साखर कारखानदारांची आज कोल्हापुरात बैठक

साखर कारखानदारांची आज कोल्हापुरात बैठक
साखर कारखानदारांची आज कोल्हापुरात बैठक

कोल्हापूर : शेतकऱ्यांची शेकडो कोटी रुपयांची देणी थकल्याने यातून मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील कारखानदारांची आज (शुक्रवार, ता.२१) बैठक होत आहे. पहिला हप्ता नेमका कितीला द्यायचा याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. साखरेच्या दरात घसरण, राज्य बँकेने मूल्यांकनात घट केल्याने साखर कारखान्यांनी अद्याप एकही बिल काढले नाही यामुळे हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही नाही. यामुळे ऊस उत्पादकांत असंतोष आहे. साखर विक्री होत नसल्याचे कारण देत कारखान्यानी एफआरपी देण्यास असमर्थता दाखवली आहे.  जिल्ह्यातील साखर कारखान्याचा साखर उतारा पाहिल्यास एफआरपी ३००० रुपयांच्या आसपास जाते. पण सद्यःस्थितीत इतकी रक्कम उत्पादकांना देणे अशक्य असल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. यामुळे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत नेमका किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास कारखाने राजी होतात याकडेच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.  सद्यःस्थितीत तरी एक रकमी एफआरपी अशक्यच असल्याचे कारखानदारांनी सांगितले आहे. या निर्णयावरच सांगली जिल्ह्यातील कारखाने पहिल्या हप्त्याबाबत निर्णय घेतील अशी शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com