महिला बचत गटांची दुग्धव्यवसायात भरारी

खडकूत गावातीलबचतगटांना महिला आर्थिकविकास महामंडळाकडून अर्थसाहाय्य तसेच तांत्रिक मार्गदर्शन लाभले. यामुळे या गावातील १६ महिला बचत गट म्हैसपालनातून चांगला नफा मिळवीत आहेत. याचबरोबरीने पूरक उद्योगांनाही चालना मिळाली आहे.
Raising of milch buffaloes by women group
Raising of milch buffaloes by women group

खडकूत गावातील बचतगटांना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून अर्थसाहाय्य तसेच तांत्रिक मार्गदर्शन लाभले. यामुळे या गावातील १६ महिला बचत गट म्हैसपालनातून चांगला नफा मिळवीत आहेत. याचबरोबरीने पूरक उद्योगांनाही चालना मिळाली आहे.   नांदेड शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर खडकूत हे गाव आहे. शहरापासून जवळ असले तरी गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती तसेच पशुपालन हाच आहे. आसना नदीसह ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी या गावशिवाराला मिळते. यामुळे  ऊस हे मुख्य पीक. यासोबतच केळी, सोयाबीन, कपाशी या पिकांची लागवड गावातील शेतकरी करतात. शहराजवळ गाव असल्यामुळे दुग्ध व्यवसायही चांगल्या प्रकारे वाढलेला आहे. गावामध्ये महिला बचत गट चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत. या बचतगटांना महिला आर्थिक विकास महामंडळाकडून अर्थसाहाय्य तसेच तांत्रिक मार्गदर्शन लाभले. यामुळे आज गावातील १६ महिला बचत गट दुग्ध उत्पादनातून चांगला नफा मिळवीत आहेत.    सदस्यांना मिळाला रोजगार 

  • महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) रमाई लोक संचलित साधन केंद्र, अर्धापूर अंतर्गत खडकूत येथे १९९४ पासून महिला बचत गट कार्यरत आहेत. महाराष्ट्र ग्रामीण पतपुरवठा प्रकल्प अंतर्गत (MRCP) गावात १६ महिला बचत गटांची नोंदणी झाली. त्यामध्ये २१६ महिला सहभागी आहेत. या १६ महिला बचत गटाची मिळून सुजाता ग्राम संस्था स्थापन करून त्याचे बँकेत खाते आहे. याचबरोबरीने समान व्यवसाय करणाऱ्या ३० महिलांचा सूक्ष्म उपजीविका कार्यक्रम (MLP) अंतर्गत बॅंकेत खाते आहे. यामध्ये सहा गटातील महिलांचा सहभाग आहे. यातील प्रत्येक सदस्य महिलेने बचत गटामधून अंतर्गत कर्ज आणि बँक कर्ज घेऊन प्रत्येकी दोन म्हशी खरेदी केल्या. यामुळे पारंपारिक दुग्ध व्यवसायाला बळकटी मिळाली. सध्या गावामध्ये धनलक्ष्मी, प्रगती, श्रीगणेश, जिजाऊ,नवदुर्गा, संत जनाबाई, लक्ष्मी, माऊली, सावित्रीबाई, छत्रपती, प्रतिज्ञा, पंचशिला, त्रिशरण, प्रजापती, महामाया, प्रज्ञा हे स्वयंसहायता महिला बचत गट कार्यरत आहेत.
  • पशूपालनातून आर्थिक प्रगती गटातील तीस महिलांनी प्रत्येकी दोन म्हशींची खरेदी केली आहे. प्रत्येक सदस्याला दोन म्हशींपासून प्रति दिन २४ लिटर दूध मिळते. नांदेड शहरात दुधाची सरासरी पन्नास रुपये प्रति लिटर दराने विक्री होते. एका सदस्याला दूध विक्रीतून दररोज बाराशे रुपये मिळतात. खर्च वजा पाचशे ते सातशे रुपये निव्वळ नफा मिळतो, अशी माहिती धनलक्ष्मी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा लक्ष्मीबाई शेषराव कंकाळ यांनी दिली.
  • ‘पशू सखी‘तर्फे तांत्रिक सल्ला   गटातील महिलांना म्हशींना होणारे आजार आणि उपचार पद्धतीची  माहिती वेळेवर होण्यासाठी गटातील एका महिलेची पशू सखी म्हणून निवड केली आहे. ही महिला दर महिन्याला प्रत्येक गोठ्यामध्ये भेट देऊन प्रथमोपचाराबाबत माहिती देते. तसेच गरजेनुसार पशूतज्ज्ञांच्या भेटी आयोजित केल्या जातात. गटांनी म्हशींचा विमा  काढला आहे.  गटांची होते नियमित बैठक महिला बचत गटाचे काम सुरळीत चालावे, यासाठी प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला गटातील सदस्यांची बैठक होते. यावेळी नियमित बचत जमा करून सदस्य महिलांच्या अडचणीवर चर्चा केली जाते. बचत गटात पन्नास रुपयांपासून अडीचशे रुपये दरमहा बचत केली जाते. यासोबतच गटाच्या कर्जाची नियमित परतफेड तसेच अंतर्गत कर्जाची वसुली याबाबतही चर्चा केली जाते. गटाचे खाते पुस्तक, वसुली आणि वाटप रजिस्टरची नोंदणी वेळेवर घेतली जाते, अशी माहिती प्रजापती महिला स्वयंसहायता गटाच्या अध्यक्षा अनिता राजू वैद्य यांनी दिली. बचत गटामुळे मिळाले कर्ज 

