agriculture news in marathi, success story of Reshma Mali,Bhose,Dist.Solapur | Agrowon

रेश्माताईंनी तयार केला केकचा रुचिरा ब्रॅंड
सुदर्शन सुतार
रविवार, 23 डिसेंबर 2018

भोसे(जि. सोलापूर) सारख्या ग्रामीण भागात राहूनही व्यवसाय कौशल्याला पूरेपूर वाव देत सौ. रेश्मा माळी यांनी केक उद्योगातून ओळख तयार केली आहे. चव, गुणवत्ता आणि आकर्षक सजावटीमुळे रुचिरा ब्रॅंडचा आइस केक ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.

भोसे(जि. सोलापूर) सारख्या ग्रामीण भागात राहूनही व्यवसाय कौशल्याला पूरेपूर वाव देत सौ. रेश्मा माळी यांनी केक उद्योगातून ओळख तयार केली आहे. चव, गुणवत्ता आणि आकर्षक सजावटीमुळे रुचिरा ब्रॅंडचा आइस केक ग्राहकांच्या पसंतीस उतरला आहे.

पंढरपूर-टेंभूर्णी रस्त्यावरील भोसे गावशिवारात सौ. रेश्मा हणमंत माळी यांची आठ एकर शेती आहे. सासू-सासरे, पती, मुले असं त्यांचे शेतकरी कुटुंब. त्यांच्याकडील शेतीमध्ये सध्या सात एकर ऊस आणि एक एकर डाळिंब लागवड आहे. शेती हाच त्यांचा मूळ व्यवसाय. पती, सासू-सासरे असे सगळेजण शेतीत राबतात. स्वतः रेश्माताई दहावीपर्यंत शिकल्या आहेत. पूर्वीपासून त्यांना शेतीपूरक व्यवसायाची आवड होती. त्यामुळे आपलादेखील प्रक्रिया उद्योग असावा, अशी त्यांची इच्छा, पण मार्ग सापडत नव्हता. 

प्रक्रिया उद्योगाचा सापडला मार्ग 
 रेश्माताई तशा सुगरण, नवनवीन पदार्थ करण्याची आवड त्यांना पहिल्यापासूनच होती. त्यातूनच २०१४ हे वर्ष त्यांच्या आयुष्याला वळण देणारे ठरले. त्यावर्षी एका खासगी दूरचित्रवाहिनीने राज्याच्या विविध भागांतून खास सुगरण शोधण्याच्या दृष्टीने स्पर्धा ठेवली होती. त्यावेळी महाराष्ट्रातून ज्या महिला निवडल्या गेल्या, त्यात सोलापूर विभागातून रेश्माताईंची निवड झाली आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

शेतात राबणारे हात थेट दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रमात खाद्यपदार्थाची चव वाढवण्याच्या कामाला लागले होते. त्यांनी परीक्षकांना विविध शहरी रेसिपीसह अस्सल गावाकडच्या पदार्थांची चव  दाखवून दिली. या कार्यक्रमात रेश्माताईंना आइस केकचा प्रकार सर्वाधिक आवडला. आइस प्रकारातील केक निर्मिती व्यवसायास सुरवात करूया, असे त्यांनी ठरविले. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन २०१६ मध्ये त्यांनी थेट आईस केक निर्मितीला सुरवात केली. परिसरातील खासगी बँकेने त्यांना केक निर्मिती उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले. साधारणपणे २६ हजार रुपयांच्या कर्जातून त्यांनी केक निर्मितीसाठी लागणाऱ्या घटक आणि यंत्रांची खरेदी करून व्यवसाय सुरू केला. वैशिष्टपूर्ण केक निर्मिती उद्योगामुळे परिसरात वेगळी ओळख तयार झाली. 

असा तयार होतो केक
 केक निर्मितीबाबत रेश्माताई म्हणाल्या की, केकसाठी रेडिमिक्स पावडर अर्धा किलो १५० मिलि पाण्यात मिसळून बॅटर यंत्रामध्ये ढवळली जाते. त्यानंतर या मिश्रणात ३० मलि तेल मिसळून पुन्हा ढवळले जाते. त्यानंतर केकच्या भांड्याला तेल लावून ठेवले जाते. या दरम्यान ओव्हन सुरू करून  काही वेळ गरम करून ठेवला जातो. त्यानंतर त्यामध्ये अर्धा तास केक ठेवला जातो. केक थंड झाल्यानंतर त्यावर शुगर सिरप टाकून पुन्हा फ्रिजमध्ये ठेवून थंड केला जातो. केक थंड झाल्यानंतर टर्निंग टेबलवर घेऊन आवश्यक डिझाइन केले जाते.

