agriculture news in marathi, Sugar can be exporter in behalf food oil | Agrowon

खाद्यतेलाच्या बदल्यात साखर निर्यातीचा प्रस्ताव
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

इंडोनेशियाकडून खाद्यतेल विकत घेण्याच्या बदल्यात भारतातून कच्ची साखर निर्यात करण्याच्या पर्यायावर विचार सुरू आहे. जादा साखर उत्पादन आणि कोसळलेले दर, यामुळे अडचणीचे ढग दाटून आलेल्या देशातील साखर उद्योगाला साखर निर्यातीमुळे दिलासा मिळू शकतो. 

इंडोनेशियन शुगर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने नुकतीच नवी दिल्ली येथे भारतीय साखर उद्योगाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. त्यावेळी `खाद्यतेलाच्या बदल्यात साखर निर्यात` या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. देशातील साखर उद्योगाकडून इंडोनेशियाला मोठ्या प्रमाणात साखर निर्यात करण्याची शक्यता चाचपून पाहिली जात आहे.

पुढील वर्षी (२०१८-१९) देशात उसाचे आणि साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात खोडव्याचं पीक अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे. हा ऊस २०१८-१९ मध्ये तोडणीला येणार आहे. त्यामुळे साखरेचे बंपर उत्पादन होऊन भाव कोसळण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर इंडोनेशियन साखर उद्योग भारतातून साखर आयात करण्यास उत्सुक आहे, असे नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले. 

भारताची खाद्यतेलाची गरज प्रामुख्याने इंडोनेशियातून आयात करून भागवली जाते. त्यामुळे खाद्यतेलाच्या बदल्यात इंडोनेशियाला साखर निर्यात करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे ते म्हणाले.  

इतर अॅग्रोमनी
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलहळदीच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
कागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...
पोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...
स्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...
ऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...
उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...
वायदे बाजार : मका, गहू, हळदीच्या...सध्या बाजारपेठेत मक्याची मागणी वाढत आहे. या...
सेंद्रिय घटकांच्या वापरातून शेती आणली...पिकांचा वाढता उत्पादन खर्च, जमिनीची सुपीकता या...
कापूस, मका, सोयाबीनच्या भावात वाढरब्बी पिकांचे भाव आवकेमुळे कमी झाले आहेत....
घरपोच चारा विक्रीतून मिळविले...नागपूरपासून ६५ कि.मी. वरील अरोली (ता. मौदा) हे...
सुधारित बहुपीक पद्धतीतून उत्पन्नामध्ये...चिदगिरी (जि. नांदेड) येथील कैलास गिरी यांनी...
सरकीने मोडला दराचा उच्चांकजळगाव ः कापसासह सरकीच्या दरानी नवा उच्चांक गाठला...