पुण्यात उद्यापासून साखर परिषद

पुण्यात उद्यापासून साखर परिषद
पुण्यात उद्यापासून साखर परिषद

कोल्हापूर: राज्य सहकारी बॅंकेच्या वतीने पुणे येथे ५ ते ७ जुलैदरम्यान पुण्यात ‘साखर परिषद २०-२०’चे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या परिषदेत साखर उद्योगाचा जागर होणार आहे. साखर उद्योगातील नवनवीन तंत्रज्ञान, सध्याच्या अडचणींवर मात करण्यासाठीच्या उपाययोजना, यशस्वी उद्योजकांचे अनुभव परिषदेत ऐकता येणार आहे.   पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अन्न आणि सार्वजनिक पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्यासह माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपस्थित राहणार आहेत.  राज्य सहकारी बॅंकेने १०० वर्षांचा टप्पा पार केला आहे. सहकाराच्या माध्यमातून नवनवे प्रकल्प, संकल्प यशस्वी करून ग्रामीण अर्थकारण मजबूत करणाऱ्या या बॅंकेने जागतिक गुणवत्ता सिद्ध केली. उत्पन्नातून कर्जाची वसुली व त्यासाठी कर्जदार साखर कारखान्यांना उत्पन्नक्षम बनविणे हे राज्य बॅंकेचे धोरण असून, त्याचाच एक भाग म्हणून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  परिषदेच्या निमित्ताने तीन दिवस शासकीय उपेक्षित धोरणांवर चर्चा, नुकसानीतील कारखान्यांची कारणमीमांसा, सद्यःस्थिती व भविष्यातील वाटचाल, कार्यक्षमतेचा पूर्ण वापर, खर्चावर नियंत्रण, इथेनॉल धोरण, सहवीज निर्मिती प्रकल्प, ऊस लागवड, नवनवीन बियाणे आदी विषयांवर सखोल मंथन होणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबरच काही कारखानदारांचीही व्याख्याने होणार आहेत.  परिषदेचे औपचारिक उद्‌घाटन शनिवारी (ता. ६) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, सहकारमंत्री सुभाष देशमुख, बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर आदी उपस्थित राहणार आहेत; तर समारोप रविवारी (ता. ७) होणार असून, त्याला केंद्रीय मंत्री गडकरी व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com