कर्नाटकमधील कारखाने दिवाळीपूर्वी हंगाम सुरू करण्याच्या तयारीत

कर्नाटकमधील कारखाने दिवाळीपूर्वी हंगाम सुरू करण्याच्या तयारीत
कर्नाटकमधील कारखाने दिवाळीपूर्वी हंगाम सुरू करण्याच्या तयारीत

कोल्हापूर : यंदा उसाचा हंगाम दिवाळीनंतरच सुरू होणार हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. कर्नाटकमधील साखर कारखाने दिवाळीपूर्वी सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे खराब झालेला ऊस शेतकरी कर्नाटकातील कारखान्यांना घालण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. 

ऊस उत्पादकांनी कारखाने लवकर सुरू करण्याची मागणी केली असली, तरी निवडणुकांमुळे हंगाम दिवाळीनंतरच सुरू होण्याची शक्‍यता आहे. याचा फायदा कर्नाटकमधील कारखाने घेऊ शकतील, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांचा आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांना कर्नाटकातील कारखान्यांचे आव्हान पेलावे लागणार आहे. 

कोल्हापूर, सांगली हे जिल्हे कर्नाटकच्या सीमेवर आहेत. दोन्ही जिल्ह्यातील कारखान्यांना नेहमीच कर्नाटकाच्या कारखान्यांचे आव्हान राहिले आहे. प्रत्येक वर्षी राज्यातील साखर कारखान्याअगोदर हंगाम सुरू करून दोन्ही जिल्ह्यातील ऊस खेचण्याचा प्रयत्न कर्नाटकातील कारखान्यांकडे असतो. तेथील कारखाने बहुतांशी खासगी स्वरुपात असल्याने तातडीने निर्णय घेऊन ते गळीत हंगामाबाबतचा निर्णय घेऊ शकतात. 

कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्रातील अनेक गावांचा ऊस कर्नाटकातील कारखाने घेऊन जातात. कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रातील उसाची रिकव्हरी चांगली असल्याने दोन्ही जिल्ह्यांतील ऊस नेण्याकडे त्यांचा कल असतो. यंदाही पंधरा ऑक्‍टोबरपासून हंगाम सुरू करण्याच्या हालचाली त्या भागातील कारखान्यांनी सुरू केल्या आहेत. 

महापुरामुळे ऊस खराब झाला आहे. जास्त कालावधी गेल्यास बहुतांशी उसाची हानी होवू शकते. यामुळे कर्नाटकातील कारखान्यांनी हंगाम सुरू केल्यास पूरग्रस्त ऊस उत्पादक ऊस त्या कारखान्यांना देण्यासाठी पसंती दाखवतील अशी शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com