agriculture news in marathi Sufficient water storage in Gadhingalaj, Ajara Dams, Kolhapur | Agrowon

गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 डिसेंबर 2020

आजरा, गडहिंग्लज परिसरात कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात सुमारे ५९३ दशलक्ष घनफूट (अर्धा टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. याचा लाभ रब्बी, उन्हाळी पिकांना होणार आहे.

आजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही पावसाने हात दिल्याने तालुक्‍यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. पाटबंधारे विभागाने पाणी अडवल्याने बंधारे तुडुंब भरले आहेत. आजरा, गडहिंग्लज परिसरात कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात सुमारे ५९३ दशलक्ष घनफूट (अर्धा टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. याचा लाभ रब्बी, उन्हाळी पिकांना होणार आहे.

यंदा तालुक्‍यात सुमारे २ हजार ६०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चित्री प्रकल्पात ३ हजार १५५ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला आहे. महापूर नियंत्रणासाठी महसूल व पाटबंधारे प्रशासनाने चित्रीतील पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी सोडल्यामुळे चित्री प्रकल्प भरण्यास यंदा गतवर्षीपेक्षा थोडा विलंब लागला. पण पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेन भरला आहे. १ हजार ८८६  दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. त्याचा लाभ आजरा व गडहिंग्लज तालुक्‍यातील रब्बी व उन्हाळी पिकांना होणार आहे.

हिरण्यकेशी, चित्री व तारओहळमधील बंधाऱ्यात पाटबंधारे विभागाने पाणी अडवले आहे. आजरा तालुक्‍यातील करपेवाडी ते गडहिंग्लज तालुक्‍यातील खणदाळ बंधाऱ्यापर्यंत पाणीसाठा करण्यात आला आहे. डिंसेबर महिन्याअखेर चित्री प्रकल्पातून आवश्‍यकतेनुसार पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. सर्फनाला प्रकल्पाअंतर्गत आजरा तालुक्‍यातील सुळेरान, देवर्डे, दाभिल, साळगाव या बंधाऱ्यात १५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. 


इतर ताज्या घडामोडी
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...
रत्नागिरीत शिवसेनेला कौल रत्नागिरी : जिल्ह्यातील ३६० ग्रामपंचायतींचे निकाल...
सोलापुरात प्रस्थापितांना धक्कासोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
उमरेड येथील महिलांनी स्थापन केली शेतकरी...उमरेड. जि. नागपूर : शेतीमधील विषम परिस्थितीची दखल...
स्वाभिमानीचा विजयासाठी संघर्षकोल्हापूर : कोण म्हणतंय येत नाही, आल्याशिवाय राहत...
‘ब्लॅक राइस’ बियाणे निर्मितीचे काम सुरुरत्नागिरी ः तालुक्यातील शिरगाव येथील कृषी संशोधन...
सोलापुरात वांगी, गाजराला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात महाविकास आघाडी, भाजपला संमिश्र...नागपूर : विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत...
वऱ्हाडात महाविकास आघाडीला यश अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या...
जळगाव जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव...जळगाव : परभणी जिल्ह्यात आढळून आलेल्या ‘बर्ड फ्लू’...