agriculture news in Marathi, Sugar Factories have challenge of cost increased of processing, Maharashtra | Agrowon

साखर कारखान्यांपुढे प्रक्रिया खर्चवाढीचे आव्हान

राजकुमार चौगुले
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

बुडीत उसाच्या गाळपामुळे साखर कारखान्यांचे नुकसान होणार आहे. उत्पादन घटणार असल्याने शेतकऱ्यांचे अगोदरच नुकसान झाले आहे. आता हा उस गाळल्यनंतर कारखानदरारांचे नुकसान ठरलेले आहे. बुडीत उसाचे गुणधर्म बदलल्याने साखर निर्मितीत घट येण्याची शक्‍यता आहे. 
- एम. व्ही. पाटील, व्यवस्थापकीय संचालक, दत्त साखर कारखाना, शिरोळ, जि. कोल्हापूर

कोल्हापूर : दोन महिन्यांपूर्वी आलेल्या महापुराचे फटके दक्षिण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना बसणार आहेत. उसाच्या आवकेत घटीची शक्‍यता व्यक्त होत असली तरी आता साखर करण्यासाठीच्या प्रक्रिया खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने साखर कारखानदारांचे यंदाचे गणित चुकणार आहे. रिकव्हरी लॉसमुळे साखरेचे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रत्येक साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे तीस ते चाळीस टक्के ऊस पुरामुळे पूर्ण खराब झाला. अनेक ठिकाणी केवळ नावालाच ऊस उभा आहे. यातून एकरी दहा पंधरा टनही उत्पन्न निघेल याची साशंकता आहे. निकृष्ट दर्जाचा ऊस कारखान्यांना गाळपासाठी नेणे अपरिहार्य आहे. याचा फटका मात्र कारखानदारांना बसणार आहे. 

एका टनापासून साधारणत: किती ऊस निघेल, एकूण किती गाळप होईल त्यानुसार साखरेचे किती उत्पादन होईल याचा ठोकताळा प्रत्येक कारखाना हंगाम सुरू होण्याअगोदर बांधू शकतो. यंदा अनेक ठिकाणी शेतात ऊस उभा असला तरी तो किती निघेल याचा अंदाज कारखाने बांधू शकत नसल्याची स्थिती सध्या आहे. यामुळे प्रत्येक कारखाना क्षमतेच्या कमी प्रमाणातच गाळप करेल, अशी शक्‍यता आहे. दुसरीकडे कमी रिकव्हरीमुळे साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. 

ऊस गाळपास आल्यानंतर तो तातडीने गाळला जातो, त्याचे गुणधर्म बदलण्याअगोदर त्याची साखर करण्याची प्रक्रिया सुरू करावी लागते. सध्या शेतात ऊस उभा असला तरी तो कुजला आहे. यामुळे तयार होणारा रस हा निकृष्ट होण्याची शक्‍यता आहे. याचबरोबर उसाचा पीएच, ब्रिक्‍स, शुद्धता, फायबर चुन्याची टक्केवारी आदी घटकांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी-जास्तपणा होऊ शकतो. हे सर्व घटक चांगल्या पातळीत आणण्यासाठी जादा प्रमाणात प्रक्रिया करावी लागणार असल्याने तो खर्च प्रत्येक वर्षाच्या हंगामापेक्षा वाढणार आहे.  

 


इतर अॅग्रो विशेष
पाणीवाटपावर चर्चा गरजेची : डॉ. माधवराव...अकोला  ः देशाचा विकास होताना नागरीकरणाच्या...
चिंता पुरे; हवी थेट कृती ग्रामीण कुटुंबाचे उत्पन्न वाढल्याशिवाय देशाचा...
खेड शिवापुरात केली स्ट्रॉबेरी लागवड...खेड शिवापूर (जि. पुणे) येथील मयूर कोंडे या...
राज्यात गारठा झाला कमी पुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
थकीत कर्जावर व्याज आकारू नये : राज्य...मुंबई ः महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी...
केंद्र कांदा निर्यातबंदी, साठा मर्यादा...नवी दिल्ली ः देशात कांद्याचे उत्पादन...
शेतकरी कंपनीमुळे तयार झाले उत्पन्नाचे...पुणे जिल्ह्यातील मढ पारगाव आणि परिसरातील सात...
निर्यातदार व्हा... पण शेतकऱ्यांचा...पुणे: शेतमालाची निर्यात आता पूर्णतः ‘बिझनेस...
हरितक्रांती घडविताना सुपीकता हरवली:...अकोला : अन्नधान्य निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण...
वाइन उद्योगाला अडचणीतून मुक्त करणार ः...नाशिक : वाइन उद्योगाला मागील काही दिवसांपासून...
सत्तावीस लाख शेतकऱ्यांचे ‘आधार’ रखडलेपुणे: शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात...
वायफाय मोफत हवाय? घरपट्टी, पाणीपट्टी भराकोल्हापूर : ‘‘वायफाय मोफत हवाय? घरपट्टी व...
कर्जमाफीचा शब्द पाळू ः मुख्यमंत्रीइस्लामपूर, जि. सांगली ः कर्जमाफीचा आम्ही दिलेला...
अकोला जिल्ह्यात मजूरटंचाईमुळे कापूस...अकोला ः शेतीकामांसाठी दिवसेंदिवस मजूर समस्या भीषण...
सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या...नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे...
पूरकउद्योग अन् शेती विकासात श्री भावेश्...बेलवळे खुर्द (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील श्री...
उत्तर महाराष्ट्रात अधिक गारठापुणे : राज्यात गारठा वाढला असला तरी, किमान...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
बदल ठरावेत लाभदायकयवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हजारो...
हवामान बदल हेच सर्वांत मोठे आव्हानआ ज जगभरात हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम हा...