agriculture news in Marathi sugar industry will established 25 oxygen projects Maharashtra | Agrowon

साखर उद्योगाकडून २५ ऑक्सिजन प्रकल्प

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 मे 2021

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भयावह साथीचा सामना करण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आहे. 

पुणेः कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या भयावह साथीचा सामना करण्यासाठी राज्यातील साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला आहे. साखर उद्योगाकडून ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प २५ प्रकल्प उभारले जात असून ६०० नग ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी करण्यात आली आहेत. 

कोविड १९ ची साथ ही एखाद्या त्सुनामीच्या महाभयंकर लाटेसारखी आदळली आहे. ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू हे शासन व समाजासाठी लज्जास्पद आहेत. त्यामुळे सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पहिल्या टप्प्यात साखर उद्योगाने ऑक्सिजन प्रकल्प निर्मितीत ५० लाख रुपये खर्च केले आहेत. कारखान्यांनी यापूर्वी सॅनिटायझर निर्मितीत पुढाकार घेतला होता. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हीएसआय) अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ऑक्सिजनच्या समस्येवरील उपाय साखर कारखान्यांच्या लक्षात आणून दिला. काही राज्यात साखर कारखान्यांचे मोठे जाळे असल्यामुळे कारखान्यांनी थेट ऑक्सिजन निर्मितीत तातडीने उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे श्री. पवार स्वतः शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झालेले असताना ऑक्सिजन निर्मितीच्या संकल्पनेचा ते सातत्याने पाठपुरावा करीत होते. याविषयावर ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख कमालीचे परिश्रम घेत आहेत. 

श्री. पवार यांनी केलेल्या सूचनेनंतर ‘व्हीएसआय’सह महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाने संघ तसेच वेस्ट इंडियन शुगर मिल्स् असोसिएशनने (विस्मा) नियोजनाला सुरूवात केली. ‘विस्मा’ने थेट राज्यातील नव्हे तर परराज्यातील कारखान्यांनाही आवाहन करीत, ‘एका कारखान्याने ऑक्सिजन निर्मितीचा किमान एक प्रकल्प उभारावा; तसेच २५ छोटे कॉन्सन्ट्रेटर मशिन देखील खरेदी करावेत,’ असे सुचविले आहे. 

देशभर विविध उद्योग व व्यावसायिक संघटना असल्या तरी ऑक्सिजन निर्मितीमध्ये सरकारी यंत्रणेला सामुहिक पद्धतीने मोठे पाठबळ देण्यासाठी धडपड करणारा उद्योग म्हणून साखर उद्योगाचा उल्लेख यानिमित्ताने होतो आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 
--------------- 
चौकट 
उपकरणे आयातीचाही निर्णय 
राज्यातील २५ कारखान्यांनी ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासाठी उपकरणे आयातीचा निर्णय देखील घेतला आहे. ‘‘आयात होणाऱ्या उपकरणांमुळे प्रत्येक प्रकल्पांमधून दिवसाकाठी ऑक्सिजनचे ९० ते १०० सिलिंडर प्राप्त होतील. त्याचा पुरवठा कारखान्याच्या क्षेत्रातील सरकारी व खासगी इस्पितळांना माफक दरात करण्यात येईल. राज्यातील ग्रामीण व निमशहरी भागाला या उपक्रमाचा चांगला लाभ होईल,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 
-------------- 
प्रतिक्रिया 
‘व्हीएसआय’चे अध्यक्ष शरद पवार यांना ही संकल्पना सूचल्यावर ‘हे आपल्याला करायचेच आहे’ अशा शब्दात त्यांनी मला दोन आठवड्यापूर्वीच निर्धारपूर्वक सांगितले. त्यामुळे आम्ही याबाबत सलग तीन बैठका घेतल्या. कंपन्या, कारखाने, शास्त्रज्ञ यांची जुळवाजुळव केली. यातून अनेक कारखान्यांनी प्रकल्पाच्या ऑर्डर देखील दिल्या आहेत. प्रत्यक्ष ऑक्सिजन निर्मितीसाठी ‘व्हीएसआय’च्या मार्गदर्शनाखाली साखर उद्योग परिश्रम घेतो आहे. 
- शिवाजीराव देशमुख, महासंचालक, ‘व्हीएसआय’ 
-------------- 
ऑक्सिजन तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील हजारो रुग्णांचे हाल होत आहेत. अशा आणीबाणीच्या स्थितीत साखर उद्योग स्वस्थ बसू शकत नव्हता. साखर उद्योगाला ऑक्सिजन निर्मितीत तातडीने उतरण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. हे आव्हान पेलण्यासाठी खासगी कारखाने देखील आपआपल्या पातळीवर 
तयारीला लागले आहेत. 
- बी.बी.ठोंबर, अध्यक्ष, ‘विस्मा’ 
------------ 
ऑक्सिजन निर्मितीची संकल्पना सर्व साखर कारखान्यांनी गांभिर्याने विचारात घेतली आहे. प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींचे तपशील गोळा करून उपकरणांचे प्रकार व किमतीची माहिती साखर संघाने राज्यातील कारखान्यांना कळविली देखील आहे. 
- संजय खताळ, व्यवस्थापकीय संचालक, साखर संघ 


इतर बातम्या
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
लातूर जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाचा कहर...निलंगा, जि. लातूर : निलंगा तालुक्यासह शिरूर...
खते, बियाणे, कीटकनाशके वेळेत देण्याचे...सोलापूर ः ‘‘जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र वाढत आहे....
रोपांचा, कलमांचा, बियाण्यांचा पुरवठा...जालना : ‘‘फळझाडांची यशस्वी लागवड करण्यासाठी...
खानदेशात पाणीसाठा ४३ टक्क्यांपर्यंतचजळगाव ः खानदेशात विविध प्रकल्पांमधील जलसाठा मिळून...
पावसाच्या तडाख्यात कांद्याचे अतोनात...नाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात पूर्वमोसमी...
सोलापुरात १५ मेपर्यंत कडक लॅाकडाउनसोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
खानदेशात अर्लीची केळी लागवड सुरूजळगाव ः खानदेशात मृग बहरातील अर्ली केळी लागवड...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ६२ हजार टन...नांदेड : आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक...
कृषी शिक्षणाच्या नवीन  धोरणासाठी समिती...नगर : राज्यातील कृषी प्रवेशप्रक्रिया व कृषी...
मराठा आरक्षण निकालाच्या  विश्‍लेषणासाठी...मुंबई :  सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी)...
दुष्काळी भागातून जमा झाली दोन कोटींची...सांगली : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील...
वाढीव पाणीपुरवठा  योजनेसाठी निधी देणारसोलापूर : ‘‘सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी...
सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर; वाहतुकीचा...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी...