ऊस लागवड
ऊस लागवड

देशात ऊस लागवडीत वाढ

नवी दिल्ली ः देशात मागील वर्षी मुबलक ऊस उपलब्ध झाल्याने साखर उत्पादनात वाढ होऊन अतिरिक्त साखर साठा आणि दराचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे काही राज्यांत ऊस लागवड कमी करण्यासाठी प्रयत्न झाले. उत्तर प्रदेशात तर खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना बिलासोबत नोटिसा देऊन लागवड न करण्यास सांगितले होते. तरीही केंद्रीय कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ऊस लागवड १.६ टक्क्यांनी वाढून ५०.५ लाख हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षी ४९.७ लाख हेक्टवर ऊस होता.  देशात अतिरिक्त साखर उत्पादनामुळे दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अनेक राज्यांतील खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना कमी ऊस लागवड करण्याचे आवाहन केले होते. उत्तर प्रदेशात तर खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिलासोबत नोटीस देऊन लागवड न करण्याचे आवाहन केले होते. तसेच ऊस विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान आणि सुविधा कमी केल्या आहेत. तरीही लागवड वाढली आहे. सध्या देशात ५०.५ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. मागील वर्षी याच काळात ४९.७ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. देशात सरासरी लागवड क्षेत्र हे ४५.४ लाख हेक्टर तर मागील पाच वर्षातील हंगामात होणाऱ्या ५० लाख हेक्टर सरासरीपेक्षा जास्त  आहे. 

उत्तर प्रदेशातही वाढ देशात उत्तर प्रदेश हे ऊस उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. मागील वर्षी येथे २२.६ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. या उसाचे गाळप कारखान्यांनी केले मात्र अतिरिक्त उत्पानामुळे बाजारात साखरेचे पडले. त्यामुळे राज्यातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचा ऊस गाळप केल्याची १२ हजार कोटींची थकबाकी अजून शिल्लक आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना इतर पिके घेण्याचे आवाहन केले. खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या सुविधा कमी करुन लागवड न करण्याच्या नोटिसा दिला. परंतु याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसते. उत्तर प्रदेशात ऊस लागवड २.२ टक्क्यांनी वाढून २३.१ लाख हेक्टरने लागवड वाढली आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटकातही लागवड अधिक उत्तर प्रदेशनंतर देशात महाराष्ट्रात अधिक ऊस लागवड होते. मागील वर्षी महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात अव्वल ठरले होते. मात्र येथेही साखर दरामुळे थकबाकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी ९.३७ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. यंदा ९.४९ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा लागवडीत १.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऊस लागवडीत महाराष्ट्रानंतर कर्नाटकचा नंबर लागतो. कर्नाटकात मागील वर्षी ४.२७ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली होती, यंदा ४.३८ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. तेथे मागील वर्षीपेक्षा २.६ टक्यांनी ऊस क्षेत्र वाढले आहे. 

गुजरातमध्ये घट गुजरातमध्ये ऊस लागवडीत मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. येथील शेतकऱ्यांनी इतर पिकांना पसंती दिल्याने उसाचा पेरा कमी झाला आहे. गुजरातमध्ये मागील वर्षी १.८६ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. त्या तुलनेत यंदा १.८३ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत येथे यंदा १.६ टक्के कमी लागवड झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com