Agriculture news in Marathi Sugar export agreement at 57 lakh tonnes | Agrowon

साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७ लाख टनांच्या वर गेले आहेत. ऑगस्ट अखेर ५५ लाख टन साखर प्रत्यक्षात निर्यात झाली. सप्टेंबर महिन्याअखेर आणखी ५ ते ६ लाख टन साखरेचे करार होण्याची अन्न मंत्रालय अपेक्षा आहे.

कोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७ लाख टनांच्या वर गेले आहेत. ऑगस्ट अखेर ५५ लाख टन साखर प्रत्यक्षात निर्यात झाली. सप्टेंबर महिन्याअखेर आणखी ५ ते ६ लाख टन साखरेचे करार होण्याची अन्न मंत्रालय अपेक्षा आहे.

अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविडच्या साथीतही अन्न मंत्रालय, कारखानदार, आणि वाहतूकदार यांच्यात सातत्याने समन्वय राहिल्यानेच निर्यात वेगात होत आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये निर्यातीत वाढ झाली. यंदा प्रथमच इंडोनेशियन बाजारपेठ खुली झाली. थायलंडमध्ये यंदा दुष्काळामुळे उसाचे उत्पादन घटले. तिथे साखरेच्या उत्पादनातही घट झाली.

इंडोनेशिया आणि मलेशिया हे प्रामुख्याने थायलंडच्या साखरेवर अवलंबून असतात. पण तिथे साखर उत्पादनात घट झाल्याने या देशांनी भारतीय साखरेला पसंती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याचबरोबर इराणनेही संपूर्ण हंगामात भारतीय साखरेला मागणी नोंदविली. मध्यंतरी इराणकडून मागणी घटली. परंतु ऑगस्टमध्ये अन्य देशांकडून मागणी वाढल्याने निर्यातीचा वेग कायम राहिला. यापूर्वी २००७-८ ला ४० लाख टन साखर निर्यात झाली झाली होती. यानंतर यंदाच्या वर्षात होत असलेली ही सर्वाधिक निर्यात आहे.

यंदाची निर्यातीची गती व पुढील वर्षी होणारे जादा उत्पादन याचा अंदाज पाहता केंद्र सरकार पुढील वर्षीही ६० लाख टनांचा निर्यातीचा कोटा देण्याच्या तयारीत आहे. अद्याप याबाबत अधिकृत निर्णय नसला तरी निर्यात होऊ शकते हे लक्षात आल्याने यंदाचाच कोटा पुढील वर्षी नक्की मिळेल, असा विश्वास साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला. तशा हालचाली केंद्रीय पातळीवर सुरू आहेत.

यंदाच्या हंगामात ५५ लाखांपर्यंत प्रत्यक्षात साखर निर्यात झाली ही भूषणावह बाब आहे. सध्या चांगल्या प्रतीच्या साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात २४०० रुपये प्रतिक्विटंल इतका दर आहे. निर्यात कोटा शिल्लक असणाऱ्या कारखान्यांनी जास्तीत जास्त साखर निर्यात करावी.
— अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

 


इतर अॅग्रोमनी
तांदळाची विक्रमी निर्यात होणार पुणे: देशात यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस...
देशातून ३५ लाख कापूस गाठींची निर्यात...जळगाव ः जगभरात कापूस पिकाला नैसर्गिक फटका बसतच...
भारतातील तेलबियांची परिस्थितीभारतामध्ये तेलबियांची विविधता अधिक असून, जागतिक...
बंगलोर रोझ, कृष्णपुरम वाणाचा दहा हजार...नाशिक : बंगलोर रोझ व कृष्णपुरम छोट्या आकाराच्या...
डाळींच्या दरात दहा टक्के वाढ मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता...
जागतिक कापूस उत्पादन घटणार; ...जळगाव ः जागतिक कापूस उत्पादन नव्या म्हणजेच २०२०-...
गरज कांदा उत्पादक कंपन्यांची...मध्यमवर्गीय  ग्राहक आणि  उत्पादक शेतकरी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढेनवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले...
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथकवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर...
हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...
ब्राझीलचे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाजकोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे...
प्रक्रिया, सामूहिक विपणन, थेट...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू...
खाद्यतेल आयातीवर निर्बंध आणा: सोपा नागपूर : देशातील नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता...
मत्स्यपालनाच्या शाश्वततेसाठी योग्य धोरण...जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून,...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...