आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवार

ग्रामीण भागातील आर्थिक चक्र यामुळे विस्कळीत झाले असल्याने आठवडी बाजार पुन्हा सुरू करावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री, तसेच आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी केली आहे.
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवार
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवार

चंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लागू केलेल्या लॉकडाउनपासून आठवडी बाजार बंद आहेत. ग्रामीण भागातील आर्थिक चक्र यामुळे विस्कळीत झाले असल्याने आठवडी बाजार पुन्हा सुरू करावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री, तसेच आमदार सुधीर मुनगंटीवर यांनी केली आहे.  जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेत त्यांनी ही मागणी केली. आमदार मुनगंटीवार म्हणाले, की अनलॉकच्या विविध टप्प्यांत विविध सवलती देण्यात आल्या. हॉटेल्स, बार यांना परवानगी दिली गेली. परंतु ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचा समजला जाणारे आठवडी बाजार अद्यापही बंद आहेत. यावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांना यामुळे आर्थिक विवंचना सहन करावी लागत आहे. आमदार मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत लवकरच आठवडी बाजार सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com