Agriculture news in marathi Sugar factories in Solapur district will be provide sanitizer across the country | Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे सॅनिटायझर जाणार देशभर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

सध्या सॅनिटायझरचे उत्पादन सुरु आहे. प्रतिदिन क्षमता दहा हजार लिटर आहे. शासनाने सूचना केल्यानुसार यासाठीच्या परवानग्या तातडीने देण्यात आल्या. त्यानुसार गतीने उत्पादन करत आहोत. बाजारातील अन्य सॅनिटायझरपेक्षा याच्या किंमती सामान्यांना परवडतील, अशा असतील. 
- सचिन जाधव, सिईओ, जकराया शुगर, वटवटे, ता.मोहोळ 

सोलापूर : कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या स्वच्छतेला अधिक महत्व आले आहे. परिणामी, सॅनिटायझरची मागणी सर्वाधिक वाढली आहे. पण, एकाचवेळी मागणी वाढल्याने मागणी आणि पुरवठ्यात मोठी तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने केलेल्या आवाहनानुसार सोलापुरातील साखर कारखान्यांनी पुढाकार घेत सॅनिटायझरचे उत्पादन सुरु केले आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक १० साखर कारखान्यांनी सॅनिटायझरच्या प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात केली आहे. सध्या प्रतिदिन तीन लाख लिटरचे उत्पादन सुरु आहे. येत्या पंधरवड्यात या सॅनिटायझरचा राज्यासह देशाच्या मार्केटमध्ये पुरवठा होणार आहे. 

‘कोरोना’च्या संकटावर मात करण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत. पण, त्यावर काहीच पर्याय नाही. वैयक्तिक स्वच्छता पाळणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, हेच प्राथमिक उपाय सध्या तरी आहेत. त्यामुळे सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. शासनाने इथेनॅाल प्रकल्प असणाऱ्या साखर कारखान्यांना सॅनिटायझर निर्मितीसाठी आवाहन केले होते. 

जिल्ह्यातील इथेनॅाल प्रकल्प असणाऱ्या आणि बॅाटलिंग करण्याची सोय असणाऱ्या कारखान्यांना त्यासाठी प्राधान्याने परवाने दिले आहेत. त्यानुसार दहा साखर कारखान्यांनी तयारी दाखवत, प्रत्यक्ष उत्पदनासही सुरुवात केली आहे. त्यात माळशिरस तालुक्यातील ब्रिमासागर, पांडुरंग साखर कारखाना, श्रीपूर, लोकमंगल शुगर- बीबीदारफळ, जकराया शुगर- वटवटे, विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना- पिंपळनेर, श्री विठ्ठल शुगर- म्हैसगाव, फॅबटेक शुगर-मंगळवेढा, युटोपियन शुगर-मंगळवेढा आणि टेंभुर्णीतील खंडोबा डिस्टिलरी आणि सोलापुरातील लक्ष्मी डिस्टिलरी प्रकल्प या कारखान्यांचा समावेश आहे. 

पंधरवड्यात मार्केटमध्ये येणार 

येत्या ३० जूनपर्यंत या कारखान्यांना सॅनिटायझर निर्मितीसाठी परवानगी दिली आहे. या सर्व व्यवस्थेवर शासनाच्या औषध प्रशासनाचे नियंत्रण आहे. बंगळूर, दिल्ली, मुंबई, कोलकत्ता यासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये औषधे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांद्वारे त्याचे वितरण होईल. ‘लॅाकडाऊन’चा कालावाधी पूर्ण होण्याआधी अधिकाधिक सॅनिटायझर उत्पादन पूर्ण करण्याची सूचना कारखान्यांना केली आहे. त्यानुसार उत्पादन वेगाने सुरु आहे. ५० मिली, १००, ५०० ते १००० मिलि या प्रमाणात त्याचे बॅाटलिंग होते आहे. पुढच्या पंधरवड्यापर्यंत हे सॅनिटायझर ग्राहकांना उपलब्ध होईल, असे नियोजन आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...