रेशीम उद्योगाने आणली कौटुंबिक स्थिरता

रेशीम उद्योगाने आणली कौटुंबिक स्थिरता
रेशीम उद्योगाने आणली कौटुंबिक स्थिरता

पूर्वी पूरक म्हणून सुरू केलेला रेशीम उद्योग आता मुख्य बनला आहे. कुटुंबाच्या साडेतीन एकर शेतीपैकी तीन एकरांवर तुतीची चार वर्षांपासून लागवड केली जाते. पत्नी वैशाली यांच्या साथीने चालविलेल्या चॉकी सेंटरमुळे कुटुंबातील सर्वांच्या हाताला काम मिळते आहे. कुटुंबाला कार्यकुशल बनवत आर्थिक स्थिरता आणण्याचं काम याच रेशीम उद्योगानं केल्याचं औरंगाबाद जिल्ह्यात फूलंब्री तालुक्‍यातील डोंगरगाव कवाड येथील विजय डकले अभिमानाने सांगतात.  पूर्वीची शेती  विजय यांनी साधारण २००६ मध्ये शेतीची जबाबदारी सांभाळण्यास सुरवात केली. त्यापूर्वी वडील पुंडलीकराव पारंपरिक शेती करताना कपाशी, मका आदी पिके घ्यायचे. पाऊस पूरक राहिला तर जेमतेम ५० ते ६० हजार रुपये उत्पन्न साडेतीन एकरांतून मिळायचे. कुटुंबाचा चरितार्थ भागविताना घालमेल व्हायची.  रेशीम शेतीने दाखविली पाउलवाट  सन २००६ च्या सुमारास विजय यांनी अर्थप्राप्ती वाढवण्यासाठी आणि शेतीला पूरक म्हणून रेशीम विभागाच्या मार्गदर्शनांतर्गत रेशीम उद्योगाची कास धरली. तुतीची एक एकरवर लागवड केली. ‘कोलार गोल्ड’ या पिवळे कोष तयार करणाऱ्या कोषांचे उत्पादन घेण्यास सुरवात केली. आता ते  ‘डबल हायब्रीड’ पांढऱ्या कोषांचे उत्पादन घेतात. काही वर्षे पाच ते सहा बॅचेस ते घ्यायचे. पुढे २०१० नंतर ‘डबल हायब्रीड वाणा’ तून वर्षाला ५ ते ६ बॅचेस घेत उत्पादन वाढवले.  सन २००४ नंतर तुती क्षेत्रात दोन एकरांची वाढ केली.   डकले यांचा रेशीम शेती उद्योग दृष्टिक्षेपात 

  •    सन २०१० ते १४ या काळात कोषांना ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. 
  •    त्यानंतर मागील वर्षापर्यंत हा दर ३०० ते ५०० रुपये मिळाला. 
  •    सन २०१० पासून कर्नाटकातील रामनगरम बाजारात रेशीम कोषांची विक्री होते. 
  •    प्रतिबॅच खर्च- ३२ हजार रुपयांपर्यंत  
  •    चॉकी सेंटर- प्रतिबॅच खर्च- २० हजार रुपये. 
  •  चॉकी सेंटरचा मोठा आधार  रेशीम उद्योगाकडे जसजसे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळू लागले तसतसे हा उद्योग अधिक फायद्याचा व कमी वेळेत करण्याचे तंत्र शेतकरी हाताळू लागले. त्यातूनच पत्नी सौ. वैशाली यांच्या मदतीने विजय यांनी २०१३-१४ मध्ये चॉकी सेंटर सुरू केले. कुटुंबाला त्यातून मोठा आर्थिक आधार मिळू लागला. कुटुंबातील सदस्य या व्यवसायात राबू लागले. रेशीम उत्पादक विजय यांच्याकडे बाल्यावस्थेतील अळ्यांची मागणी नोंदवितात. मिळालेल्या अंडीपूंजांमधून संगोपन करीत दहा दिवसांत संबंधित अळी अवस्था विजय शेतकऱ्यांना पुरवतात.    वैशिष्ट्ये 

  •    चाळीसगाव, धुळे, जळगाव, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत चॉकीला मागणी 
  •    जवळपास शंभर शेतकरी संपर्कात 
  •    प्रत्येक महिन्याला ७० ते ८० शेतकऱ्यांना चॉकी पुरवली जाते. 
  •    प्रति शंभर अंडीपुंजांमागे सुमारे १२०० रुपये उत्पन्न मिळते. 
  •  रेशीम उद्योगाने साध्य केलेल्या बाबी  
  •    तीन मुलींची शिक्षणे  
  •    शेतात पाण्याच्या शाश्वततेसाठी स्वखर्चातून दोन विहिरींची निर्मिती  
  •    चॉकी सेंटर उभारण्यासाठी पाच ते सहा लाख खर्च कुठल्याही मदतीविना स्वत: करणे झाले शक्‍य. 
  • रेशीम शेतीने आमचे जीवन सुकर केले आहे. आठ सदस्यांच्या कुटुंबाचा खर्च या व्यवसायातून करणे शक्य झाले आहे. स्वखर्चातून चॉकी सेंटर उभारणेही शक्‍य झाले.  - विजय पुंडलीक डकले , सौ. वैशाली विजय डकले : ९४२३६६२१८१ , ८३२९०५२९६९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com