agriculture news in marathi, sugar factories may facing shortage of sugarcane, kolhapur, maharashtra | Agrowon

दक्षिण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांपुढे आव्हान ऊस उपलब्धतेचे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

मध्यंतरीच्या सलग पावसामुळे हंगाम प्रारंभ कधी होईल याबाबत साशंकता व्यक्त होत होती. गेल्या काही दिवसांपासून पाऊस थांबला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत उसामध्ये वाफसा येण्याची शक्‍यता आहे. आता येत्या आठ ते दहा दिवसांत प्रत्यक्ष गाळपास सुरवात करण्याबाबत आमचे नियोजन सुरू आहे. 
- दिलीप जाधव, ऊस विकास अधिकारी, दत्त साखर कारखाना, शिरोळ, जि. कोल्हापूर.

कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने उसंत घेतल्यानंतर आता गाळप हंगामाच्या हालचाली गतिमान होत आहेत. गेल्या आठवड्यापासून पाऊस पूर्णपणे थांबल्याने साखर कारखानदारांमध्ये समाधान आहे. कारखानदारांनी गेल्या सप्ताहापासून बॉयलर प्रदिपनास सुरुवात केली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांतील गाळप हंगाम हळूहळू सुरू होण्याची शक्‍यता आहे. अशी स्थिती असताना दुसरीकडे कारखान्यांसमोर ऊस उपलब्धतेचे मोठे आव्हान आहे. 

महापुरापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात १३५ लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला गेला होता. पण जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आल्याने ऊस कुजला आहे. अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादन घटले आहे. महापुराचा फटका बसल्याने जिल्ह्यात १०५ लाख मेट्रिक टन ऊस उत्पादन होईल, असा नव्याने अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोल्हापूरप्रमाणेच सांगली जिल्ह्यालाही महापुराचा फटका बसला. 

सांगली जिल्ह्यात ८२ लाख मेट्रिक टन ऊस उत्पादनाचा अंदाज होता. पण, पुरामुळे ६७ लाख मेट्रिक टनांवर ऊस उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. सध्या पाऊस थांबला ही एकमेव बाब कारखानदारांना सुखावत आहे. यामुळे अनेक कारखानदारांनी उसतोडणी कामगार तातडीने कारखाना कार्यक्षेत्रात बोलावले आहे. अनेक कारखान्यांची वाहने उसतोडणी कामगारांना आणण्यासाठी रवाना झाली आहेत. यंदा सगळ्यात मोठे आव्हान आहे ते ऊस उपलब्धतेचे. यातच शेजारील कर्नाटक राज्याने झोनबंदी लादल्याने कारखानदारांना फक्त कार्यक्षेत्रातील उसावरच अवलंबून रहावे लागणार आहे. दोन महिन्यांपूर्वी महापुराच्या तडाख्यात दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ४० हजार हेक्‍टर क्षेत्रावरील उसाचे नुकसान झाले आहे. यामुळे ही घट कशी भरून काढायची या चिंतेत कारखाने आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यापासूनच कारखान्यांमध्ये चांगला ऊस मिळविण्यासाठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. नद्यांच्या काठावरील उसाला रिकव्हरी मिळण्याची शक्‍यता धूसर आहे. या पार्श्‍वभूमीवर न बुडलेला व अतिवृष्टीच्या तडाख्यात तग धरलेल्या उसाच्या तोडीसाठी प्राधान्य दिले जाईल, असा अंदाज कारखाना वर्तुळातून व्यक्त होत आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
मधमाशीला हानिकारक कीटकनाशके टाळा : आर....‌अंबाजोगाई : ‘‘शेतकऱ्यांनी मधमाश्यांच्या जाती...
परभणी जिल्ह्यात साडेसहा हजारांवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...
सोलापूर : कांदा लिलाव बंद पाडण्याचा डाव...सोलापूर : सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही...
कोल्हापूर : शेती, घरांच्या नुकसानीसाठी...कोल्हापूर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि...
विज्ञान, अध्यात्माच्या ताकदीने देश विश्...कुंडल, जि. सांगली :  ज्ञान, विज्ञान, संगणक व...
संत्र्याचे विपणनाचे जाळे विणण्याची गरज...अमरावती  ः सांघिक तत्त्वावर संत्रा...
फडणवीसांविरोधात पक्षांतर्गत नाराजांची...मुंबई ः भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की...
कृषी पदवीधर तरूणांनी समाजासाठी काम...नगर : ‘‘देशात प्रामाणिकपणे काम केलेले अनेक शेतकरी...
फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द...मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र...
आचारसंहितेपूर्वीच्या निर्णयांची...मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू...
पुणे जिल्ह्यात भातकाढणी अंतिम टप्प्यातपुणे ः पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांनी...
पश्‍चिम महाराष्ट्रात...पुणे ः पश्‍चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि...
सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना...कऱ्हाड, जि. सातारा ः राजकीय पक्षांचा आदर्श घेऊन...
नगर जिल्ह्यात रोजगार हमीच्या कामावर सात...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता रोजगार हमी योजनेच्या...
चंद्रशेखर भडसावळे यांना मार्टचा ‘फादर...खडकवासला, जि. पुणे : कृषी पर्यटन संकल्पनेचे...
देशी कापूस संशोधन केंद्राचा उद्या...परभणी: वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
मंत्रिमंडळाचा विस्तार २१ डिसेंबरनंतरचमुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २१...
केंद्राने कांदा साठवणूक मर्यादा ५०...नाशिक : गेल्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस...