agriculture news in marathi, Successful launching of Resat-2B satellite | Agrowon

‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; कृषीसाठी उपयोगी
वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी (ता.२२) पहाटे नवा इतिहास रचत "आरआयसॅट-2 बी' या पृथ्वीवर देखरेख ठेवणाऱ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. ढगाळ वातावरणामध्येदेखील हा उपग्रह देखरेख ठेवू शकतो, त्यामुळे लष्करी आणि नागरी अशा दोन्हींसाठी त्याचा वापर करता येईल. पाकिस्तानच्या हद्दीतील सीमेलगतच्या दहशतवादी छावण्यांवरदेखील या उपग्रहाची नजर असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी (ता.२२) पहाटे नवा इतिहास रचत "आरआयसॅट-2 बी' या पृथ्वीवर देखरेख ठेवणाऱ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. ढगाळ वातावरणामध्येदेखील हा उपग्रह देखरेख ठेवू शकतो, त्यामुळे लष्करी आणि नागरी अशा दोन्हींसाठी त्याचा वापर करता येईल. पाकिस्तानच्या हद्दीतील सीमेलगतच्या दहशतवादी छावण्यांवरदेखील या उपग्रहाची नजर असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

"आरआयसॅट-2 बी' हा उपग्रह गुप्तहेरासारखा काम करेल. तो "आरआयसॅट-2'ची जागा घेईल. याआधी दहशतवादी छावण्यांवर देखरेख ठेवण्यासाठी या उपग्रहाचा वापर करण्यात आला होता. यामुळे दहशतवादी हल्ल्याचे अनेक कट उधळून लावण्यात भारताला यश आले होते. हा उपग्रह 2009 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता.

या नव्या उपग्रहामध्ये सिंथेटिक ऍपर्चर रडारचा वापर करण्यात आला असून, ते दिवसा आणि रात्री छायाचित्रे टिपू शकते. तसेच, ढगाळ परिस्थितीमध्येही ते काम करू शकते, असे "इस्रो'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपग्रहाचा जीवनकाळ हा पाच वर्षांचा असून, तो लष्करी स्वरूपाच्या कामासाठीदेखील वापरता येऊ शकतो. तब्बल 25 तासांचे काउंटडाऊन संपुष्टात आल्यानंतर आज पहाटे ध्रुवीय प्रक्षेपकाच्या माध्यमातून सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.

देखरेख, कृषी, वन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये या उपग्रहाचा अधिक प्रभावरीतीने वापर केला जाऊ शकतो. प्रक्षेपणानंतर अवघ्या 15 मिनिटे 30 सेकंदांनी हा उपग्रह कक्षेमध्ये स्थिरावला. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या दृष्टीनेदेखील ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण होती. आतापर्यंत या प्रक्षेपकाच्या माध्यमातून पन्नास टन वजनांचे 354 उपग्रह अंतराळात सोडण्यात आले आहेत. यामध्ये काही राष्ट्रीय, शैक्षणिक कार्यासाठीचे आणि परकी उपग्रहांचाही समावेश आहे. या वेळी "पीएसएलव्ही-सी 46' या प्रक्षेपकाच्या माध्यमातून देशांतर्गत विकसित प्रोसेर्स आणि कमी किमतीची दिशादर्शक यंत्रणा अवकाशात पाठविण्यात आली. या दोन उपकरणांमुळे प्रक्षेपणाच्या क्षेत्रामध्ये क्रांती होणार असल्याचे "इस्रो'चे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले. याशिवाय 3.6 मीटरचा रिब अँटेनाही उपग्रहासोबत पाठविण्यात आला आहे.
.....
अवकाश भरारी
काउंटडाऊन : 25 तास 
उपग्रहाचे वजन : 615 कि.ग्रॅ.
'इस्रो'ची मोहीम : 48 वी

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...