विविध प्रकार   
केकची आकर्षक सजावट आणि त्यावरील रंगसंगतीला फार महत्त्व आहे. ग्राहकांची आवड लक्षात घेऊन केक तयार केला जातो. रेश्माताई विविध स्वादाचे केक तयार करतात. त्यामध्ये प्रामुख्याने व्हॅनिला, चॉकलेट, पायनापल, अॅारेंज असे प्रकार आहेत. सर्वाधिक चॉकलेट केकला चांगली मागणी आहे.

दरमहा ९० केकची मागणी 
पंढरपूरपासून १४ किलोमीटरवर रेश्माताईंचे भोसे गाव आहे. केकसाठी पंढरपूर शहर हे चांगले मार्केट त्यांना मिळू शकते. परंतू त्यांच्या गाव परिसरातील करकंब, भोसे, पांढरेवाडी, सुगार, शेवते आदी गावांतील ग्राहकांची केकसाठी एवढी पसंती मिळते की, अन्य शहरात जाऊन केकसाठी मार्केट मिळवण्याची गरज त्यांना पडली नाही. सध्या दरमहा पंचक्रोशीतून सरासरी ९० केकची त्यांना मागणी असते. महिन्याकाठी सर्व खर्च वजा जाता त्यांना केक निर्मिती उद्योगातून दहा हजारांचा नफा मिळतो. आइस प्रकारातील केकचा प्रति किलोचा दर ३५० रुपये आहे. अर्धा किलो केक १८० रुपये आणि पाव किलोचा दर १०० रुपये आहे. शहरात केक खरेदी करताना स्वादानुसार दर ठरलेले असतात. पण रेश्माताईंना कोणत्याही स्वादाचा केक मागा, दर मात्र एकच असतो, हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. कोणत्याही व्यवसायासाठी आवड पाहिजेच, पण प्रामाणिक प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. कुटुंबीयांच्या सहकार्याने भविष्यात केक निर्मितीच्या बरोबरीने आंबा, चिकू, सीताफळाचा स्वाद असलेल्या आइस्क्रीम निर्मिती सुरू करण्याचे रेश्माताईंनी नियोजन केले आहे. 

तनिष्का उपक्रमात आघाडी
सकाळ माध्यम समूहाच्या वतीने ग्रामीण स्त्रियांसाठी राबवण्यात येत असलेल्या तनिष्का गटाच्या  रेश्माताई सक्रिय सदस्या आहेत. तनिष्कातर्फे ग्रामीण भागात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, कार्यक्रमात त्यांची नेहमीच आघाडी असते. तनिष्काच्या माध्यमातून  त्यांनी गाव परिसरातील स्त्रियांचे उत्तम संघटनही केले आहे. 

- सौ. रेश्मा माळी, ९८५०७२३३६१ 
 

 

 

फोटो गॅलरी

इतर महिला
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
मुखवासनिर्मितीतून अर्थकारणाला बळ बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जळगावमधील अनिता दगा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
नंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात...पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा...
प्रयोगशील शेतीतून थांबविले कुटुंबांचे...देवगाव, आंबेवंगण (ता. अकोले, जि. नगर) ही आदिवासी...
नंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
आरोग्यदायी पुदिनापुदिना शरीरास थंडावा देणारी वनस्पती असून,...
आळिंबी, गव्हांकुर उत्पादनातून बचत गटाची...गोद्रे (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील महिलांनी...
शेती, पूरक उद्योगातून महिला गट झाला...पुणे जिल्ह्यातील गोऱ्हे बु. (ता. हवेली) येथील ऋचा...
कडवंची : अर्थकारणाला मिळाली बचत गटांची...शेती आणि ग्रामविकासामध्ये महिलांचा महत्त्वपूर्ण...
कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हानकडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये...
स्वच्छ पाणी प्या, आजारापासून दूर रहाखराब पाण्यामुळे अमिबाची लागणसुद्धा होऊ शकते. या...
आरोग्यवर्धक नारळपाणी आयुर्वेदात नारळपाण्याला खूप महत्त्व आहे. नारळात...
अल्पभूधारक, भूमिहीन महिलांना बचतगटातून...बेल्हेकरवाडी (ता. नेवासा,जि.नगर) मधील तुकारामनगर...
आजारांच्या नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यकलसीकरण हे लहान मुले, बाळांसाठी आणि आजारी...