agriculture news in Marathi sugar industry will established 25 oxygen projects Maharashtra | Agrowon

साखर उद्योगाकडून २५ ऑक्सिजन प्रकल्प

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 मे 2021

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भयावह साथीचा सामना करण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आहे. 

पुणेः कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भयावह साथीचा सामना करण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आहे. साखर उद्योगाकडून ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प २५ प्रकल्प उभारले जात असून ६०० नग ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करण्यात आली आहेत. 

कोविड १९ ची साथ ही एखाद्या त्सुनामीच्या महाभयंकर लाटेसारखी आदळली आहे. ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू हे शासन व समाजासाठी लज्जास्पद आहेत. त्यामुळे सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पहिल्या टप्प्यात साखर उद्योगाने ऑक्सिजन प्रकल्प निर्मितीत ५० लाख रुपये खर्च केले आहेत. कारखान्यांनी यापूर्वी सॅनिटायझर निर्मितीत पुढाकार घेतला होता. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ऑक्सिजनच्या समस्येवरील उपाय साखर कारखान्यांच्या लक्षात आणून दिला. काही राज्यात साखर कारखान्यांचे मोठे जाळे असल्यामुळे कारखान्यांनी थेट ऑक्सिजन निर्मितीत तातडीने उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे श्री. पवार स्वतः शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झालेले असताना ऑक्सिजन निर्मितीच्या संकल्पनेचा ते सातत्याने पाठपुरावा करीत होते. याविषयावर ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख कमालीचे परिश्रम घेत आहेत. 

श्री. पवार यांनी केलेल्या सूचनेनंतर ‘व्हीएसआय’सह महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ तसेच वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशनने (विस्मा) नियोजनाला सुरूवात केली. ‘विस्मा’ने थेट राज्यातील नव्हे तर परराज्यातील कारखान्यांनाही आवाहन करीत, ‘एका कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीचा किमान एक प्रकल्प उभारावा; तसेच २५ छोटे कॉन्सन्ट्रेटर मशिन देखील खरेदी करावेत,’ असे सुचविले आहे. 

देशभर विविध उद्योग व व्यावसायिक संघटना असल्या तरी ऑक्सिजन निर्मितीमध्ये सरकारी यंत्रणेला सामुहिक पद्धतीने मोठे पाठबळ देण्यासाठी धडपड करणारा उद्योग म्हणून साखर उद्योगाचा उल्लेख यानिमित्ताने होतो आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 
--------------- 
चौकट 
उपकरणे आयातीचाही निर्णय 
राज्यातील २५ कारखान्यांनी ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी उपकरणे आयातीचा निर्णय देखील घेतला आहे. ‘‘आयात होणाऱ्या उपकरणांमुळे प्रत्येक प्रकल्पांमधून दिवसाकाठी ऑक्सिजनचे ९० ते १०० सिलिंडर प्राप्त होतील. त्याचा पुरवठा कारखान्याच्या क्षेत्रातील सरकारी व खासगी इस्पितळांना माफक दरात करण्यात येईल. राज्यातील ग्रामीण व निमशहरी भागाला या उपक्रमाचा चांगला लाभ होईल,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 
-------------- 
प्रतिक्रिया 
‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार यांना ही संकल्पना सूचल्यावर ‘हे आपल्याला करायचेच आहे’ अशा शब्दात त्यांनी मला दोन आठवड्यापूर्वीच निर्धारपूर्वक सांगितले. त्यामुळे आम्ही याबाबत सलग तीन बैठका घेतल्या. कंपन्या, कारखाने, शास्त्रज्ञ यांची जुळवाजुळव केली. यातून अनेक कारखान्यांनी प्रकल्पाच्या ऑर्डर देखील दिल्या आहेत. प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मितीसाठी ‘व्हीएसआय’च्या मार्गदर्शनाखाली साखर उद्योग परिश्रम घेतो आहे. 
- शिवाजीराव देशमुख, महासंचालक, ‘व्हीएसआय’ 
-------------- 
ऑक्सिजन तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील हजारो रुग्णांचे हाल होत आहेत. अशा आणीबाणीच्या स्थितीत साखर उद्योग स्वस्थ बसू शकत नव्हता. साखर उद्योगाला ऑक्सिजन निर्मितीत तातडीने उतरण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. हे आव्हान पेलण्यासाठी खासगी कारखाने देखील आपआपल्या पातळीवर 
तयारीला लागले आहेत. 
- बी.बी.ठोंबर, अध्यक्ष, ‘विस्मा’ 
------------ 
ऑक्सिजन निर्मितीची संकल्पना सर्व साखर कारखान्यांनी गांभिर्याने विचारात घेतली आहे. प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींचे तपशील गोळा करून उपकरणांचे प्रकार व किमतीची माहिती साखर संघाने राज्यातील कारखान्यांना कळविली देखील आहे. 
- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, साखर संघ 


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...