Agriculture news in marathi Of sugar factories Investigate debts | Agrowon

साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 जून 2021

नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांना दिलेले कर्ज नियमानुसार आहे का? ज्या कारखान्यांना कोट्यवधी रुपयाचे कर्ज दिले, त्या कारखान्यांकडे तेवढी मालमत्ता, कर्ज फेडण्याची हमी आहे का? असा प्रश्न शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी उपस्थित केला आहे. 

नगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत बारकाईने कागदपत्रे तपासून कर्ज दिले जाते. शेतकऱ्यांना नियमानुसार कर्ज दिले जात असले तरी नगर जिल्ह्यात साखर कारखान्यांना दिलेले कर्ज नियमानुसार आहे का? ज्या कारखान्यांना कोट्यवधी रुपयाचे कर्ज दिले, त्या कारखान्यांकडे तेवढी मालमत्ता, कर्ज फेडण्याची हमी आहे का? असा प्रश्न शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी उपस्थित केला आहे. 

नगर जिल्हा बॅंकने गेल्या पाच वर्षांत साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाची विशेष पथकामार्फत चौकशी करून वस्तूस्थिती लोकांसमोर आणावी. कर्ज वाटपात नियमबाह्यता आढळल्यास तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. 

  दहातोंडे यांनी निवेदनात म्हटले आहे, ‘‘राज्यात नव्हे तर देशात सहकारात अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा नावलौकीक आहे. मात्र येथे काही राजकीय लोक कर्ज मिळवण्यासाठी राजकीय वजन  वापरत असल्याचे आमचे मत आहे. बॅंकेत बहुतांश साखर साखर कारखान्यांशी संबंधित नेते संचालक आहेत.

बॅँकेने गेल्या पाच वर्षांत नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कर्जवाटप केलेले आहे. त्यातील मोठ्या प्रमाणात कर्ज कारखान्यांकडे थकीत आहे. या कारखान्यांना कर्जवाटप करताना कारखान्यांकडे जेवढे कर्ज दिले, तेवढी मालमत्ता व अथवा कर्जफेड करण्याची हमी देणारी कोणती बाब आहे का? कर्ज देताना कोणते निकष लावले आहेत. बहुतांश कारखान्यांना नियमबाह्य कर्ज दिल्याचा संशय आहे. त्यामुळे कोणत्या साखर कारखान्यांना किती कर्ज दिलेले आहे? कर्ज देताना कोणते निकष लावले, कर्ज देण्यासाठी कोणी शिफारस केली? कारखान्याकडे तेवढी मालमत्ता आहे का? हे लोकांना कळावे.

त्या अनुषंगाने मागील पाच वर्षांत दिलेल्या कर्जाची चौकशी करावी आणि कर्ज वाटपात नियमबाह्यता आढळून आल्यास तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळावर कारवाई व्हावी, अशी मागणी दहातोंडे यांनी केली आहे. दखल घेतली नाही तर जिल्हा सहकारी बॅंकेच्या कार्यालयात शेतकरी मराठा महासंघाचे कार्यकर्ते आंदोलन करतील, असा इशाराही दिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
भारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...
मुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...
कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...