agriculture news in Marathi, success story of Vilas Pabvi,Kortad,Dist.Palghar | Agrowon

नाचणी, वरईची सुधारित तंत्राने शेती
भरत कुशारे
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

अतिशय दुर्गम, आदिवासी अशा कोरतड (जि. पालघर) येथील विलास पाडवी यांनी नाचणी, वरई व खुरासणी या दुर्लक्षित पिकांत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यासाठी क्षेत्रातील कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेतले. त्याद्वारे या पिकांचे चांगले उत्पादन घेत त्यांची यशस्वी शेती करण्यासह केळीचाही परिसराला आदर्श प्रयोग केला. पडवी यांच्या प्रयोगशील व अभ्यासू शेतीची दखल सन्मान देऊन घेण्यात आली आहे. 

अतिशय दुर्गम, आदिवासी अशा कोरतड (जि. पालघर) येथील विलास पाडवी यांनी नाचणी, वरई व खुरासणी या दुर्लक्षित पिकांत सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यासाठी क्षेत्रातील कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेतले. त्याद्वारे या पिकांचे चांगले उत्पादन घेत त्यांची यशस्वी शेती करण्यासह केळीचाही परिसराला आदर्श प्रयोग केला. पडवी यांच्या प्रयोगशील व अभ्यासू शेतीची दखल सन्मान देऊन घेण्यात आली आहे. 

पालघर जिल्ह्यात अतिशय दुर्गम आदिवासी भागात असलेल्या जव्हार तालुका ठिकाणापासून वीस किलोमीटरवर कोरतड हे छोटे गाव आहे. सुमारे ५२ वर्षे वयाचे विलास सखाराम पाडवी यांचा पत्नी सौ. लता, हर्षद, सूरज ही मुले, मुलगी कांजन आणि सून सौ. भावना असा परिवार आहे. विलास पाडवी यांनी १६ वर्षे भारतीय सैन्यदलात नोकरी केली. सन २००० मध्ये सेवानिवृत झाल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ शेतीलाच वाहून घेतले. 

विलास यांची शेती 

 •   पाच एकर भात, नाचणी, वरई, खुरासणी आदी पिके. शेती पावसाच्या पाण्यावर. 
 •   भाडेतत्त्वावरील चार एकरांपैकी दीड एकर भात, दोन एकर नाचणी, प्रत्येकी अर्धा एकरात वरई आणि खुरासणी. यंदा अर्धा एकरात काजू.  

केव्हीकेने अभ्यासली गरज
सन २०१० मध्ये डहाणू-कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) कोरतड गाव दत्तक घेतले. तेथील सर्वेक्षण केले. डोंगरमाथ्यावरील उथळ, हलक्या जमिनीत घेतली जाणारी नाचणी, वरई ही दुर्लक्षित तृणधान्ये असली तरी इथल्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांचे ते प्रमुख अन्न आहे. हे महत्त्व लक्षात घेऊन केव्हीकेने या पिकांत आधुनिक तंत्र पुरवण्यास सुरवात केली.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून  सुधारीत शेती 
केव्हीकेचे विषय विशेषज्ज्ञ भरत कुशारे यांच्याकडून विलास यांनी तंत्र आत्मसात करण्यास सुरवात केली. जव्हार तालुक्यात ३००० मिमी पाऊस पडतो. परंतु प्रदेश डोंगराळ असल्याने उन्हाळ्यात पाणी राहात नाही. अशा स्थितीत पाण्याची व्यवस्था होऊ शकणाऱ्या तीन एकर ओसाड माळरानावर विलास यांनी भाडेतत्त्वावर शेती कसण्यास घेतली. दगड गोटे, झाडेझुडपे, गवत साफ करून ती नांगरून स्वच्छ केली. वन्यजीवांचा त्रास कमी करण्यासाठी तारेचे कुंपण केले. अर्धा किलोमीटरहून धरणातून पाण्याची पाइपलाइन केली. 

विलास यांचे शेती व्यवस्थापन 

 •   डोंगर उतारावर जेथे भात लावणे शक्य नाही अशा भागात नाचणी, वरईची लागवड. 
 •   जमीन नांगरून चांगली तयार करून घेतात. दोन किलो बियाणे वापरून एक एकरसाठी रोपवाटिका. 
 •   रासायनिक बीजप्रकिया, रोपवाटिकेत शेणखत किंवा कंपोस्ट खताचा वापर. 
 •   जुलैत चांगल्या पावसानंतर दुसरी नांगरणी. या वेळी वन्य झाडांचा पाला व शेतातील गवत जमिनीत गाडतात. त्याचा नागली व वरईला मोठा उपयोग. त्यानंतर स्थानिक नांगराने उताराच्या आडव्या दिशेने सरी वरंबा. 
 •   २५ ते ३० दिवसांच्या रोपाची १५ सेंटीमीटरवर लागवड.  
 •   रिमझिम पावसात लागवड केल्यास रोपे चांगली वाढतात. रोपे शेताच्या उताराला ओळीत आडवी, त्यामुळे पावसाचे पाणी कमी प्रमाणात मुरण्यास मदत. मातीची धूप कमी होते.
 •   लागवडीवेळी परिसरातील १५ ते २० शेतकरी एकत्र येऊन लागवड करतात. 
 •   पुनर्लागवडीनंतर एक खुरपणी. 
 •   नाचणीस ५० किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेटचा एकरी वापर.

विक्री 

 •   घरगुती वापरासाठी ठेवून उर्वरित नाचणीची ३५ रु. प्रति किलो दराने परिसरातील महिला बचत गटांना पापड बनविण्यासाठी विक्री. 
 •   वरईसाठी जव्हार येथे भगर मिल्स. ३५ ते ४० रुपये प्रति किलो दराने जव्हार येथे विक्री.   

सुधारित तंत्रातून मिळालेले उत्पादन (एकरी) 

नागली  -  ६ क्विं. 
वरई   - ७ क्विं. 
खुरासणी -    २ क्विं. 
भात- ड्रम सीडर पद्धत   - १४ क्विं. 
 

केळी लागवड

 विलास यांनी भाडेतत्त्वावरील दुर्गम, डोंगराळ, हलक्या जमिनीत या भागात फारसे कोणी न घेतलेल्या केळीच्या ग्रॅंडनैन जातीच्या लागवडीचाही प्रयोग २०१४ पासून सुरू केला. जीवामृत, शेणखत किंवा कोंबडीखताच्या वापरावरच भर दिला. विलास यांचा आदर्श घेऊन मित्र व मेहुणे कृष्णा गवळी यांनी दोन एकर व पुढे परिसरातील १० ते १५ आदिवासी शेतकऱ्यांनी एकूण ३५ ते ४० एकरांवर केळी लागवड केली. जव्हार परिसरात केळीसाठी मायक्रोजेट वापरणे जास्त फायदेशीर असल्याचे विलास सांगतात. जोडओळ पद्धतीने ५ बाय ५ फूट व दोन जोड ओळीमध्ये आठ फूट अंतर ठेवले तर हवा खेळती राहते. उत्पादन जास्त मिळते असा त्यांचा अनुभव आहे. सरासरी प्रति घडाचे वजन ३० ते ३५ किलो तर ८ ते ९ रुपये प्रति किलो दर मिळाला आहे.   

यांत्रिकीकरणावर भर
विलास यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर घेतला. जव्हार भागात शेतीत यापूर्वी फारसे यांत्रिकीकरण झाले नव्हते. विलास यांनी स्वतःच्या शेतात यांत्रिकीकरणाला सुरुवात करण्यासह  परिसरातील शेतकऱ्यांसाठीही भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर देण्यास सुरवात केली. त्यांच्या प्रेरणेतून परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा वापर सुरू केला. विलास यांनी तलाव भाडेतत्त्वावर घेऊन रोहू, कटला, मृगळ यांचे पालन २०१४ मध्ये सुरू केले. शेती औजारे तयार करण्याचाही व्यवसाय केला. 

सन्मान

 •   प्रगतिशील शेतकरी- कृषी विज्ञान केंद्र, पालघर
 •   नाचणीच्या यशस्वी शेतीसाठी एल. एम. पटेल फार्मर ऑफ दी इयर
 •   नाचणी, वरई, खुरासणी; या देशी वाणांचा संवर्धन कार्यक्रम साम टीव्हीवर प्रसारीत   

- विलास पाडवी, ८८०६०३३२२१, ८६९८१५५३१४
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, डहाणू येथे विषय विशेषज्ञ आहेत.)

 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
प्रतिकूलतेतून मेघाताईंची शेतीत भरारीपरभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील...
सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक ! गेल्या...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
बुके, हारांसह फूल ‘डेकोरेशन’ झाला सक्षम...नाशिक जिल्ह्याने फूल सजावटीच्या व्यवसायातही आघाडी...
निर्यातक्षम गुणवत्तेच्या पेरूचे उत्पादनसातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील कृषिभूषण मनोहर...
तीर्थपुरी गावाची होतेय मोसंबी पिकात ओळखतीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) भागातील...
प्रयोगशील, प्रगतिशील शेतीतील ‘एकता’मळद (जि. पुणे) येथील एकता शेतकरी गटाने सेंद्रिय...
दुष्काळातही दुग्ध व्यवसाय टिकवण्याची...अलीकडील वर्षांत कायम दुष्काळी स्थिती अनुभवणाऱ्या...
गटशेतीतून मिळाली कृषी विकासाला चालनाविरगाव (ता. अकोले, जि. नगर) येथील २० शेतकऱ्यांनी...
'सीआरए’ तंत्राने तगली दुष्काळातही...प्रतिकूल हवामानावर मात करणारे सीआरए (क्लायमेट...
शेती, आरोग्य विकास अन् पर्यावरण...नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांचे आरोग्य आणि...