सुधीर मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार मदत ः सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर  ः जिल्ह्यातील गारपीटग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.  पोंभूर्णा येथील डॉ. श्‍यामाप्रसाद मुखजी वाचनालय सभागृहाच्या नूतनीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, पोंभूर्णा नगराध्यक्षा श्‍वेता वनकर, सभापती अलका आत्रामा, रजिया कुरेशी या वेळी उपस्थित होते. मुनगंटीवार पुढे म्हणाले, जिल्‍ह्याचा सरकारी नोकरीतील टक्‍का वाढावा, याकरिता पोंभूर्णासारख्या तालुक्‍यातील युवकांसाठी श्‍यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. विविध विषयांच्या पुस्तकांसोबतच स्पर्धा परीक्षांना उपयुक्‍त ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी या वेळी दिले. चांदा ते बांदा योजनेअंतर्गत बंधारे निर्माण करण्याची मोहीम हाती घेत जलसंधारणाला बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  उन्नत शेतीतून होईल विकास पोंभूर्णा परिसरात औद्योगिकीकरणाला चालना मिळावी, याकरिता लवकरच एम.आय.डी.सी. करिता जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. टाटा ट्रस्टच्या  मदतीने उन्नत शेती उपक्रमाच्या माध्यमातून समूह शेतीला चालना दिली जाणार आहे. महिला समूहांना स्वयंपूर्ण करण्याकरिता विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com