agriculture news in Marathi sugar factories employees will be on strike from 30 November Maharashtra | Agrowon

साखर कामगार ३० पासून संपावर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

राज्यातील साखर कामगारांची पगारवाढ कराराची मुदत संपून १९ महिने झाले तरी नवीन करार नाही. पगारवाढीसाठी त्रिपक्षीय समिती नियुक्त केली नाही. 

सांगली ः राज्यातील साखर कामगारांची पगारवाढ कराराची मुदत संपून १९ महिने झाले तरी नवीन करार नाही. पगारवाढीसाठी त्रिपक्षीय समिती नियुक्त केली नाही. त्यामुळे कामगारांत असंतोष आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ३० नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले आणि साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस आनंदराव वायकर यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत दिली.

राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आणि राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने शुक्रवारी (ता. ६) साखर कामगार भवन येथे बैठक झाली. 

बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना श्री. काळे, श्री. भोसले व श्री. वायकर आदी म्हणाले, की राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढ कराराची मुदत ३१ मार्च २०१९ संपली आहे. करार संपल्याची नोटीस प्रतिनिधी मंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री, साखर आयुक्त, कामगार मंत्री व कामगार आयुक्त यांना दिली होती.

नवीन मागण्यांचा मसुदा २७ फेब्रुवारी २०१९ संबंधित घटकांकडे दिला होता. त्यास १९ महिन्यांचा कालावधी झाला असून शासनाने साखर कामगार पगार वाढीसाठी त्रिपक्षीय समिती नेमली नाही. समिती स्थापन करण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री यांनी लक्ष दिले नाही. या मोर्चात सरकार परिवर्तन करण्याचा निर्णय घेऊन सर्व कामगारांनी आपल्या भागात विभागात त्या सरकारात असलेले आमदार पराभूत करण्यासाठी एकजूट केली. त्यामुळे परिवर्तन घडले.

या वेळी रावसाहेब पाटील, अविनाश आपटे, रावसाहेब भोसले, प्रदीप शिंदे, प्रदीप बनगे आदी प्रतिनिधी मंडळ व महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे

  • महाआघाडी सरकारकडून अपेक्षा होती. मात्र सरकार आणि साखर संघाचे दुर्लक्ष झाले.
  • पगारवाढीसह अनेक कारखान्यांकडे कामगारांचे वेतन थकीत आहे.
  • ३२ आजारी साखर कारखाने सुरू करण्यासाठी २९७ कोटींची मदत केली. पण कामगारांच्या वेतनाबाबत निर्णय नाही.
  • कोरोनाच्या काळात कामगारांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून गाळप पूर्ण होईपर्यंत काम केले याची जाणीव नाही.

इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...