agriculture news in Marathi sugar factories paid 97 percent FRP Maharashtra | Agrowon

टाळेबंदीतही कारखान्यांकडून ९७ टक्के एफआरपी अदा 

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

टाळेबंदीच्या संकटामध्येही यंदा राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना ९७ टक्के एफआरपीची रक्कम अदा केली आहे. पंधरा जून अखेर १३ हजार ५०८ कोटी रुपयांपैकी १३ हजार १४९ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. 

कोल्हापूर: टाळेबंदीच्या संकटामध्येही यंदा राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना ९७ टक्के एफआरपीची रक्कम अदा केली आहे. पंधरा जून अखेर १३ हजार ५०८ कोटी रुपयांपैकी १३ हजार १४९ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. अद्याप ३५९ कोटी रुपये कारखान्यांकडे प्रलंबित आहेत. तर राज्यातील १०७ कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम अदा केलेली आहे. 

यंदा १४४ साखर कारखान्यांनी गळितास प्रारंभ केला. हंगामाच्या शेवटी शेवटी म्हणजे पंधरा मार्चनंतर राज्यात कोविडचे संकट सुरू झाले. पंधरा मार्चपर्यंत राज्यातील नव्वद टक्के गळीत हंगाम संपला होता. मार्चच्या पहिल्या पंधरवड्याअखेर राज्यात ४९२ लाख टन गाळप झाले होते. यानंतर हंगाम संपेपर्यंत पुन्हा ५८ लाख टनांचे गाळप झाले. मार्चच्या मध्यापर्यंत चाळीस कारखाने बंद झाले होते. मार्चच्या उत्तरार्धात कोविड प्रादुर्भावामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली. तरीही कारखान्यांनी यानंतर एक महिना गाळप सुरू ठेवले. 

एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात साखर हंगाम पूर्ण झाला. शेवटच्या टप्प्यात ऊस गाळपासाठी कारखान्यांना झगडावे लागले. प्रशासनाचा बडगा व मजुरांची धावपळ यामुळे कारखानदारांची चांगलीच धावपळ झाली. यातच ऐन हंगामातच साखर मागणीत घट आल्याने कोट्यातील साखर विक्री करण्यासाठी कारखानदारांची चांगलीच कसरत झाली. या पार्श्‍वभूमीवरही अनेक कारखान्यांनी एफआरपीची रक्कम अदा केली. 

कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या रकमेला प्राधान्यक्रम देऊन एफआरपीची रक्कम भागविण्याचे प्रयत्न केले. कारवाईच्या भीतीनेही अनेक कारखान्यांनी एफआरपीची जुळवाजुळव केली. साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांची अपेक्षित साखर विक्री झाली नाही. यामुळे कामगारांची देणी, इतर पुरवठादार व अन्य खर्च अद्यापही प्रलंबित असल्याने कारखान्यांपुढील संकट कायम असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. 

दृष्टिक्षेपात गळीत हंगाम ( २०१९-२०) 
गाळप हंगाम सुरू केलेले कारखाने:
१४४ 
एकूण गाळप: ५५० लाख टन 
एफआरपीची एकूण रक्कम:१३ हजार ५०८ कोटी 
अद्याप देय रक्कमः ३५९ लाख कोटी रुपये 
पूर्ण एफआरपी दिलेले कारखानेः १०७ 
८० ते ९९ टक्के रक्कम अदा केलेले कारखानेः २५ 
६० ते ८० टक्के रक्कम अदा केलेले कारखानेः ८ 
६० टक्केपर्यंत एफआरपी दिलेले कारखानेः ४ 
(स्त्रोत- साखर आयुक्तालय) 


इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागात चाळीस लाख टन कापसाची खरेदीनगर ः नाशिक विभागात यंदा १ लाख ३७ हजार ३४५...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कोरोनास्थितीमुळे पोल्ट्री उद्योगाची...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकनबाबत...
राज्यातील रेशीम कोष उत्पादकांना मिळणार...पुणे ः बदलत्या हवामानामुळे अडचणीत येत...
मका उत्पादकांचे लक्ष शासनाच्या...औरंगाबाद: हमीभाव खरेदी केंद्रांवरील खरेदी बंद...
लाल भेंडीसाठी शेतकऱ्याला केंद्राचे...सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील आडेली (ता.वेंगुर्ला)...
‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा...पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन...
पावसाचा जोर आजपासून वाढणारपुणे ः उत्तर महाराष्ट्र ते अरबी समुद्रातील पूर्व...
कापसाचे ६१४ कोटी थकीतनागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...