनील बोरकर यांनी त्यातील बारकावे आणि योग्य पद्धतीने काम करण्याची पध्दत समजावून दिली. त्या अंतर्गत फळे, कडधान्ये, भाजीपाला, दूध प्रक्रिया, कोल्ड स्टोरेज आदी सामूहिक प्रक्रिया उद्योगाचे नियोजन सुरू झाले.
सुरुवातीला २० शेतकऱ्यांचे सुरू असलेले काम पाहून जवळपास ५० जण त्यास जोडले गेले.

गटाचे बळकटीकरण

 • जवळपास साडेतीनशे शेतकऱ्यांना कृषी विभाग- आत्मा यंत्रणेमार्फत गावातच प्रशिक्षण देण्यात आले. ज्यात व परराज्यात अभ्याससहली आयोजित केल्या. प्रकल्प उद्योगाला लागणारे प्रशिक्षण गटातील सदस्यांनी विविध ठिकाणी जाऊन घेतले. सोबत उत्पादित मालासाठी बाजारपेठ शोधण्याचे कामही काहींनी केले.
 • दर महिन्याला प्रति व्यक्ती साडे तीनशे रूपये यानुसार आत्तापर्यंत गटाची सव्वा ते दीड लाख रूपयांची बचत झाली आहे. आज ‘पुरंदर नॅचरल’ हा ब्रॅड शेतकऱ्यांनी तयार केला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला भेट देऊन त्यांना प्रोत्साहन दिले आहे.

गटाची वैशिष्ट्ये

 • पीजीएस अंतर्गत सेंद्रिय शेती गट प्रमाणीकरण
 • सामूहिक गोठा, मुरघास निर्मिती
 • दूध प्रक्रिया उद्योग
 • सामूहिकपणे प्रक्रिया उद्योग (डाळ मिल, फूड प्रोसेसिंग, ऑइल मिल)
 • सामूहिक शेततळे (१.५ कोटी लिटर)
 • सामुहिक शीतगृह प्रकल्प
 • गो आधारित उत्पादने (साबण, शांपू, धूप, हेअर ऑइल आदी.) ,
 • स्वतःची उत्पादने विक्री केंद्रे

कोरोना संकटात थेट शेतमाल विक्री

 • सध्या पुरंदर नॅचरल हा गट कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे शहरात थेट ग्राहकांना शेतमाल पुरवठा करतो आहे. यात गावासहित परिसरातील काही गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
 • गटामार्फत आत्तापर्यंत सुमारे १५०० घरे (बंगले) तर चारहजार ते पाचहजार फ्लॅटधारकांना मालाचा पुरवठा.
 • कृषी विभागाची मदत तसेच फेसबूक, व्हॉटस ॲप ग्रूपद्वारे मालाचे मार्केटिंग
 • भाजीपाला (१९ प्रकार) , फळे (४ प्रकार) , मसाले (५ प्रकार), डेअरी उत्पादने (४ प्रकार), फळ प्रक्रिया उत्पादने (४ प्रकार), परदेशी भाज्या (११ प्रकार), अंडी, गो आधारित उत्पादने (गोअर्क, केसांना लावायचे तेल आदी) अशी जवळपास ६० प्रकारची उत्पादने घरपोच
 • दुग्धजन्य पदार्थांत पनीर, खवा, पेढे, तूप तर मसाल्यांमध्ये मिरची, धना, गोडा मसाला, प्रक्रियायुक्त उत्पादनांत जॅम-जेली, आमरस, पल्प आदी पदार्थ

आरोग्य सुरक्षिततेचे नियम पाळले

 • आरोग्य सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून मालाचा पुरवठा केला जात आहे. एक दिवस आधी ऑर्डर्स घेतल्या जातात. ग्राहकाचे नाव किंवा फ्लॅट क्रमांकासहित टाकून ही ऑर्डर ट्रे व पिशवीत पॅक केली जाते. वाहन सोसायटीखाली थांबून सर्वांना एकेक करून बोलावण्यात येते. मालाला संपर्क न करता पिशवी घेण्यास सांगण्यात येते. ट्रे मध्ये पैसे ठेवले जातात किंवा ऑनलाईन पध्दतीने घेतले जातात.

गटाच्या माध्यमातून गावात उभे राहत असलेले उद्योग

 • सामूहिक गोठा
 • मुरघास निर्मिती
 • दूध प्रक्रिया उद्योग
 • सामूहिक प्रक्रिया उद्योग (दाळ मिल, फूड प्रोसेसिंग, ऑइल मिल आदी)
 • सामूहिक शेततळे (१.५ कोटी लिटर)
 • सामुहिक शीतगृह प्रकल्प
 • सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर (गो आधारित शेती)
 • गो आधारित उत्पादने (साबण, शांपू, धूप, हेअर ऑइल इ) ,

एक घर- एक उत्पादन संकल्पना

 • गावातील प्रत्येक शेतकऱ्याने एकेक उत्पादनाची जबाबदारी स्विकारली आहे. त्यामुळे खात्रीने उत्पादनाची निर्मिती व पुरवठा करणे शक्य झाले. जबाबदारी विभागली जावून अनेक घरांना हक्काचे आर्थिक उत्पन्न मिळत आहे.

विक्री केंद्रे

 • गटाची स्वतःची दोन व अन्य ११ विक्री केंद्रे आहेत. त्याद्वारे दूध, पनीर, पेढे, बर्फी, खवा, तूप, कडधान्ये, डाळी, गोआधारित उत्पादने, सेंद्रिय निविष्ठा, व्हर्मीवॉश, गांडूळखत सेंद्रिय भाजीपाला- फळे आदींची विक्री

उत्कृष्ट कार्य

 • कृषी विभागाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात गटाने जवळपास पाचहजार झाडे लावली. झाडांच्या देखभालीची जबाबदारीही गटाने घेतली आहे. त्यासाठी कृषीमंत्री आणि जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट गट म्हणून पारितोषिक मिळाले आहे.
 • गावातील कोरडवाहू ३०० ते ४०० हेक्टर शेती पाण्याखाली आणण्यासाठी गटाने योजना तयार केली होती. ती पूर्णत्वास नेण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांनी काही संस्था जोडून दिल्या आहेत.
 • पुण्यातील निवासी सोसायट्यांमध्ये आम्ही दररोज सुमारे ५० ते ६० प्रकारचा शेतमाल विक्री करतो आहे. ग्राहकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद लाभतो आहे.

संपर्क- ज्ञानेश्वर फडतरे, ७५८८५८०४९४, ९४२३०२४४४६, ९८१९३९०४६२
अध्यक्ष, पुरंदर नॅचरल शेतकरी गट


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...