Agriculture news in Marathi Sugar export agreement at 57 lakh tonnes | Agrowon

साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७ लाख टनांच्या वर गेले आहेत. ऑगस्ट अखेर ५५ लाख टन साखर प्रत्यक्षात निर्यात झाली. सप्टेंबर महिन्याअखेर आणखी ५ ते ६ लाख टन साखरेचे करार होण्याची अन्न मंत्रालय अपेक्षा आहे.

कोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७ लाख टनांच्या वर गेले आहेत. ऑगस्ट अखेर ५५ लाख टन साखर प्रत्यक्षात निर्यात झाली. सप्टेंबर महिन्याअखेर आणखी ५ ते ६ लाख टन साखरेचे करार होण्याची अन्न मंत्रालय अपेक्षा आहे.

अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविडच्या साथीतही अन्न मंत्रालय, कारखानदार, आणि वाहतूकदार यांच्यात सातत्याने समन्वय राहिल्यानेच निर्यात वेगात होत आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये निर्यातीत वाढ झाली. यंदा प्रथमच इंडोनेशियन बाजारपेठ खुली झाली. थायलंडमध्ये यंदा दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटले. तिथे साखरेच्या उत्पादनातही घट झाली.

इंडोनेशिया आणि मलेशिया हे प्रामुख्याने थायलंडच्या साखरेवर अवलंबून असतात. पण तिथे साखर उत्पादनात घट झाल्याने या देशांनी भारतीय साखरेला पसंती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याचबरोबर इराणनेही संपूर्ण हंगामात भारतीय साखरेला मागणी नोंदविली. मध्यंतरी इराणकडून मागणी घटली. परंतु ऑगस्टमध्ये अन्य देशांकडून मागणी वाढल्याने निर्यातीचा वेग कायम राहिला. यापूर्वी २००७-८ ला ४० लाख टन साखर निर्यात झाली झाली होती. यानंतर यंदाच्या वर्षात होत असलेली ही सर्वाधिक निर्यात आहे.

यंदाची निर्यातीची गती व पुढील वर्षी होणारे जादा उत्पादन याचा अंदाज पाहता केंद्र सरकार पुढील वर्षीही ६० लाख टनांचा निर्यातीचा कोटा देण्याच्या तयारीत आहे. अद्याप याबाबत अधिकृत निर्णय नसला तरी निर्यात होऊ शकते हे लक्षात आल्याने यंदाचाच कोटा पुढील वर्षी नक्की मिळेल, असा विश्वास साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला. तशा हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू आहेत.

यंदाच्या हंगामात ५५ लाखांपर्यंत प्रत्यक्षात साखर निर्यात झाली ही भूषणावह बाब आहे. सध्या चांगल्या प्रतीच्या साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात २४०० रुपये प्रतिक्विटंल इतका दर आहे. निर्यात कोटा शिल्लक असणाऱ्या कारखान्यांनी जास्तीत जास्त साखर निर्यात करावी.
— अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

 


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...