मुंबईत आजपासून तीनदिवसीय साखर परिषद

मुंबईत आजपासून  तीनदिवसीय साखर परिषद
मुंबईत आजपासून तीनदिवसीय साखर परिषद

मुंबई : जागतिक पातळीवरील साखरेची मागणी-पुरवठा तसेच संधी आव्हानांवर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय साखर व्यापार संघ (एआयएसटीए)च्या वतीने १ ते ३ सप्टेंबर दरम्यान साखर परिषद मुंबईत आयोजीत करण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते या परिषदेचे उद्‌घाटन होणार असून, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार समारोप करणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल विठ्ठलानी यांनी दिली. जागतिक पातळीवरील साखरेचे आयात आणि निर्यातीच्या धोरणांवर परिषदेत विचारमंथन होणार आहे. भारत, ब्राझिल, युरोपियन युनियन, थायलंडमधील प्रतिनिधी परिषदेत सहभागी होणार आहेत. साखर मार्केट्स, वाहतूक, वित्तपुरवठ्यात धोरणात्मक अंगाने चर्चा होईल.  मुंबईतील परळ येथील आयटीसी ग्रॅण्ड सेंट्रल हॉटेलमधे १ ते ३ सप्टेंबर दरम्यान साखर परिषद पार पडणार आहे. परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय अन्न व सार्वजनिक राज्यमंत्री सी.आर. चौधरी, माजी अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांची या वेळी उपस्थिती असणार आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचीही साखर परिषदेला उपस्थिती लाभणार असल्याचे भारतीय साखर व्यापार संघाने कळविले आहे. राज्यात ऊस पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र ९ लाख ४२ हजार हेक्टर इतके असून भारतातील एकूण साखर उत्पादनापैकी १/३ उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. देशाच्या एकुण साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा सुमारे ३५ टक्के इतका आहे. महाराष्ट्रातील साखर उद्योगामधून केंद्र आणि राज्य शासनास सुमारे २२०० कोटी रुपये महसुलाच्या रुपाने मिळतात. साखर उद्योग निसर्गाच्या अनियमिततेशी निगडित आहे. राज्यातील पर्जन्यमानावर साखर उद्योग मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. मुबलक उसाच्या उपलब्धतेबाबत असणाऱ्या अनिश्‍चिततेमुळे साखर उद्योगावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील साखर आणि उपपदार्थांच्या दरामधील अनिश्चिततेमुळे साखर उद्योगावर दरवर्षी प्रतिकूल परिणाम होतो. ऊस लागवड उत्पादन आणि साखरेच्या मार्केटच्या अनुषंगाने समस्यांवर साधकबाधक चर्चा होऊन धोरणे निश्चित होतील, अशी अपेक्षा साखर परिषदेकडून व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com