आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात वाढ 

जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर प्रति टन ६० ते ८० डॉलरनी (टनास ४५०० ते ५००० रुपयांनी) वाढला आहेत.
sugar
sugar

कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर प्रति टन ६० ते ८० डॉलरनी (टनास ४५०० ते ५००० रुपयांनी) वाढला आहेत. सध्या साखरेचे दर टनास २६ हजार रुपयापर्यंत पोचले आहेत. 

साखरेचे दर वाढत असले तरी कंटेनरअभावी भारतीय साखर बाजारात पुरेशा प्रमाणात पोहोचू शकत नसल्याने त्याचा फायदा देशातील कारखान्यांना फारसा होत नसल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. यामुळे दर वाढूनही देशातील साखरेला फायदा होत नसल्याचा विरोधाभास यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. भारतीय साखर पुरेशा प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात होत नसल्याने साखरेचे भाव मागणी व पुरवठा यातील तफावतीमुळे कृत्रिमरीत्या वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पांढऱ्या साखरेची किंमत गेल्या चार वर्षांच्या तुलनेत वाढली आहे. याच बरोबर कच्या साखरेच्या दरात ही वाढ झाली आहे. ही दरवाढ कंटेनर भाडेवाढ व वाहतूक भाडेवाढ यामुळेच झाली आहे.  देशातून निर्यात गरजेची  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव वाढत असल्याने याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत साखर मागणीवर होऊ शकतो असा एक मतप्रवाह आहे. असे असले तरी सध्या तरी जास्तीत जास्त साखर देशाबाहेर जाणे हेच महत्त्वाचे असल्याचे साखर निर्यातदार सूत्रांनी सांगितले. 

साखर वाहतुकीतील अडचणी 

  • साखर कारखान्यापासून बंदरापर्यंत वहातूक करण्यासाठी मागील वर्षीपेक्षा ६० ते ७० टक्के ट्रकची उपलब्धता कमी 
  • इंधन दरवाढीमुळे साखर वाहतूक खर्चात २० ते २५ टक्के भाडेवाढ 
  • ट्रकशिवाय बंदरापर्यंत रेल्वेने साखर वाहतूक केली जाते, बंदरावर रेल्वेमधून साखर उतरवून कंटेनरमध्ये भरण्‍याच्या कामाचीही दरवाढ 
  • करोना महामारीमुळे भारतात येणारी आयात घटल्यामुळे साखरनिर्यात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कंटेनरची उपलब्धता कमी 
  • साखरेशिवाय तांदूळ व इतर अन्नधान्यांची निर्यात वाढल्याने कंटेनरची कमतरता भासत आहे. जवळपास ५० ते ७० टक्के कंटेनरची उपलब्धता कमी 
  • गेल्या वर्षीपेक्षा ३०० टक्के जास्त कंटेनरचे भाडेवाढ करण्यात आली आहे. अफगाणिस्तानला जाणाऱ्या कंटेनरचे भाडे मागील वर्षीच्या २०० डॉलरवरून ६०० डॉलर झाले आहे. 
  • प्रतिक्रिया कंटेनर भाडेवाढीबरोबरच त्यांची अनुपलब्धता ही निर्यातीसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. दर असूनही साखर बाहेर पाठवता येत नसल्याने याचा फायदा सध्या तरी देशातील साखर उद्योगाला होत नसल्याची स्थिती आहे  - अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com