agriculture news in marathi success story of a woman from pune district doing profitable processing business | Page 2 ||| Agrowon

शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोड

संदीप नवले
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

खोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप यांनी शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड दिली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी गवती चहा, कडिपत्ता, शेवगा, गाजर, तुळस पावडर आणि तूप निर्मितीला सुरवात केली.  

खोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप यांनी शेतीला प्रक्रिया उद्योगाची जोड दिली आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी गवती चहा, कडिपत्ता, शेवगा, गाजर, तुळस पावडर आणि तूप निर्मितीला सुरवात केली. कृषी प्रदर्शन तसेच थेट विक्रीवर भर देत त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला आहे.

भोर (जि.पुणे) तालुक्यातील खोपी गाव शिवारामध्ये भात हे मुख्य पीक. त्याचबरोबरीने काही शेतकरी हंगामी भाजीपाला पिकांची लागवडीकडे वळले आहेत. खोपी गावातील अंजना नारायण जगताप या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील महिला. शेतीची त्यांना पहिल्यापासून आवड, परंतु शेतीसाठी लागणारी पुरेशी साधने उपलब्ध नसल्यामुळे पारंपारिक शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास सुरू केला. 

अंजनाताईंच्या कुटुंबाची सात एकर शेती आहे. त्यामध्ये भात, भुईमूग, घेवडा, भाजीपाला लागवड तसेच आंबा, पेरू बाग आहे.  खोपी गावामध्ये कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत दादासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ सेंद्रिय शेती गट स्थापन करण्यात आला. या गटामध्ये सहभागी होण्याची संधी अंजनाताईंना मिळाली. गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीबाबत त्यांना मार्गदर्शन मिळू लागले.  त्यामुळे त्यांनी शेतीमध्ये बदलाला सुरवात केली.

 अभ्यासदौऱ्यातून मिळाली दिशा 
दोन वर्षांपूर्वी आत्मा अंतर्गत पुणे जिल्ह्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा म्हैसूर येथील सीएफटीआरआय संस्थेमधील संशोधन पहाण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यामध्ये अंजनाताई सहभागी झाल्या. अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी झाल्यामुळे शेतीमधील नवीन प्रयोग, असलेल्या साधनसंपत्तीचा उपयोग करणे तसेच उत्पादित शेतीमालावर प्रक्रिया करण्याची सविस्तर माहिती मिळाली. अभ्यास दौऱ्यामुळे शेतीमध्ये चांगले काम करण्याचा आत्मविश्वास त्यांना मिळाला.

विक्रीचे घेतले प्रशिक्षण 
गेल्या वर्षी आत्मा, पुणे यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती गटातील प्रयोगशील शेतकरी स्वाती शिंगाडे यांच्यासोबत दिल्ली येथे  आयोजित महिला किसान
दिनाच्या कार्यक्रमामध्ये अंजनाताईंना सहभागी होण्याची संधी मिळाली. या ठिकाणी आयोजित प्रदर्शनामध्ये त्यांनी शेतीमालाचे पॅकिंग,लेबलिंग आणि विक्री व्यवस्थापनाबाबत सविस्तर माहिती घेतली. दिल्लीवरून आल्यानंतर उत्पादित शेतीमालाचे पॅकिंग आणि गटाच्या नावाने लेबलिंग करून गाव परिसर आणि पुणे जिल्ह्यात विक्री करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.  

कृषी महोत्सवामध्ये उत्पादनांची विक्री 
गेल्या वर्षी आत्मा, पुणे आणि कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे यांनी सेंद्रिय शेती गटास शेतीमाल विक्रीसाठी दालन उपलब्ध करून दिले. या महोत्सवामध्ये अंजनाताईंनी तयार केलेल्या विविध प्रक्रिया उत्पादनांची चांगली जाहिरात झाली. यामुळे विविध खरेदीदारांशी ओळख झाली. उत्पादनांची चांगल्या प्रकारे विक्री झाली. या महोत्सवात महाराष्ट्र  तसेच परराज्यातील  शेतकऱ्यांनी दालनास भेट दिली होती. त्यावेळी अनेकांनी त्यांच्या प्रक्रिया उत्पादनाची माहिती घेतली. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी संपर्क वाढविण्यास सुरवात केली. याचबरोबरीने पुणे शहरामध्ये आयोजित होणाऱ्या विविध धान्य महोत्सवामध्ये   अंजनाताई सहभागी होतात. यातून प्रक्रिया उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळाली.प्रदर्शनात  काही शेतकऱ्यांची प्रक्रिया उत्पादने त्या विकतात. निसर्गोपचार केंद्रातील येथील डॉ. संतोषी चौरजे, डॉ.ज्योती कुंभार यांची देखील विक्रीसाठी मदत होते. 

शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी 
खोपी गावातील स्वामी समर्थ सेंद्रिय शेती गटांमध्ये २० शेतकरी आहेत. प्रक्रियेसाठी गरजेनुसार अंजनाताई या गटातील शेतकऱ्यांकडून कडीपत्ता, शेवगा, मूग, गाजराची खरेदी करतात. या व्यवसायाच्या माध्यमातून गटातील शेतकऱ्यांना फायदा होत आहे.   

शेतीमध्येही प्रयोगशीलता 
 अंजनाताईंनी कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने शेतीमध्येही पीक बदल केला आहे. खरीप हंगामात एक एकरावर इंद्रायणी भात, भुईमूग अर्धा एकर, घेवड्याची अर्धा एकरावर लागवड असते. याचबरोबरीने काही क्षेत्रावर वांगी,टोमॅटो,मिरची लागवड असते. या पिकांना सेंद्रिय खते, जीवामृताचा वापर केला जातो. रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, गहू लागवड असते. याचबरोबरीने तीन एकर क्षेत्रावर हापूस,केसर आंबा कलमे तसेच पेरू लागवड केली आहे. पेरू लागवडीमध्ये गवती चहा, तुळशीचे आंतरपीक घेतलेले आहे. 

विविध पिकांची लागवड 
म्हैसूर येथील अभ्यास दौऱ्यावरून आल्यावर मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून कमी भांडवलामध्ये कोणता प्रक्रिया उद्योग करावा, याबाबत अंजनाताईंनी माहिती घेतली. यासाठी गटातील शेतकऱ्यांचे चांगले मार्गदर्शन मिळाले. बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करून त्यांनी आयुर्वेदिक काढा (चहा) बनविण्याचे ठरविले. यासाठी जाणकारांकडून माहिती घेतली. प्रायोगिक तत्त्वावर घरी हा काढा तयार केला. यामध्ये गवती चहा, तुळस,आले पावडर, लवंग, दालचिनी, कडीपत्ता पावडरीचा वापर केला. ग्राहकांच्याकडून या चहाला चांगली मागणी मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला.  उत्पादनाची वाढती मागणी लक्षात घेऊन पेरू बागेमध्ये त्यांनी सेंद्रिय पद्धतीने तुळस, कडीपत्ता,गवती चहाची लागवड केली आहे. 

घरच्यांची मिळाली साथ
ग्राहक तसेच दुकानदारांच्याकडून व्हाट्सॲपद्वारे मागणी नोंदवून घेतली जाते. त्यानुसार उत्पादनांची विक्री केली जाते. सध्या दर महिन्याला १५ किलो प्रक्रिया उत्पादनांची विक्री होत आहे. साधारणपणे ४०० ते  ५०० रुपये किलो या दराने प्रक्रियायुक्त पावडरची विक्री होते. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी बनवलेल्या काढ्यास चांगली मागणी होती. दरवर्षी विविध वनस्पतींची पावडर, हंगामी भाजीपाला, हरभरा डाळ तसेच गूळ,काकवी,देशी गाईच्या तूप विक्रीतून दीड लाखांची उलाढाल होते. प्रक्रिया उद्योगामध्ये अंजनाताईंना कुटुंबाची चांगली साथ मिळाली आहे.

प्रक्रिया उद्योगाला सुरवात 
 तीन वर्षापूर्वी अंजनाताईंनी स्वतःच्या शेतीमध्ये तुळस, कडीपत्ता, गवती चहा, शेवग्याची लागवड केली आहे. याच्या पानांची काढणी करून त्यांची पावडर तयार केली जाते. प्रामुख्याने नैसर्गिक पद्धतीने सावलीत पाने वाळवली जातात.त्यानंतर ओव्हनमध्ये काहीवेळ ठेवली जातात. त्यानंतर मोठ्या मिक्सरमध्ये वाळविलेल्या पानांची पावडर तयार केली जाते. सध्या कडीपत्ता पावडर, गवती चहा पावडर, शेवगा पावडर, हुलगा पावडर, गाजर पावडर आणि मोड आलेले मूग अशा उत्पादनांवर त्यांचा भर आहे.  

संपर्क ः अंजना जगताप, ९७६३०२२६७०


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
दुग्ध व्यवसायातून अल्पभूधारक शेतकऱ्याची...वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये कुटुंबाचा...
पशुपालनाने दिली आर्थिक प्रगतीला साथकोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील देवानंद...
तोतया व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची...नाशिक : सध्या मागणीच्या तुलनेत सध्या कांद्याची...
गांडूळ खताने घातले उत्पन्नवाढीस खतपाणीसासवड, जि. पुणे ः वीटभट्टीच्या धंद्यात उधारी...
नियमित कर्जफेड करणारे शेतकरी...कोल्हापूर ः जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार नियमित...
ग्रामीण भागात नऊ लाख घरे बांधणार ः हसन...मुंबई : राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच...
विदर्भाच्या काही भागांत थंडीपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाले...
कारखाने भाडेतत्त्वावर देणाऱ्या समितीत...पुणे : आजारी साखर कारखाने व त्यांच्या अब्जावधी...
पानांचे दर दबावात; उत्पादकांना फटकासांगली : गेल्या आठ महिन्यांपासून बाजारपेठेत...
खानदेशात ‘सीसीआय’कडून २५ हजार क्विंटल...जळगाव ः खानदेशात कापूस महामंडळाकडून (सीसीआय)...
‘कार्तिकी’च्या काळात पंढरपूरसह ...सोलापूर : यंदा कार्तिकी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर...
‘महाबीज’चे कर्मचारी जाणार सात...अकोला ः सातवा वेतन आयोग, पाच दिवसांचा आठवडा यांसह...
खाद्यतेल आयातीत १२ टक्के घटपुणे ः देशात २०१९-२० (नोव्हेंबर ते ऑक्टोबर) मध्ये...
कृषी सचिवांच्या गावातील शेतकऱ्यांचा कल...अकोला ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...
पूर्वहंगामी द्राक्षाला २०० कोटींचा फटकानाशिक : यंदा पूर्वहंगामी द्राक्ष हंगामाच्या...
शासकीय योजनांच्या विहिरींमुळे वाढतोय...मालेगाव, जि. वाशीम ः  जिल्हा परिषद, कृषी...
दहिगावात दोन एकरांतील कापूस नेला चोरूनअकोला ः यंदा शेतशिवारात सर्वच पिकांची उत्पादकता...
मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची...पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण...
चटणी, मसाल्याचा बनविला ब्रॅण्डकोल्हापूरची खाद्य संस्कृती म्हटलं की, तिखटाबरोबर...
शेती, आरोग्य अन् महिला विकासाची शक्तीगोमेवाडी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथील ग्रामीण...