  •  रमाई लोक संचलित साधन केंद्राची गाव प्रतिनिधी म्हणून चंद्रकला बालाजी बुक्तरे यांची निवड करण्यात आली आहे. साधन केंद्राच्या माध्यमातून १६ महिला बचत गटांपैकी १५ गटांना बँकेचे कर्ज मिळाले आहे. त्या माध्यमातून महिला वेगवेगळा पूरक व्यवसाय करतात. यामध्ये प्रामुख्याने सरकी ढेप विक्री केंद्र, तयार कपडे विक्री, बांगडी विक्री, शेळीपालन असे पूरक उद्योग महिलांनी सुरू केले आहेत. काही जणींनी घराचे पक्के बांधकाम केले. कर्जाच्या उपलब्धतेमुळे मुलांचे शिक्षण, लग्नकार्यातील खर्चाला हातभार लागला आहे.
  • तेजस्विनी निधीमधून निधी बचत गटाच्या सदस्या सुजाता ग्राम संस्थेच्या मदतीने गावात विविध कार्यक्रम आयोजित करतात. पूर्वी महिलांना घराबाहेर पडता येत नव्हते, परंतु आता याच महिला दुग्ध व्यवसाय करून कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळत आहेत. माविमच्या रमाई लोक संचलित साधन केंद्रांतर्गत तेजस्विनी निधीमधून बचत गटाला सहा लाख रुपयांचे कर्ज बारा टक्के व्याजदराने मिळाले आहे. यातून महिला सदस्यांनी १९ लाखांची उलाढाल केली आहे.
  • अमूल डेअरीला भेट  माविमच्या माध्यमातून गटातील महिलांनी दुग्ध व्यवसायात भरारी घेतली.या सदस्यांना दुग्धोत्पादनातील नवीन संधी लक्षात याव्यात यासाठी गुजरात राज्यातील अमूल डेअरीचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यामुळे गटातील महिलांनी येत्या काळात दुग्धोत्पादन वाढीबरोबरीने प्रक्रिया उद्योग गावामध्ये उभारण्याचे ठरविले आहे.  महिलांना मिळाले प्रशिक्षण  बचतगटातील महिलांकडे एकूण १४४ म्हशी आहेत. गटातील महिलांना म्हशींचे व्यवस्थापन, लसीकरण, चारा, पशूखाद्य नियोजन, दुभत्या म्हशींची काळजी, ॲझोलाचा पशूखाद्य म्हणून वापर आणि दुग्धोत्पादन वाढविण्यासाठीच्या उपाययोजना आदी बाबत सातत्याने प्रशिक्षण दिले जाते. यामुळे महिलांनी म्हशींचे चांगले व्यवस्थापन ठेवले आहे. महिला गटांना परिसरातील गावातून म्हशींसाठी पूरक आहार म्हणून  सरकी ढेप खरेदी करावी लागत होती. त्यामुळे व्यवस्थापन खर्च वाढत होता. हे लक्षात घेऊन एका गटाने गावामध्ये सरकी ढेप विक्री केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे योग्य दरात सरकी ढेप उपलब्ध होते. ‘माविम'चे मिळते पाठबळ महिला आर्थिक विकास महामंडळाने खडकूत गावाला आदर्श गाव म्हणून जाहीर केले आहे. महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड, रमाई लोक संचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक रमा दामोदर या नियमित खडकूत गावात भेट देवून महिला बचत गटांना मार्गदर्शन करतात.  संपर्क- रमा दामोदर,९४०३००४८६३ (व्यवस्थापक, रमाई लोक संचलित साधन केंद्र, अर्धापूर,जि.नांदेड)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com