agriculture news in Marathi, sugar has demand in international market, Maharashtra | Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला मागणी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 मे 2019

कोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना येणाऱ्या काळात दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. आंतराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर स्थानिक दरापेक्षा कमी असले तरी जगभरातील खरेदीदारांनी साखरेची खरेदी वेगाने सुरू केली आहे. परिणामी, निर्यात साखरेच्या दरात क्विंटलला शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ झाली आहे. याचा सकारात्मक परिणाम भारतातील साखरेवर होणार आहे.

कोल्हापूर: निर्यातीच्या बाबतीत पिछाडलेल्या राज्यातील साखर कारखान्यांना येणाऱ्या काळात दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. आंतराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर स्थानिक दरापेक्षा कमी असले तरी जगभरातील खरेदीदारांनी साखरेची खरेदी वेगाने सुरू केली आहे. परिणामी, निर्यात साखरेच्या दरात क्विंटलला शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ झाली आहे. याचा सकारात्मक परिणाम भारतातील साखरेवर होणार आहे.

जागतिक बाजारपेठेत रिफायनरी साखरेच्या तुलनेत इंडियन व्हाईट शुगरला चांगला दर मिळत असल्याने आगामी काळात कारखान्यांना जास्तीत जास्त साखर निर्यात करण्याची संधी आहे. देशातील साखर कारखान्यांनी पुरेशी साखर निर्यात न केल्याने केंद्र त्यांच्यावर कारवाई करण्याच्या पवित्र्यात आहे. या पार्श्‍वभूमीवर कारखान्यांना निर्यात करण्याची ही चांगली वेळ असल्याचे निर्यातदारसूत्रांनी सांगितले.

राज्यातून एप्रिलच्या अखेरपर्यंत दहा लाख टनांहून अधिक साखरेची निर्यात झाली. परंतु, दर कमी असल्याने अनेक कारखाने हंगामाच्या पहिल्या टप्यात दिलेल्या कोट्यानुसार साखरेची निर्यात करू शकले नाहीत. काहींनी कच्ची साखर सुरवातीच्या टप्प्यात निर्यात केली आहे. त्यांचे अनुदान अद्याप कारखान्यांना मिळाले नाही. अनुदान वेळेत मिळत नसल्याने कारखाने निर्यातीसाठी चालढकल करीत आहेत. परंतु, भविष्यातील फायद्यासाठी सध्या वाढलेल्या दरात साखर कारखाने निर्यातीला प्राधान्य देऊ शकतात, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

भविष्यातील गरज ओळखून खरेदीदारांची पसंती
आंतराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर स्थानिक बाजारापेक्षा कमीच आहेत. पण, तरीही जगभरातील देशांची मागणी पुरविण्यासाठी तेथील अंदाज घेऊन आंतराष्ट्रीय बाजारात खरेदीदारांनी साखरेच्या खरेदीला पसंती देण्यास सुरवात केली आहे. सुरवातीच्या टप्‍प्यात ज्या साखर कारखान्यांनी साखर निर्यात केली त्या वेळी त्यांना क्विंटलला १९०० ते २००० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. आता हा दर २१५० ते २२०० रुपयांपर्यंत गेला आहे. खरेदीदारांनी चढ्या भावात साखर खरेदी करण्यास सुरवात केल्याने याचा फायदा कारखान्यांना होऊ शकेल, असे निर्यातदारांचे म्हणणे आहे.

अशी आहे राज्यातील साखर स्थिती (टन)

  • यंदाचा हंगाम सुरू होण्याअगोदर शिल्लक साखरः ५३ लाख
  • यंदा उत्पादित झालेली साखरः १०७ लाख
  • शिल्लक व तयार मिळून साखरः १६० लाख
  • यंदाची विक्री (स्थानिक व निर्यात)ः ६० लाख
  • शिल्लक साखरः १०० लाख

इतर अॅग्रो विशेष
खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी,...मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
अपरिपक्व कांदा आवकेचा दरवाढीवर परिणामनवी दिल्ली: उन्हाळी आणि खरीप कांदा उत्पानातील...
भांडवली शेतीचा विळखा बघता बघता हरितक्रांतीला पन्नास वर्षे झाली. तसे,...
पशुखाद्य : नियोजन अन् नियंत्रणमहाराष्ट्रात २०१२ च्या दुष्काळापासून दुग्ध...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...
धानासाठी क्विंटलला पाचशे रुपये अनुदानमुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा...
‘पीजीआर’ला मान्यतेचा मार्ग मोकळापुणे ः देशभरात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या बिगर...
इथेनॉलसाठी मान्यता; पण प्रकल्पांसाठी...पुणे  : थेट साखरेपासून इथेनॉल तयार करण्यास...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून पपईत मिळवली ओळखनंदुरबार जिल्ह्यात धमडाई येथील सुभाष व प्रनील या...
उद्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे...
परिश्रमपूर्वक व्यवस्थापनातून...पुणे जिल्ह्यातील रिहे येथील सुनील शिंदे...
किरकोळ व्यापाऱ्यांकरिता कांदासाठा...मुंबई ः देशात कांद्याचे उत्पादन घटल्याने...
सर्वाधिक दर मोजक्याच कांद्यालानगर ः वाढलेल्या कांदादराचा गेल्या महिनाभरापासून...