कर्मचाऱ्यांच्या सहभागातून क्राॅपसॅपचे मॉडेल यशस्वी 

कर्मचाऱ्यांच्या सहभागातून क्राॅपसॅपचे मॉडेल यशस्वी
कर्मचाऱ्यांच्या सहभागातून क्राॅपसॅपचे मॉडेल यशस्वी

परभणी ः क्रॅापसॅप हा क्लासिक रोड मॅप आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागातून तयार करण्यात आल्यामुळे कीड व रोग सल्ला प्रकल्प (क्रॅापसॅप) चे मॅाडेल यशस्वी झाले. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला. शेतकऱ्यांचा कृषी विभागाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. राज्याचा कृषी विभाग हा महत्त्वाची विकास यंत्रणा आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानसिकेत बदल करावा. कृषी तंत्रज्ञानाच्या बाबतीत नेहमी अद्ययावत राहावे. संवाद कौशल्य अवगत करून माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत विविध कृषीविषयक सल्ला तसेच माहिती पोचवावी. त्यासाठी समर्पित भावनेने शेतकऱ्यांना सेवा देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी केले.

कृषी विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभाग यांच्यातर्फे कीडरोग सर्वेक्षण प्रकल्प (क्राॅपसॅप) अंतर्गत मंगळवारी (ता. ३०) कृषी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित खरीप हंगामपूर्व मराठवाडा विभागीय कार्यशाळेत ते बोलत होते. कुलगुरू डाॅ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी होते. 

वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डाॅ. पी. जी. इंगोले, कृषी आयुक्तालयातील संचालक (विस्तार व प्रशिक्षण) व्ही. एन. घावटे, विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप (लातूर), प्रतापसिंह कदम (औरंगाबाद), प्राचार्य डाॅ. धर्मराज गोखले, कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. पी. एस. झंवर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे (नांदेड), विजयकुमार पाटील (परभणी), व्ही. डी. लोखंडे (हिंगोली), संतोष आळसे (लातूर), यू. आर. घाटगे (उस्मानाबाद), बाळासाहेब शिंदे (जालना), डाॅ. तुकाराम मोटे (औरंगाबाद) उपस्थित होते.

श्री. दिवसे पुढे म्हणाले, ‘‘तापमानवाढीचा सर्वाधिक धोका कृषी अर्थव्यवस्थेला झाला आहे. पाणी आणि किडींच्या प्रजातींचा पिकांसोबतच मानवी आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या वर्षीपासून क्राॅपसॅप प्रकल्पामध्ये कपाशीवरील गुलाबी बोंड अळी सोबतच मका, ज्वारीवरील लष्करी अळी, उसातील हुमणी या किडींचा समावेश करण्यात आला आहे.’’ 

डाॅ. ढवण म्हणाले, ‘‘क्राॅपसॅपअंतर्गत विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसोबतच कृषी विद्यार्थ्यांचा सहभाग राहील.’’ जगताप यांनी प्रास्ताविक केले. डाॅ. अनंत बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेमध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठातील समन्वयक सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com