नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) संरक्षित शेतीत वापरल्या जात असलेल्या अनेक घटकांना
बातम्या
गडहिंग्लज, आजऱ्यात पुरेसा पाणीसाठा
आजरा, गडहिंग्लज परिसरात कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात सुमारे ५९३ दशलक्ष घनफूट (अर्धा टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. याचा लाभ रब्बी, उन्हाळी पिकांना होणार आहे.
आजरा, जि. कोल्हापूर : दर वर्षीप्रमाणे यंदाही पावसाने हात दिल्याने तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा झाला आहे. पाटबंधारे विभागाने पाणी अडवल्याने बंधारे तुडुंब भरले आहेत. आजरा, गडहिंग्लज परिसरात कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यात सुमारे ५९३ दशलक्ष घनफूट (अर्धा टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. याचा लाभ रब्बी, उन्हाळी पिकांना होणार आहे.
यंदा तालुक्यात सुमारे २ हजार ६०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चित्री प्रकल्पात ३ हजार १५५ मिलिमीटरपर्यंत पाऊस झाला आहे. महापूर नियंत्रणासाठी महसूल व पाटबंधारे प्रशासनाने चित्रीतील पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी सोडल्यामुळे चित्री प्रकल्प भरण्यास यंदा गतवर्षीपेक्षा थोडा विलंब लागला. पण पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेन भरला आहे. १ हजार ८८६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. त्याचा लाभ आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील रब्बी व उन्हाळी पिकांना होणार आहे.
हिरण्यकेशी, चित्री व तारओहळमधील बंधाऱ्यात पाटबंधारे विभागाने पाणी अडवले आहे. आजरा तालुक्यातील करपेवाडी ते गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळ बंधाऱ्यापर्यंत पाणीसाठा करण्यात आला आहे. डिंसेबर महिन्याअखेर चित्री प्रकल्पातून आवश्यकतेनुसार पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. सर्फनाला प्रकल्पाअंतर्गत आजरा तालुक्यातील सुळेरान, देवर्डे, दाभिल, साळगाव या बंधाऱ्यात १५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.
- 1 of 1496
- ››