सीताफळ संशोधन केंद्राच्या कलमांना परराज्यांतूनही मागणी

सीताफळाच्या गराचा मिल्कशेक, रबडी, आइस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो. शिवाय सीताफळाच्या गराची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सीताफळ लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्यावा. - डॉ. गोविंद मुंडे, प्रभारी अधिकारी, सीताफळ संशोधन केंद्र, अंबाजोगाई
सिताफळ कलम
सिताफळ कलम

अंबाजोगाई जि. बीड: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत अंबाजोगाई येथील सीताफळ संशोधन केंद्राच्या वाणांना परराज्यातूनही मागणी वाढली आहे. तमीळनाडू, आंध्रप्रदेश व मध्यप्रदेश या तीन राज्यांत केंद्राची सीताफळाच्या विविध वाणांची कलम पोहचल्याची माहिती या केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. गोविंद मुंडे यांनी दिली.  बदलत्या हवामानात तग धरू शकणारे फळपीक म्हणून सीताफळ पुढे येत आहे. दिवसेंदिवस सीताफळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून व्यापारीदृष्ट्या सीताफळाची लागवड केली जात आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत असलेल्या अंबाजोगाई सीताफळ संशोधन केंद्रात यावर्षी कुलगुरू डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीताफळाची धारुर-६, बालानगर, टिपी-७ आदीसह रामफळ व हनुमान फळाची पन्नास हजार जातिवंत रोपे तयार केली गेली. प्रतिकलम चाळीस रुपये दराने त्याची विक्री सुरू करण्यात आली. त्यापैकी जवळपास दहा हजार कलम आजवर विकल्या गेली आहेत. त्यापैकी जवळपास सहा हजार कलम तमीळनाडू, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या राज्यात गेली आहेत.  तमीळनाडू कृषी विद्यापीठानेही काही कलम नेली असल्याचे डॉ. मुंडे म्हणाले. संशोधन केंद्राने निर्मित केलेल्या विविध वाणांची लागवड खानदेश, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाडा विभागांत मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. यावर्षी तमीळनाडू व मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांनी  सीताफळाची कलमे खरेदीला पसंती दिली आहे.

धारूर सहा वाणांच्या कलमांना जास्त पसंती अंबाजोगाई सीताफळ संशोधन केंद्राने निर्माण केलेल्या सीताफळातील विविध वाणातील धारुर-६ या वाणास मोठी मागणी आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे फळाचा आकार मोठा असून वजन ४०० ग्रामपेक्षा जास्त आहे तर साखरेचे प्रमाण १८ टक्के व घनदृव्याचे प्रमाण २४ टक्के असल्यामुळे प्रक्रिया उद्योगामध्ये याची मागणी मोठी आहे. प्रक्रिया उद्योगाचा विचार करता धारुर- ६ व बालानगर या फळांची मागणी असल्याचे डॉ. मुंडे म्हणाले.  तीन वर्षांत वाढले सीताफळाचे क्षेत्र महाराष्ट्रात रोजगार हमी योजना व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानअंतर्गत झालेल्या सीताफळ लागवडीच्या २०११-१२ च्या आकडेवारीनुसार राज्यात जवळपास ५२७०३ हेक्‍टवर सीताफळ लागवड होती. अलीकडच्या तीन वर्षांत त्यामध्ये जवळपास १५ ते १६ हजार हेक्‍टर क्षेत्राच वाढ झाली. याचा विचार करता राज्यात सीताफळाचे क्षेत्र ६५ हजार हेक्‍टरच्या पुढे असण्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्‍त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com