agriculture news in Marathi sugar export subsidy pending from six months Maharashtra | Agrowon

साखर निर्यात अनुदान सहा महिन्यांपासून थकीत

राजकुमार चौगुले
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

कोल्हापूर : साखर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात साखरेस अनुदान देण्याची योजना राबविली असली, तरी गेल्या सहा महिन्यांपासून निर्यातीचे अनुदान केंदाने दिलेले नाही. रकमेची तरतूद नसल्याने अनुदानास विलंब होत असल्याचे कारण केंद्राने संबंधित साखर कारखान्यांना दिले आहे. यामुळे अनुदान नक्की कधी मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

कोल्हापूर : साखर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात साखरेस अनुदान देण्याची योजना राबविली असली, तरी गेल्या सहा महिन्यांपासून निर्यातीचे अनुदान केंदाने दिलेले नाही. रकमेची तरतूद नसल्याने अनुदानास विलंब होत असल्याचे कारण केंद्राने संबंधित साखर कारखान्यांना दिले आहे. यामुळे अनुदान नक्की कधी मिळणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 

निर्यात अनुदान थकल्याने राज्यातील काही कारखान्यांनी बॅंकांकडे तात्पुरच्या कर्जाची मागणी केली; पण बॅंकांनी त्याकडेही दुर्लक्ष केल्याने कारखाने हवालदिल झाले आहेत. गेल्या महिन्यातील आंतराराष्ट्रीय बाजाराचा आढावा घेतल्यास जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर काहीसे वधारले आहेत. 

याचा फायदा निर्यात होणाऱ्या साखरेसही होत आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या महिन्यात क्विंटलला शंभर रुपये दरात वाढ झाली. साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कच्या साखरेचा दर क्विंटलला १९०० ते २००० रुपये, तर पांढऱ्या साखरेचा दर २०५० ते २१०० रुपये इतका होता.

जागतिक बाजारपेठेत साधरणत: एप्रिलच्या सुमारास ब्राझीलची साखर येते. तोपर्यंत साखरेचे दर काहीसे वाढलेले असतात. याचा फायदा कारखान्यांना घेता येऊ शकतो. बाजारपेठेत निर्यातीच्या दृष्टीने चांगले वातावरण तयार होत असताना केंद्राने मात्र जाहीर केलेल्या योजनेची अंमलबजावणी न केल्याने कारखानदारांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

साखर निर्यात केल्यास क्विंटलला साधारणत: एक हजार रुपयांच्या आसपास अनुदानाची रक्कम होते. साखर निर्यात केल्यानंतर त्याचे प्रस्ताव केंद्राला द्यावे लागतात. अनेक कारखान्यांनी हे प्रस्ताव कारखान्यांना दिले आहेत. पण अनुदान तातडीने देण्याबाबत केंद्राकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने कारखाने हवालदिल झाल्याची माहिती कारखाना सूत्रांनी दिली. सध्याची विपरीत परिस्थिती पाहता फरकाची ही रक्कम कोठून द्यायची या चिंतेत कारखानदार आहेत.

तात्पुरत्या कर्जाला बॅंकांचा नकार
केंद्राकडून अनुदानाची रक्कम उपलब्ध होत नसल्याने झालेला तोटा भरून काढण्यासाठी साखर कारखान्यांनी बॅंकाकडे ब्रिज फायनान्स (तात्पुरते कर्ज) मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. केंद्राने अनुदानाबाबतच्या नोटिफिकेश्‍नच्या आधारे बॅंकानी कर्ज द्यावे. यासाठी कारखान्यांनी धडपड सुरू केली. परंतु कारखान्यांच्या या मागणीला बॅंकानीही काणाडोळा केला. काहींनी निर्णय प्रलंबित ठेवला, यामुळे फरकाची रक्कम अन्य पद्धतीने मिळविण्याच्या कारखान्यांच्या प्रयत्नाला धक्का बसला आहे. अनेक कारखान्यांच्या फायली बॅंकामध्ये पडून आहेत. पण त्यावरही निर्णय होत नसल्याची स्थिती आहे.

निर्यात ३७ लाख टनांवर
ऑक्‍टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत देशातील साखर कारखान्यांनी सुमारे ३७ लाख टन साखरेची निर्यात केल्याची माहिती अन्न व ग्राहक राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली; पण निर्यात केलेल्या साखरेच्या अनुदानाचे किती वाटप केले, याबाबत मात्र केंद्राकडून निश्‍चित माहिती उपलब्ध झाली नाही. केंद्राकडून रक्कम वाटपाबाबत टाळाटाळ होत असल्याने जाहीर केलेल्या योजनेची फलप्राप्ती किती, असा सवाल साखर उद्योगातून व्यक्त होत आहे.


इतर अॅग्रोमनी
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...