agriculture news in Marathi sugar factories should provide productions for sanitizer Maharashtra | Page 2 ||| Agrowon

साखर कारखान्यांनी सॅनेटायझरसाठी उत्पादन करावे : केंद्र सरकार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 मार्च 2020

सॅनेटायझरसाठी इथेनॉलचा वापर व्हावा ही मागणी मी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करत होतो. याबद्दल सरकारकडे पाठपुरावा केला होता. याबाबत तातडीने सरकारने अध्यादेश काढत सॅनेटायझर करता इथेनॉल वापरता येईल तसेच डिस्टलरी असलेल्या कारखान्यांनादेखील सॅनेटायझर उत्पादन करण्यास सरकारने मुभा दिली आहे.
- योगेश पांडे, साखर उद्योग अभ्यासक

 कोल्हापूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सॅनेटायझरची कमतरता असल्याचे लक्षात घेऊन कारखान्यांनी सॅनेटायझर तयार करण्यासाठी लागणाऱ्या इथिल अल्कोहोल, एक्सट्रा न्यूट्रल अल्कोहोल, इथेनॉलचा वाजवी दरात पुरवठा करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. यासाठी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन, ऑल इंडिया डिस्टलरीज असोसिएशनने प्रयत्न करावेत, असे आदेशात म्हटले आहे. याबाबतचे वृत्त ‘ॲग्रोवन’ने प्रसिद्ध केले होते.

केंद्र शासनाच्या आदेशाचा संदर्भ घेऊन साखर आयुक्त सौरव राव यांनीही याबाबतचा आदेश कारखान्यांना दिला आहे. यात म्हटले आहे, की हॅन्ड सॅनेटायझरचा काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र शासनाने १९ मार्चला अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ मधील कलम ३ च्या उपकलम २(क) मध्ये सुधारणा करून अल्कोहोलचे उत्पादन, दर्गा, वितरण, किंमत आणि आनुषंगिक बाबी यामध्ये नियंत्रण प्रस्थापित केलेले आहे. 

केंद्र शासनाकडील ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडील नोटिफिकेशननुसार इथिल अल्कोहोल, एक्सट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ENA), इथेनॉल या घटकांचा अत्यावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे. या कायद्यातील बदलामुळे इथिल अल्कोहोल, एक्सट्रा न्युट्रल अल्कोहोल (ENA), प्रथेनॉल यांच्या किमती ५ मार्च २०२० च्या विक्री किमतीच्या पातळीवर आणण्यात आलेल्या आहेत. सदर किमती ३० जूनपर्यंत ५ मार्चच्या किमतीच्या पातळीवर ठेवण्यात आलेल्या आहेत.

ज्या साखर कारखान्यांमध्ये (खासगी/सहकारी) आसवनी प्रकल्पामधून इथिल अल्कोहोल, एक्सट्रा न्यूट्रल अल्कोहोल (ENA), इथेनॉल यांचे उत्पादन घेतले जाते, त्या सर्व साखर कारखान्यांनी वरील उत्पादने विकताना १९ मार्च रोजी अत्यावश्यक वस्तू कायद्यामधील झालेल्या बदलानुसार ५ मार्च रोजीच्या किमती विचारात घ्याव्यात आणि त्याप्रमाणे त्यांची विक्री करावी, अन्यथा उपरोक्त कायद्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील साखर उद्योगाकडे हे घटक उपलब्ध असून सॅनेटायझर निर्मितीस त्वरित प्राधान्य दिल्यास मोठ्या प्रमाणात देशातील जनतेला दिलासा मिळणार आहे. कोरोना विषाणूचे संकट विचारात घेऊन आसवनी प्रकल्प असणाऱ्या कारखान्यांनी हॅन्ड सॅनेटायझरचे उत्पादन आवश्यक त्या परवानग्या घेऊन केल्यास सामाजिक बांधिलकी निभावल्याचे आणि राष्ट्रीय कर्तव्यामध्ये सहभागी झाल्याचे समाधान मिळू शकेल. 

 उपरोक्त सर्व साखर कारखान्यांनी आसवनी प्रकल्पातून हॅन्ड सॅनेटायझरसाठी आवश्यक इथिल अल्कोहोल, एक्सट्रा न्यूट्रल अल्कोहोल, (ENA), इथेनॉलचा पुरवठा सहज व त्वरित उपलब्ध होईल, तसेच त्या उत्पादनांचा दर्जा आणि किंमत उपरोक्त कायद्यातील बदलाप्रमाणे राहील याची दक्षता घ्यावी, असे साखर आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.


इतर अॅग्रो विशेष
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...