agriculture news in Marathi sugar export affected by container shortage Maharashtra | Agrowon

निर्यातीची साखर वाहतूक कंटेनर अभावी अडचणीत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जानेवारी 2021

केंद्राच्या साखर निर्यात अनुदान योजनेमुळे निर्यातीचा मार्ग मोकळा झाला असला तरी पुरेशा कंटेनर अभावी साखरेची वाहतूक अडचणीत आली आहे.

कोल्हापूर: केंद्राच्या साखर निर्यात अनुदान योजनेमुळे निर्यातीचा मार्ग मोकळा झाला असला तरी पुरेशा कंटेनर अभावी साखरेची वाहतूक अडचणीत आली आहे. परिणामी निर्यात करार होवूनही साखरेची परदेशात होणारी वाहतूक संथगतीने होत आहे. करार झालेली साखर देशाबाहेर तातडीने पाठविण्याचे मोठे आव्हान आता निर्यातदारांपुढे उभे ठाकले आहे. या स्थिती मुळे निर्यातदारांना साखर खरेदी करतानाही मर्यादा येत आहेत.

केंद्राने अनुदान योजना जाहीर करुन एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एप्रिलपर्यंत चांगले दर राहण्याची शक्यता असल्याने कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य दिले. जानेवारीच्या मध्यापर्यंत देशातून सुमारे वीस लाख टनापर्यंत निर्यात करार झाले. इंडोनेशियाने भारतीय साखरेसाठी उत्सुकता दाखविल्याने करार चांगले झाले. परंतु यानंतर मात्र वेगळीच समस्या निर्यातदार व कारखानदारांपुढे उभी राहिली. 

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे बहुतांशी देशांच्या आयात निर्यातीच्या व्यवहारात अडथळे निर्माण झाले. यामुळे भारताकडे ये जा करणाऱ्या कंटेनरच्या कंपन्यांनी इतर ठिकाणीही व्यवसाय सुरु केला. परिणामी निर्यातदारांना साखर बंदरातून परदेशात नेणे अडचणीचे बनले आहे. 

बंदरापर्यंत वाहतूक करणारे ट्रक ही वेळेत उपलब्ध होत नसल्याने आता वाहतुकीचा मोठा अडथळा निर्यातीपुढे आला आहे. साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर कंपन्यांनी भाड्यातही जवळ जवळ चाळीस टक्यापर्यंत वाढ केली. याचाच परिणाम साखरेची वाहतूक करणे खर्चिक ठरत आहे. यामुळे निर्यात करार होवूनही साखरेची प्रत्यक्ष वाहतूक करणे जिकिरीचे बनले असल्याचे निर्यातदार सूत्रांनी सांगितले.

सात लाख टनांचे करार
गेल्या महिन्याच्या कालावधीत राज्यातून विविध कारखान्यांचे मिळून सात लाख टनांचे करार झाले आहेत. प्रत्यक्षात मात्र केवळ एक ते दीड लाख टन साखरेची वाहतूक होवू शकली. साखरेच्या वाहतुकीलाच अडथळे येत असल्याने आता निर्यातदारांना नवीन करारापेक्षा करार झालेली साखरच वेळेत उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
 


इतर बातम्या
बुलडाण्यात बीजोत्पादनाचा भार महिलांच्या...बुलडाणा ः पूर्वापार होत असलेल्या शेतीत महिलांचे...
‘मागेल त्याला शेततळे’च्या ८४ कोटी...नगर ः कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे...
कृषिपंप रिवाइंडिंग करणाऱ्या महिला...हिंगोली ः जिल्ह्यातील आखाडा बाळापूर (ता.कळमनुरी)...
बीज परीक्षण करतात ‘मिळून साऱ्याजणी’ परभणी ः परभणी येथील कृषी विभागाच्या ‘आयएसओ’...
अडीच कोटी उलाढाल करणाऱ्या शेतकरी...जळगाव ः वर्षाला सुमारे अडीच कोटी रुपये एकूण...
मनीषाताईंनी विकसित केले तीन गुंठ्यांत...सोलापूर ः पोषण मूल्यावर आधारित अवघ्या तीन...
शेतकरी, ग्रामीण भागाचे राज्याच्या...पुणे : राज्याचा अर्थसंकल्प आज (ता. ८) अर्थ व...
पोलिस पाटलांना दरमहा १५ हजार मानधन द्यानाशिक : पोलिस पाटील पद शासन यंत्रणेतील गाव...
महिलांची शेतकरी कंपनीच्या माध्यमातून...पुणे ः महिला उत्पादक शेतकऱ्यांचे संघटन करून...
...त्या तिघींनी पापड उद्योगातून जपली...कोल्हापूर : ‘त्या‘ तिघी एकमेकाला सावरणाऱ्या....
कांदा चाळीचे अखेर मिळाले अनुदाननगर ः कृषी विभागाने पूर्वपरवानगी दिल्यानंतर २०१८-...
हरभऱ्‍याचा उतारा यंदा घसरला, एकरी ३ ते...सुलतानपूर, जि. बुलडाणा : यंदाच्या हंगामात चांगला...
मुलींनी सांभाळली वडिलांची शेती नांदेड : हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील गणेश...
‘समृद्धी’च्या सोबतीने बुलेट ट्रेन...अकोला : राज्यात साकारत असलेल्या नागपूर-मुंबई...
दीड एकरातील डाळिंबावर फिरवला नांगर रिसोड, जि. वाशीम : अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने...
हळदीला दराची झळाळी, उत्पादनातील घटीने...नागपूर : यंदा मागील दोन महिन्यांत हळदीच्या भावात...
अर्हता डावलून दिली जातेय कृषी विभागात... नागपूर : वर्ग चार ते कृषी सहाय्यक पदोन्नतीसाठी...
विदर्भात अवकाळीची शक्यता पुणे : दक्षिण आसामच्या परिसरात चक्रीय स्थिती तयार...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
म्हैसाळ योजनेचे पाणी तिसऱ्या टप्प्यात... सांगली : म्हैसाळ योजनेचे पंप धिम्या गतीने सुरू...