agriculture news in marathi, Sugar factories demands of no use says shamrao Desai | Agrowon

साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक : शामराव देसाई
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 एप्रिल 2018

कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर असताना कारखानदार ‘एफआरपी’साठी अनुदान, साखर निर्यात, साखरेची द्विस्तरीय विक्री किंमत, बफरस्टॉक अशा निरर्थक मागण्या करत आहेत. सर्व मागण्या शहाणपणाच्या नाहीत, उसापासून थेट इथेनॉलनिर्मिती हेच धोरण योग्य असूनही त्याची मागणी होत नाही, असा आरोप जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक शामराव देसाई यांनी केला. 

कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर असताना कारखानदार ‘एफआरपी’साठी अनुदान, साखर निर्यात, साखरेची द्विस्तरीय विक्री किंमत, बफरस्टॉक अशा निरर्थक मागण्या करत आहेत. सर्व मागण्या शहाणपणाच्या नाहीत, उसापासून थेट इथेनॉलनिर्मिती हेच धोरण योग्य असूनही त्याची मागणी होत नाही, असा आरोप जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक शामराव देसाई यांनी केला. 

श्री. देसाई म्हणाले, ‘‘यावर्षीच्या हंगामात देशात ३१० लाख टन अपेक्षित आहे. देशाची २४० लाख टन साखरेची गरज वजा जाता ७० लाख टन साखर शिल्लक रहाणार आहे. गेल्यावर्षीची ५० लाख टन आणि यावर्षीची ७० लाख टन अशी सुमारे १२० लाख टन साखर शिल्लक असेल. अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर असताना कारखानदार मात्र अजून साखर झोपेतच आहेत.’’ ते म्हणाले, ‘‘देशात आज साखरेचे भाव प्रती किलो २८ रुपये आहे. ते २५ रुपयांपर्यंत खाली येऊ शकतात. कारखानदार व संघटना साखर निर्यात अनुदानापोटी प्रति क्विंटल एक हजार रुपयांची मागणी करत आहेत. वास्तविक देशाबाहेर साखरेचे दर भारतापेक्षा खूपच कमी म्हणजे प्रति किलो २३ रुपये आहेत. साखर निर्यातील परवानगी मागणे व शासनाने ती मान्य करणे हे कोणत्या शास्त्रात बसते.’’

 २००६ पासून आमची संघटना थेट उसापासून इथेनॉलनिर्मितीची व दर वाढीची मागणी करत आहे. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात प्रति लिटर २७ रुपये असलेला इथेनॉलचा दर आता ४८.५० रुपये झाला. या दराने इथेनॉलची विक्री झाली तर उसाला प्रति टन ३८०० ते ४००० हजार रुपये दर शक्‍य आहे. २००५-०५ च्या हंगामात थेट उसापासून इथेनॉलनिर्मिती करून उसाला प्रतिटन १७०० रुपये दर देण्याचे मान्य करून रिलायन्सने इथेनॉलनिर्मितीचे कारखाने काढण्याची परवानगी मागितली, पण ती नाकारली. आताही रिलायन्सचे भूत मानगुटीवर बसेल म्हणून थेट उसापासून इथेनॉलनिर्मितीबाबत कारखानदार व नेतेही बोलत नसल्याचे श्री. देसाई म्हणाले. या वेळी सुजाता देसाई, नारायण पोवार आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...
‘शेतकरी सन्मान योजने‘च्या अनुदानासाठी...कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत...
तीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यातसोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...