agriculture news in Marathi sufficient stock of medicine in state Maharashtra | Agrowon

राज्यात औषधाचा मुबलक साठा 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 20 एप्रिल 2020

कोरोनावर अद्याप कोणतेही औषध नसले, तरी त्यासाठी उपयोगात येणाऱ्या औषधांचा राज्यात मुबलक साठा उपलब्ध आहे.

नगरः कोरोनावर अद्याप कोणतेही औषध नसले, तरी त्यासाठी उपयोगात येणाऱ्या औषधांचा राज्यात मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेने अजिबात काळजी करण्याची गरज नाही. राज्यातील रेड झोन वगळता इतर जिल्ह्यांत लवकरच उद्योगधंदे सुरू करण्यात येणार आहेत, असा विश्‍वास अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शनिवारी (ता.१८) व्यक्त केला. 

औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, कि कोरोनावर मात करण्यासाठी दोन महिने तरी विशिष्ट औषध उपलब्ध होणार नाही. सुरवातीच्या काळात सॅनिटायझरचा तुटवडा होता. त्यानंतर सरकारने तातडीने राज्यातील 288 कारखान्यांना सॅनिटायझर बनविण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता तरी सॅनिटायझरचा तुटवडा येणार नाही. फूडच्या बाबतीत बहुतांश कंपन्यांचे उद्योगधंदे राज्याच्या बाहेर आहे. त्यामुळे मजूर उपस्थिती कमी असून, उत्पादनही कमी होत आहे. मात्र, आता सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आगामी काळात कोणत्याही गोष्टीचा तुटवडा भासणार नाही. 

अन्यथा कारवाई 
लॉकडाउनच्या काळात अनेकांनी मुदतबाह्य औषधे विकण्याचा प्रयत्न केला होता. त्याला तातडीने आळा घालण्यात आला. यापुढे चढ्या भावाने किंवा मुदतबाह्य औषधे विकण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी स्पष्ट केले. 
 


इतर अॅग्रो विशेष
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...
पपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...
कृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...
कुलगुरू निवडीचे निकष ऐरणीवर पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये...
काजू बागायतदारांना गंडा घालणाऱ्या...सिंधुदुर्ग: काजू बागायतदारांना जादा दराचे आमिष...
सोयाबीन ठरेल ‘मॅजिकबीन’ नागपूर: देशात यावर्षी सोयाबीन खालील क्षेत्रात घट...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...