साखरेचे निर्यात करार थांबले; दोन महिने साखर उद्योगासाठी आव्हानात्मक

कोल्हापूर : कोरोनामुळे जगातील साखरेचे व्यवहार ठप्प झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे नवे करार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. अजूनही जगात आपत्कालीन स्थिती असल्याने पुढील दोन महिने आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेसाठी परीक्षा पाहणारे ठरणार आहेत.
साखरेचे निर्यात करार थांबले; दोन महिने साखर उद्योगासाठी आव्हानात्मक
साखरेचे निर्यात करार थांबले; दोन महिने साखर उद्योगासाठी आव्हानात्मक

कोल्हापूर : कोरोनामुळे जगातील साखरेचे व्यवहार ठप्प झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे नवे करार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. अजूनही जगात आपत्कालीन स्थिती असल्याने पुढील दोन महिने आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेसाठी परीक्षा पाहणारे ठरणार आहेत. कामगारांअभावी साखर बंदरात अडकून पडल्याने आता ती साखर संबंधित देशात कधी जाणार याबाबत अनिश्‍चितता आहे. या पार्श्‍वभूमीवर आता साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजार थंड पडला आहे. याचा प्रतिकूल परिणाम साखरेच्या दरावरही झाला आहे. 

दळणवळण होत नसल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर क्विंटलला तब्बल ३०० ते ४०० रुपयांनी घटले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या साखरेस क्विंटलला २२५० ते २२८० रुपये तर पक्क्‍या साखरेचा दर २३५० ते २३८० रुपये इतका आहे. येत्या काही महिन्यात व्यापार सुरू झाला नाही तर दर आणखी घसरण्याची शक्‍यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

उत्पादनात २२ टक्के घट सध्या देशातील साखर हंगाम जवळ संपला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात साखरेचे उत्पादन बावीस टक्क्‍यांनी घटले आहे. आता अगदी थोड्या प्रमाणात हंगाम सुरू असून ही घट हंगाम संपल्यानंतरही कायम राहील अशी शक्‍यता आहे. देशाबरोबरच राज्यातील साखर कारखाने सध्या सॅनिटायझर निर्मिती, ऊसतोड मजुरांचे व्यवस्थापन या कामात गुंतले आहेत. वाहतुकीवर निर्बंध येत असल्याने कारखान्यातून साखर बाहेर काढणे आव्हानात्मक ठरत असल्याचे कारखानदारांनी सांगितले. सध्या केंद्र व राज्य सरकार केवळ कोरोना नियंत्रणाच्या कामात गुंतले आहे. सातत्याने वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता कारखान्यांनी शासनाकडून काही तातडीने मदत मिळेल अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. जरी मागणी केली तरी सध्या स्थितीत साखर उद्योगासाठी केंद्र मदतीचे पॅकेज जाहीर करेल अशी शक्‍यता धूसर असल्याची माहिती साखर उद्योगातील तज्ज्ञांनी दिली.  देशांतर्गत बाजारही ठप्प सध्या संपूर्ण देशभर लॉक डाऊनची स्थिती आहे. साखरेवर आधारित सर्व उद्योग जवळ जवळ बंद आहेत. यामुळे देशांतर्गत खपात प्रचंड मोठी घट झाली आहे. यामुळे जेवढी घरगुती वापरासाठी साखर विकली जाते. तितकी साखरही विकणे सध्या आव्हान बनले आहे मोठे मॉल, स्टोअर्स बहुतांशी वेळ बंद राहिल्याने साखरेची किरकोळ विक्री अपेक्षित प्रमाणात होत नसल्याचे चित्र आहे. ज्या व्यापाऱ्यांनी अगोदरच साखर खरेदी करून ठेवली त्यांच्यापुढेच साखर विक्रीचे आव्हान निर्माण झाल्याने स्थानिक बाजारातही साखर खरेदीसाठी फारसा उत्साह नसल्याची स्थिती आहे.  सध्या साखरेची वाहतूकच बंद असल्याने नवे करार ठप्प झाले आहेत. करार केलेली साखरच संबंधित देशात वेळेत पोच करण्याचे आव्हान सगळ्या यंत्रणेपुढे आहे. पोर्टवर कामगार नसल्याने साखर तशीच पडून आहे. सध्य:स्थिती पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन वाहतूक सुरळीत होईपर्यंत अनेक दिवसांचा कालावधी जाईल अशी शक्‍यता आहे.  — अभिजित घोरपडे,  साखर निर्यातदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com