agriculture news in Marathi, sugar export impossible in this session, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

यंदाच्या हंगामात साखर निर्यात अशक्‍य ?

राजकुमार चौगुले
बुधवार, 3 जानेवारी 2018

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून साखरेच्या दरात घसरण सुरू असल्याने साखर कारखानदार अस्वस्थ झाले आहेत. सध्या तरी केंद्राने काही तरी ठोस आणि विशेष पॅकेज दिल्याशिवाय निर्यातीची सुतराम शक्‍यता नसल्याचे या उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

देशांतर्गत बाजारात साखरेचे दर ३००० रुपयांच्या आसपास आहेत. तर आंतराष्ट्रीय बाजारात तर हे दर २२०० रुपयांपर्यंत असल्याने निर्यातीची सुतराम शक्‍यता नाही. यंदाच्या हंगामात जेवढी मागणी तितकेच उत्पादन अपेक्षित आहे. यामुळे यंदा तातडीने साखर कारखाने साखर निर्यात करण्याची शक्‍यता धूसर आहे.

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून साखरेच्या दरात घसरण सुरू असल्याने साखर कारखानदार अस्वस्थ झाले आहेत. सध्या तरी केंद्राने काही तरी ठोस आणि विशेष पॅकेज दिल्याशिवाय निर्यातीची सुतराम शक्‍यता नसल्याचे या उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे. 

देशांतर्गत बाजारात साखरेचे दर ३००० रुपयांच्या आसपास आहेत. तर आंतराष्ट्रीय बाजारात तर हे दर २२०० रुपयांपर्यंत असल्याने निर्यातीची सुतराम शक्‍यता नाही. यंदाच्या हंगामात जेवढी मागणी तितकेच उत्पादन अपेक्षित आहे. यामुळे यंदा तातडीने साखर कारखाने साखर निर्यात करण्याची शक्‍यता धूसर आहे.

कारखान्यांच्या स्पर्धेतूनच बिघडतेय गणित
खरे तर एकमेकांच्या स्पर्धेतून साखरेच्या दराचे गणित बिघडत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या उत्तर प्रदेशातून साखरेचे चांगले उत्पादन होते. त्या तुलनेत महाराष्ट्रातून कमी आहे. साखरेचे दर घसरत चालले याचा ओरडा सुरू आहे; पण कारखाना पातळीवरूनही एकी नसल्याने कोणाचेच कोणाला पडले नसल्याची सध्याची स्थिती आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी साखरेचे दर चांगले होते; पण सोलापूर, मराठवाडा भागांतील साखर कारखान्यांची स्थिती फारशी चांगली नसल्याने या भागातील कारखान्यांनी मिळेल त्या दराला साखर विकली. यामुळे या दराचा प्रभाव पश्‍चिम महाराष्टातील कारखान्यांवर पडला. यामुळे साखरेचा तातडीने उठाव व्हावा, यासाठी या कारखान्यांनाही कमी किमतीत साखर विकावी लागली. यामुळे अर्थकारण बिघडले. 

खासगी विरुद्ध सहकारी स्पर्धा तीव्र
साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी काही कारखानदार एकीचा प्रयत्न करतात. ठराविक रकमेच्या खालील दरात साखर विकायची नाही असे ठरवतात. पण ही एकी कायम राहत नाही. खासगी विरुद्ध सहकारी कारखान्यांतील स्पर्धा तीव्र होऊन यातीलच काही कारखाने निर्णयाला हरताळ फासत, कमी किमतीने साखर विकून साऱ्या अपेक्षांना सुरुंग लावत असल्याची जळजळीत प्रतिक्रिया एका कारखानदाराने व्यक्त केली. आमच्या आमच्यातील स्पर्धा सर्व उद्योगालाच अडचणीत आणत असल्याची खंत कारखाना प्रतिनिधीने व्यक्त केले. 

व्यापाऱ्यांवर दबाव शक्‍य
कारखान्यांनी ठराविक रकमेच्या खाली साखर विकायची नाही, असे एकत्रित ठरविल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दराची घसरण कमी होण्यावर होऊ शकतो, असे काही व्यापारी प्रतिनिधींनीच कबूल केले. व्यापाऱ्यांना चक्र चालवायचे असते. यामुळे काही काळ वाट बघून ते ठराविक किंमतीपर्यंत साखर खरेदी करू शकतात, असे या व्यापाऱ्याने सांगितले.

निर्यात आवश्यक
निर्यातीतून फारसा नफा कारखान्यांना अलीकडच्या काळात मिळेनासा झाला आहे, पण जर निर्यात झाल्यास देशातील अतिरिक्त साठा कमी होऊन त्याचा फायदा देशांतर्गत दर वाढण्यावर होऊ शकतो. यामुळे निर्यात आवश्‍यक असल्याचे मत अनेक कारखानदारांचे आहे. स्थानिक व देशाबाहेरील बाजारपेठांचा दर जवळपासही फिरकत नसल्याने विशेष पॅकेज केंद्राने दिले तरच साखर निर्यात शक्‍य असल्याचे या उद्योगतील तज्ज्ञांनी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
जोतिबाच्या खेट्यास प्रारंभ, हजारो भाविक...जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर: जोतिबाच्या खेट्यास...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
नियमित कर्जदारांच्या पदरी निराशाचसांगली ः शासनाच्या कर्जमाफीच्या आदेशात अल्प...
शेतकरीच सरकारचा केंद्रबिंदूः उद्धव ठाकरेजळगाव : कर्जमाफी देणे, हा शेतकऱ्यांच्या...
सिंधुदुर्ग जिल्हा कृषी विभागात १०७ पदे...सिंधुदुर्ग: जिल्हा कृषी विभागातील ३६५ पदांपैकी...
अतिवृष्टी, पूरग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी...मुंबई ः राज्यात जुलै ते ऑगस्ट २०१९ या काळात...
बॅंकांच्या कृषी पतपुरवठ्यावर सरकारचे...नवी दिल्लीः बॅंकांकडून ग्रामीण भागात होणाऱ्या...
चंदनाची सात-बारा उताऱ्यावर नोंद घ्या:...नगर ः शेतकऱ्यांना शेतात चंदन लागवड करण्यास...
खानदेशात कोरड्या चाऱ्याची टंचाईजळगाव  ः खानदेशात चाऱ्याची मोठी टंचाई दिसत...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
उन्हाचा चटका, उकाडाही वाढलापुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने...
संत गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात...शेगाव, जि. बुलडाणा ः विदर्भाच्या पंढरीत शनिवारी (...
आता तरी सोडा धरसोडीचे धोरणसध्या बाजारात तुरीची आवक सुरू झाली असून अपेक्षित...
ग्रामीण विकासाचा ‘पर्यटन’ मार्गगेल्या आठवड्यात गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात...
तापमानात चढ-उतार शक्यपुणे  : उत्तरेकडील थंड वाऱ्याचा अभाव, ढगाळ...
कामाच्या माध्यमातून दिसावे कृषी...नाशिक  : विशिष्ट शेतकऱ्यांसाठीच कृषी विभाग...
अडीच लाख टन कडधान्य बंदरांमध्ये पडूनपुणे  : देशातील कडधान्य बाजारपेठेच्या...
...त्यानंतर बँका, कार्यालयांमध्ये ७/१२...कडेगाव, जि. सांगली  ः राज्यात ऑनलाइन सातबारा...
पाच भावांच्या एकीतून पुढारलेली...ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत...