साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’ अदा 

राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२ टक्के एफआरपी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. १९० पैकी १०२ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.
Sugar Factory
Sugar Factory

कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२ टक्के एफआरपी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. १९० पैकी १०२ साखर कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. २२२९३ कोटी पैकी २०५९९ कोटी रुपये ऊस उत्पादकांना कारखान्यांनी दिले. अद्याप १६९३ कोटी रुपये शेतकऱ्यांना कारखान्यांना थकीत आहेत.  राज्यातील साखर हंगाम गतीने अंतिम टप्यात येत आहे. ५ मेअखेरच्या अहवालानुसार राज्यात १००९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. १०.४९ च्या सरासरी उताऱ्याने १०५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. १९० पैकी १७५ कारखाने बंद झाले आहेत. अद्याप १५ साखर कारखाने सुरू आहेत. कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, अमरावती, नागपूर आदी विभागांतील पूर्ण हंगाम संपुष्टात आला आहे. अद्याप पुणे विभागातील ३१ पैकी २८ कारखाने बंद झाले आहेत. नगर विभागातील २६ पैकी १९ कारखाने बंद झाले आहेत.  औरंगाबाद जिल्ह्यातील २२ पैकी १७ कारखाने बंद झाले आहेत. अंतिम टप्यात मजुरांच्या अडचणीमुळे उर्वरित पुणे, नगर, औरंगाबाद विभागातील कारखान्यांची ऊस तोड धीम्या गतीने सुरू आहे. ३१ मेअखेर उर्वरित विभागातील गळीत हंगाम पूर्ण आटोपण्याची शक्यता साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी व्यक्त केली.  ऑक्सिजन निर्मितीला गती  ऊस हंगाम संपल्यानंतर कारखान्याचे व्यवस्थापन थोडे निवांत होते. पण यंदाच्या हंगामाचा शेवट जवळ आलेला असताना ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी कारखान्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रावर ऑक्सिजन निर्मितीसाठी कामे सुरू करण्यात आली आहेत. राज्यातील सुमारे २५ कारखाने प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत. तर इतर कारखाने याबाबतची यंत्रसामग्री बाहेरून मागवून ऑक्सिजन तयार करण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत.  यंदाच्या हंगामातील स्थिती (३० एप्रिलअखेर)  एकूण गाळप ः ९९७ लाख टन  देय एफआरपी ः २२२९३ कोटी  दिलेली रक्कम ः २०६१७ कोटी  शिल्लक रक्कम ः १६९३ कोटी  १०० टक्के एफआरपी दिलेले कारखाने ः १०२  ८० ते ९९ टक्के एफआरपी दिलेले कारखाने ः ३९  ६० ते ७९ टक्के एफआरपी दिलेले कारखाने ः ३०  ० ते ५९ टक्के एफआरपी दिलेले कारखाने ः १९  आरआरसी नोटीस दिलेले कारखाने ः १९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com