agriculture news in Marathi, sugar industry happy for sugar value up, Maharashtra | Agrowon

किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात समाधान

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

साखरेचे विक्री मूल्य वाढविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय दिलासादायक असला तरी तो उशिराने झाला आला आहे. या निर्णयाने थोडा लाभ होणार असला तरी किमान विक्री मूल्य ३५०० रुपये झाल्यावरच साखर कारखान्यांना चांगला लाभ होऊ शकेल.
- आमदार दिलीप वळसे पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर संघ

कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९०० वरून ३१०० रुपये करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्यानंतर साखर उद्योगातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी सायंकाळी केंद्राचे सहसचिव सुरेशकुमार वशिष्ठ यांनी किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्याचे आदेश काढले. साखरेला उठाव नसला तरी बॅंकांकडून साखरेवर मिळणाऱ्या उचलीत या निर्णयाने वाढ होणार आहे. 

साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या साखरेला उठाव नाही. निर्यातीची प्रक्रिया धीम्यागतीने सुरू आहे. साखरेचे किमान विक्री मूल्य २९०० रुपयेच केल्याने एफआरपी व साखरेची मिळणारी किंमत यांत चारशे ते पाचशे रुपयांची तूट येत होती. तो भुर्दंड कारखान्यांवर बसत होता. काही कारखान्यांनी २९०० रुपये दराने साखरेची विक्री केली आहे. यापुढील काळात तरी विक्री होणाऱ्या साखरेचे कमीत कमी विक्रीचे दर ३१०० रहातील. ज्या कारखान्यांनी अद्याप साखर विक्री केली नाही असे कारखाने जास्तीत जास्त प्रमाणात साखर विक्रीस काढतील, परिणामी प्रत्येक क्विंटलमागे २०० रुपयांची वाढ कारखान्यांना मिळेल. 

मात्र, पूर्ण हंगामाचा विचार केल्यास ही दरवाढसुद्धा अपुरीच ठरत असल्याचे कारखानांच्या सूत्रांनी सांगितले. परंतु जो तोटा शंभर टक्के सहन करावा लागत होता. तो घटून पन्नास टक्क्यांपर्यंत नक्की येईल, असा अंदाज साखर तज्ज्ञांनी व्यक्त केला. दरम्यान, साखर निर्यातीसह बफर स्टॉक, वाहतुकीसाठी केंद्र शासनाकडून मिळणारे अनुदान वगळून उर्वरित एफआरपी एकरकमी देण्याचा निर्णय शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा बॅंकेत झालेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत घेण्यात आला. साखरेचा वाढलेले किमान विक्री मूल्य आणि विविध माध्यमांतून मिळणारे २०० रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय यामुळे या उद्योगाला दिलासा मिळाला आहे. 

उचलीत वाढ होणार
सद्यःस्थितीत बॅंकांकडून २९०० रुपयांवर ९० टक्‍क्‍यांप्रमाणे प्रतिक्विंटल २६१० रुपये उचल मिळत होती. त्यातून तोडणी- ओढणी, कर्जाचे हप्ते व प्रक्रिया खर्च वजा जाता उसासाठी केवळ १७०० ते १८०० रुपयेच मिळत होते. आता विक्री मूल्य २०० रुपये वाढल्याने किमान १५० रुपये जादा उचल मिळण्याची शक्‍यता आहे. 


इतर अॅग्रो विशेष
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...
मध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...
मराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...
'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...
टोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...
सव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...
टोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...
उष्णतेच्या लाटेने पिके होरपळलीपुणे : राज्यात मराठवाडा, विदर्भासह खानदेशात...
संसर्गाचे थैमान, महाराष्ट्र, तामिळनाडू...नवी दिल्ली : जगातील अन्य देशांसोबतच भारतातही...
सहकारी क्षेत्रातील दुग्ध उद्योगांसमोर...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
दूध रूपांतर योजनेचे १०० कोटी थकले पुणे: राज्यातील अतिरिक्त दुधाचे खरेदी करून भुकटी...
मॉन्सूनसाठी तयार होतेय पोषकस्थिती...पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...
राज्यात उन्हाच्या झळा असह्य पुणे: सुर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा चटका...
नियमित कर्जदारांना द्या ५० हजाराचे...गोंदिया ः कोरोनामुळे प्रभावीत शेतीक्षेत्राला...
शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा...मुंबईः राज्यात  ५० हजार उद्योग सुरु झाले....