agriculture news in Marathi sugar international market up Maharashtra | Page 3 ||| Agrowon

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात वाढ 

राजकुमार चौगुले
शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021

जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर प्रति टन ६० ते ८० डॉलरनी (टनास ४५०० ते ५००० रुपयांनी) वाढला आहेत.

कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यांत साखरेचे दर प्रति टन ६० ते ८० डॉलरनी (टनास ४५०० ते ५००० रुपयांनी) वाढला आहेत. सध्या साखरेचे दर टनास २६ हजार रुपयापर्यंत पोचले आहेत. 

साखरेचे दर वाढत असले तरी कंटेनरअभावी भारतीय साखर बाजारात पुरेशा प्रमाणात पोहोचू शकत नसल्याने त्याचा फायदा देशातील कारखान्यांना फारसा होत नसल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. यामुळे दर वाढूनही देशातील साखरेला फायदा होत नसल्याचा विरोधाभास यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. भारतीय साखर पुरेशा प्रमाणात आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात होत नसल्याने साखरेचे भाव मागणी व पुरवठा यातील तफावतीमुळे कृत्रिमरीत्या वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पांढऱ्या साखरेची किंमत गेल्या चार वर्षांच्या तुलनेत वाढली आहे. याच बरोबर कच्या साखरेच्या दरात ही वाढ झाली आहे. ही दरवाढ कंटेनर भाडेवाढ व वाहतूक भाडेवाढ यामुळेच झाली आहे. 

देशातून निर्यात गरजेची 
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे भाव वाढत असल्याने याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत साखर मागणीवर होऊ शकतो असा एक मतप्रवाह आहे. असे असले तरी सध्या तरी जास्तीत जास्त साखर देशाबाहेर जाणे हेच महत्त्वाचे असल्याचे साखर निर्यातदार सूत्रांनी सांगितले. 

साखर वाहतुकीतील अडचणी 

  • साखर कारखान्यापासून बंदरापर्यंत वहातूक करण्यासाठी मागील वर्षीपेक्षा ६० ते ७० टक्के ट्रकची उपलब्धता कमी 
  • इंधन दरवाढीमुळे साखर वाहतूक खर्चात २० ते २५ टक्के भाडेवाढ 
  • ट्रकशिवाय बंदरापर्यंत रेल्वेने साखर वाहतूक केली जाते, बंदरावर रेल्वेमधून साखर उतरवून कंटेनरमध्ये भरण्‍याच्या कामाचीही दरवाढ 
  • करोना महामारीमुळे भारतात येणारी आयात घटल्यामुळे साखरनिर्यात करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कंटेनरची उपलब्धता कमी 
  • साखरेशिवाय तांदूळ व इतर अन्नधान्यांची निर्यात वाढल्याने कंटेनरची कमतरता भासत आहे. जवळपास ५० ते ७० टक्के कंटेनरची उपलब्धता कमी 
  • गेल्या वर्षीपेक्षा ३०० टक्के जास्त कंटेनरचे भाडेवाढ करण्यात आली आहे. अफगाणिस्तानला जाणाऱ्या कंटेनरचे भाडे मागील वर्षीच्या २०० डॉलरवरून ६०० डॉलर झाले आहे. 

प्रतिक्रिया
कंटेनर भाडेवाढीबरोबरच त्यांची अनुपलब्धता ही निर्यातीसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. दर असूनही साखर बाहेर पाठवता येत नसल्याने याचा फायदा सध्या तरी देशातील साखर उद्योगाला होत नसल्याची स्थिती आहे 
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार 


इतर अॅग्रोमनी
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...
कापसाचा तुटवडा जाणवू लागला जळगाव : देशात सूतगिरण्यांसमोर कापूसटंचाई तयार...
देशातील हरभरा उत्पादनात घट होण्याची...नवी दिल्ली : यंदाच्या हंगामात देशातील हरभरा...
कोल्हापुरी गुळाला गुजरातेत आव्हान;...कोल्हापूर : यंदा कोल्हापुरी गुळाला गुजरातमधील...
भारतात यंदा ३६० लाख कापूस गाठींचे...मुंबई : भारतात यंदा ३६० लाख गाठींचे (१ गाठ = १७०...
प्रोजेक्ट रिपोर्ट, लायसन्ससाठी यापुढे...पुणे : केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ...
देशात तांदळाचे विक्रमी उत्पादन कोल्हापूर : देशात यंदा तांदळाचे विक्रमी उत्पादन...
बाजारात हरभराही खाणार भाव हरभरा डाळ आणि बेसनला स्नॅक्स, प्रक्रिया उद्योग,...
द्राक्ष वाइन उत्पादनात ३५ टक्के घट शक्य नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाइन उत्पादकांनी...
शेतमाल बाजारातील सुधारणा कायम राहीलवॉशिंग्टन ः शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय बाजार यंदा...
अर्जेंटिनात महागाई भडकलीब्युनॉस आयर्स ः अर्जेंटिनात शेतीमालाचे दर...
तुरीने खुल्या बाजारात ओलांडला हमीभावाचा...नगर : तुरीचे शासनाकडून हमी दराने खरेदी केली जात...
सोयाबीन पाच हजारांवरपुणे ः उत्पादनात घट, वाढलेली मागणी आणि चांगली...
तूर टप्प्‍याटप्प्याने विकण्याचे आवाहन पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात ३० टक्‍...
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात...कोल्हापूर : जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात वाढ...
शेतजमीन भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...नवी दिल्ली ः शेतजमिनी भाडेपट्ट्यावर देण्यासाठी...
‘व्हेजनेट’वर होणार ४३ पिकांची नोंदणी नागपूर ः निर्यातीसह देशांतर्गत ग्राहकांना...