agriculture news in marathi, sugar cane sowing area increased in country, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

देशात ऊस लागवडीत वाढ

कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

नवी दिल्ली ः देशात मागील वर्षी मुबलक ऊस उपलब्ध झाल्याने साखर उत्पादनात वाढ होऊन अतिरिक्त साखर साठा आणि दराचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे काही राज्यांत ऊस लागवड कमी करण्यासाठी प्रयत्न झाले. उत्तर प्रदेशात तर खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना बिलासोबत नोटिसा देऊन लागवड न करण्यास सांगितले होते. तरीही केंद्रीय कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ऊस लागवड १.६ टक्क्यांनी वाढून ५०.५ लाख हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षी ४९.७ लाख हेक्टवर ऊस होता. 

नवी दिल्ली ः देशात मागील वर्षी मुबलक ऊस उपलब्ध झाल्याने साखर उत्पादनात वाढ होऊन अतिरिक्त साखर साठा आणि दराचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे काही राज्यांत ऊस लागवड कमी करण्यासाठी प्रयत्न झाले. उत्तर प्रदेशात तर खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना बिलासोबत नोटिसा देऊन लागवड न करण्यास सांगितले होते. तरीही केंद्रीय कृषी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात ऊस लागवड १.६ टक्क्यांनी वाढून ५०.५ लाख हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षी ४९.७ लाख हेक्टवर ऊस होता. 

देशात अतिरिक्त साखर उत्पादनामुळे दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच अनेक राज्यांतील खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना कमी ऊस लागवड करण्याचे आवाहन केले होते. उत्तर प्रदेशात तर खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिलासोबत नोटीस देऊन लागवड न करण्याचे आवाहन केले होते. तसेच ऊस विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान आणि सुविधा कमी केल्या आहेत. तरीही लागवड वाढली आहे. सध्या देशात ५०.५ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. मागील वर्षी याच काळात ४९.७ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. देशात सरासरी लागवड क्षेत्र हे ४५.४ लाख हेक्टर तर मागील पाच वर्षातील हंगामात होणाऱ्या ५० लाख हेक्टर सरासरीपेक्षा जास्त  आहे. 

उत्तर प्रदेशातही वाढ
देशात उत्तर प्रदेश हे ऊस उत्पादनात अग्रेसर राज्य आहे. मागील वर्षी येथे २२.६ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. या उसाचे गाळप कारखान्यांनी केले मात्र अतिरिक्त उत्पानामुळे बाजारात साखरेचे पडले. त्यामुळे राज्यातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचा ऊस गाळप केल्याची १२ हजार कोटींची थकबाकी अजून शिल्लक आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना इतर पिके घेण्याचे आवाहन केले. खासगी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या सुविधा कमी करुन लागवड न करण्याच्या नोटिसा दिला. परंतु याचा फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसते. उत्तर प्रदेशात ऊस लागवड २.२ टक्क्यांनी वाढून २३.१ लाख हेक्टरने लागवड वाढली आहे. 

महाराष्ट्र, कर्नाटकातही लागवड अधिक
उत्तर प्रदेशनंतर देशात महाराष्ट्रात अधिक ऊस लागवड होते. मागील वर्षी महाराष्ट्र साखर उत्पादनात देशात अव्वल ठरले होते. मात्र येथेही साखर दरामुळे थकबाकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात मागील वर्षी ९.३७ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. यंदा ९.४९ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. यंदा लागवडीत १.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऊस लागवडीत महाराष्ट्रानंतर कर्नाटकचा नंबर लागतो. कर्नाटकात मागील वर्षी ४.२७ लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली होती, यंदा ४.३८ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस आहे. तेथे मागील वर्षीपेक्षा २.६ टक्यांनी ऊस क्षेत्र वाढले आहे. 

गुजरातमध्ये घट
गुजरातमध्ये ऊस लागवडीत मागील वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. येथील शेतकऱ्यांनी इतर पिकांना पसंती दिल्याने उसाचा पेरा कमी झाला आहे. गुजरातमध्ये मागील वर्षी १.८६ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. त्या तुलनेत यंदा १.८३ लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत येथे यंदा १.६ टक्के कमी लागवड झाली आहे.


इतर अॅग्रो विशेष
विदर्भामध्ये कडधान्य, फळबाग, भाजीपाला...विदर्भात कापूस, सोयाबीन, संत्रा या पारंपरिक...
जुन्नर तालुका झाला 'टोमॅटो क्लस्टर'सिंचन सुविधा, लागवडीचे नवे तंत्र आणि जुन्नर कृषी...
सिंधुदुर्गात काजू लागवड, प्रक्रिया...डोंगर-उताराची जमीन, पोषक वातावरण, काजू बीचे...
मसाला पिके, भाजीपाला उत्पन्नाचे नवे साधनरत्नागिरी जिल्ह्यात नारळ, सुपारी बागांमध्ये...
मळीवरील निर्यातबंदी उठविलीमुंबई : राज्यात ‘कोरोना’च्या...
कीड- अवशेषमुक्त शेतीमाल निर्यातीसाठी २१...पुणे : भारतीय शेतीमालास जगभरातून मागणी असताना,...
आजपासून कृषी संजीवनी सप्ताहपुणे  : पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे  : राज्यात मॉन्सूनच्या पावसाने जोर धरला...
खरीप हंगामासाठी पीकविमा योजना लागूपुणे : शेतकऱ्यांना उत्सुकता लागून असलेल्या...
विदर्भातील शेतकऱ्यांनाही खुणावताहेत...संत्रा, कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा ही विदर्भाची...
भाजीपाला थेट विक्रीतून युवा माउली गटाने...औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगाव (ता. पैठण) येथील...
शेती बदलते आहे कूस!पुणे  ः गेल्या आठ ते दहा वर्षांत...
कापूस पट्ट्यातील लाडलीला भेंडीने दिली...जळगाव जिल्हा कापसासाठी ओळखला जातो. येथील लाडली (...
नाशिक पट्ट्यात वाढतोय 'शेवगा' पिकाचा...नाशिक जिल्ह्यात कसमादे पट्ट्यात डाळिंबाखालील...
सुगंधी जिरॅनियम शेतीसह प्रक्रियेलाही...ऊस, आले, हळद, भात, बाजरी, स्ट्रॅाबेरी इ. प्रमुख...
विक्री तंत्रांमध्ये होतोय बदलशेतकऱ्यांच्या नव्या पिढीने उत्पादनासह विक्रीतही...
चव, रंगाचे वैशिष्ट्य राखून असणारा...सोलापूरसारख्या दुष्काळी भागात डाळिंब,...
विक्री व्यवस्थेत बदल करून शेतकऱ्यांनीच...अलीकडील वर्षांत शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन विक्री...
फूलशेतीतून मिळाली नवी दिशासांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्य़ात द्राक्ष,...
लिंबाच्या ‘क्लस्टरने सुधारले अर्थकारणपरभणी जिल्ह्यातील राधेधामणगाव (ता.सेलू) तसेच...