agriculture news in marathi, sufficient sugarcane chop workers, kolhapur, maharashtra | Agrowon

कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात पुरेसे मजूर उपलब्ध झाल्याने कारखान्यांनी ऊसतोडणीची पहिली टप्प्यातील चिंता तरी मिटली आहे. मराठवाडा भागात यंदा तीव्र दुष्काळ असल्याने मजुरांना ऊसतोडणीशिवाय पर्याय राहिला नाही. परिणामी त्या भागातील मजूर मोठ्या संख्येने या भागात ऊसतोडणीसाठी दाखल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २० टक्के ऊसतोडणी मजूर अधिक आले आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात तरी ऊसतोडणी यंत्राचा वापर फारसा गतीने होणार नाही अशी शक्‍यता आहे.

कोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात पुरेसे मजूर उपलब्ध झाल्याने कारखान्यांनी ऊसतोडणीची पहिली टप्प्यातील चिंता तरी मिटली आहे. मराठवाडा भागात यंदा तीव्र दुष्काळ असल्याने मजुरांना ऊसतोडणीशिवाय पर्याय राहिला नाही. परिणामी त्या भागातील मजूर मोठ्या संख्येने या भागात ऊसतोडणीसाठी दाखल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २० टक्के ऊसतोडणी मजूर अधिक आले आहेत. यामुळे पहिल्या टप्प्यात तरी ऊसतोडणी यंत्राचा वापर फारसा गतीने होणार नाही अशी शक्‍यता आहे.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ऊसतोडी सुरू झाल्या. दिवाळीपूर्वी शेतकरी संघटनांनी आंदोलन केल्याने तोडी बंद होत्या. परंतु उष्णतेमुळे उसाला रिकव्हरी नसल्याने कारखान्यांनी आंदोलनातही नेटाने तोडणी न करता कारखाने बंद ठेवले. दिवाळी होताच संघटना व कारखानदारांच्या सकारात्मक चर्चा होऊन तोडणी सुरू झाली. दिवाळीनंतर तातडीने बाहेर गावाहून मजूर दाखल झाले.

प्रत्येक वर्षी एखाद्या ऊसतोडणी टोळीतील एखाद दुसरा कामगार येत नाही. यामुळे त्या टोळीच्या इतर सहकाऱ्यांवर त्याचा ताण पडतो. परंतु, यंदा पाऊसच नसल्याने कुठेच काही पिकले नाही. यामुळे गेल्या वर्षी न आलेले उसतोडणी मजूरही यंदा या भागात दाखल झाले आहे. सुदैवाने आंदोलन फार वेळ चालले नसल्याने तोडणी मजुरांच्यात समाधान आहे. पहिल्या चार दिवसांच्या तोडणीचा अंदाज घेतला असता पावसाचा अभाव व ‘हुमणी’मुळे उत्पादन घटण्याचे संकेत आहेत. जादा मजूर व कमी वजनामुळे ऊसतोडणीला लागणारा कालावधी कमी होत आहे. अंदाजे दहा ते वीस टक्‍क्‍यांपर्यंत ऊस उत्पादन घटण्याची शक्‍यता कारखानदारांनी वर्तवली आहे.

उसाचे टनेज घटणार असल्याने पूर्ण क्षमतेने ऊस गाळप होण्यासाठी कारखान्यांना कसरत करावी लागणार आहे. अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढविल्याने कारखान्यांना बाहेरून ऊस आणून हंगामात पुरेल इतका ऊस गाळप करण्याचे आव्हान आहे. यासाठी प्रत्येक कारखान्याचा ऊसतोडणी विभाग प्रयत्न करत आहे. यामुळे उसाची तोड यंदा लवकर होर्इल असा अंदाज आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...