agriculture news in marathi, Sugar factories owners to meet Chief Minister today | Agrowon

कोल्हापुरातील साखर कारखानदार आज मुख्यमंत्र्यांना भेटणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 8 जानेवारी 2019

कोल्हापूर  ः एफआरपीचा तिढा सुटण्याची शक्‍यता नसल्याने जिल्ह्यातील साखर कारखानदार आज (मंगळवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. यानंतर गुरुवारी (ता.१०) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने याबाबत पुन्हा बैठक होईल. रविवारी (ता.६) कारखानदारांची येथील एका खासगी हॉटेलमध्ये बैठक झाली. यामध्ये एफआरपीची रक्कम किती प्रमाणात जमा करायची, याबाबत याही बैठकीत एकमत होऊ शकले नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला. 

कोल्हापूर  ः एफआरपीचा तिढा सुटण्याची शक्‍यता नसल्याने जिल्ह्यातील साखर कारखानदार आज (मंगळवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. यानंतर गुरुवारी (ता.१०) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने याबाबत पुन्हा बैठक होईल. रविवारी (ता.६) कारखानदारांची येथील एका खासगी हॉटेलमध्ये बैठक झाली. यामध्ये एफआरपीची रक्कम किती प्रमाणात जमा करायची, याबाबत याही बैठकीत एकमत होऊ शकले नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला. 

साखरेचा प्रतिक्विंटल किमान विक्रीदर २९०० वरून ३४०० रुपये करावा, एफआरपीची रक्कम दोन टप्प्यांत देण्यास परवानगी द्यावी किंवा एकरकमी एफआरपी देण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशा मागण्या कारखानदार मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत. 

साखरेचा उठाव केला जात नाही. प्रतिक्विंटल साखरेच्या दरात घट होत आहे. शासन साखरेचा किमान विक्री दर वाढवत नाही. त्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. सध्या एकरकमी एफआरपी देणे कठीण होऊन बसले आहे. मात्र, सरकार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकरकमी एफआरपी द्यावी, या भूमिकेवर ठाम असल्यामुळे साखर कारखानदारांमध्ये अस्वस्थता आहे. शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत नसल्याने त्यांना त्यांचा पुढील व्यवहार करता येत नाही. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखरेचा किमान विक्री दर वाढवण्याची ग्वाही दिली होती; मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत येत आहेत. शासनाला अनुदान देण्यास जमत नसेल, तर एकरकमी एफआरपी देण्यासाठी अनुदान द्यावे, अशीही मागणी केली जाणार आहे. या वेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील-यड्रावकर आदी उपस्थित होते.  

संघटना आंदोलनावर ठाम 
दरम्यान, शेतकरी संघटनांनी एकरकमी एफआरपीबाबत आग्रही भूमिका कायम ठेवली आहे. जर कोणत्या कारखान्याने तुकड्यामध्ये एफआरपीची रक्कम जमा केली, तर त्या कारखान्याचे गाळप बंद करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिल्याने हा तिढा आणखी गंभीर होत असल्याचे चित्र सध्य ऊस पट्ट्यात आहे.

इतर अॅग्रो विशेष
द्राक्ष बागांवर फळकुजीचे संकट; ५० टक्के...पुणे : सततचा पाऊस, धुके, ढगाळ वातावरणाने...
भूमिहीन ते यशस्वी बागायतदार अतिव...नांदेड जिल्ह्यातील बोरी (बु.) येथील मारोती व...
शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीतून वाढली...मध्यस्थांचा अडथळा दूर होऊन शेतकरी ते ग्राहक अशी...
पावसामुळे पिकांचे नुकसान सुरुचपुणे  : राज्याच्या विविध भागांत मॉन्सूनोत्तर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे  : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात...
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...