agriculture news in Marathi sugar labor warning for strike Maharashtra | Page 2 ||| Agrowon

साखर कामगारांचा संपाचा इशारा  

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

गळीत हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी असतानाच राज्यातील साखर कामगाारांच्या वेतनवाढीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी बाकी असतानाच राज्यातील साखर कामगाारांच्या वेतनवाढीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेतनवाढ कराराची मुदत संपून दीड वर्ष झाले तरी अद्याप शासनाने त्रिपक्षीय समिती स्थापन केली नाही. त्यामुळे शासन व कारखानदारांनी वेळीच लक्ष घातले नाही तर राज्यातील सुमारे दीड लाख साखर कामगार संपावर जातील, अशी माहिती राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिली.

राज्यातील साखर कामगार प्रश्नाविषयी शासनाचे उदासीन धोरण आणि साखर कारखानदारांचे दुर्लक्ष याबाबत राज्यातील साखर कामगार प्रतिनिधी मंडळाची बैठक वाळवा तालुक्यातील कासेगाव (जि. सांगली) येथे नुकतीच झाली. या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष रावसाहेब पाटील, सरचिटणीस शंकरराव भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र तावरे, खजिनदार रावसाहेब भोसले, युवराज रणनवरे, नितीन बेळकुडे, अशोक बिराजदार, डी.बी. मोहिते, सयाजीराव कदम, संजय मोरबाळे, प्रदीप शिंदे, कैलास आवळे, प्रदीप बनगे आदी उपस्थित होते.

श्री. काळे म्हणाले, की केंद्र सरकारने कामगार कायद्यात बदल करून कामगार विरोधी धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे गळीत हंगामापूर्वी साखर कामगार संघटितपणे सरकार व कारखानदारांच्या विरोधात भूमिका घेत असून संपावर जाण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत.शासनाने साखर उद्योगासाठी स्टेपिंग पॅटर्न (कामगार संख्यादुवा) तयार केला आहे. तो कामगारांना मान्य नाही. याबाबत स्थानिक युनियनने त्याला विरोध करावा, अशी संघटनेची भूमिका आहे.

राज्यातील १९० साखर कारखान्यामधील दीड लाख कामगार संपावर गेले तर गळीत हंगामातील परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पगाराच्या तरतुदीसाठी प्रति पोते शंभर रुपयांचे टॅगिंग होते. सध्या प्रतिपोते २५० रूपये टॅगिंग असताना सुद्धा पगाराचे थकीत आहेत. साखर उद्योगासाठी गेल्या दहा वर्षापूर्वीचे व्यवस्थापक कामगारांकडे लक्ष देत होते. सध्याचे व्यवस्थापन कोणत्याही बाबी समजून घेत नाही. याविषयी कामगार प्रतिनिधी मंडळाच्या बैठकीत खंत व्यक्त केली आहे.

या मुद्द्यांवर झाली चर्चा
गेली १७ महिने रखडलेली ञिपक्ष समिती, नविन पगार वाढ, थकित वेतन, कामगार पॅटर्नला प्रतिनिधी मंडळाने केलेला विरोध, कोरोना आजाराने राज्यातील साखर कामगारांची व त्यांच्या कुटुंबाची चाललेली ओढाताण, रिटायर कामगारांची तुटपुंजी पेन्शन, रोजंदारी, बदली, कंञाटी, सिव्हिल कामगारांना किमान वेतनाचा अभाव, केंद्र सरकारने कामगार विरोधी केलेले कायदे या सर्व बाबींची या वेळी चर्चा झाली.

प्रतिक्रिया
साखर कामगार वेतनवाढ, थकीत पगार, कामगार विरोधी धोरण अशा अनेक प्रश्नांमध्ये भरकटत चालला आहे. शासनाने ह्या गोष्टींचा विचार करून साखर कामगारांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, अशी अपेक्षा आहे.
- तात्यासाहेब काळे, अध्यक्ष, राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ
 


इतर अॅग्रो विशेष
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
कोरोनामुळे वाढल्या कृषी व्यापार संधीचीनच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची...
कृषी ‘समृद्धी’चा मार्गबाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत...
अकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...
सोशल मिडीयावर ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडनांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर...
`समृद्धी`वर उभारणार गोदामे, शीतगृहे पुणेः मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना शेतमाल...
पुण्यातील फूल बाजाराच्या कामाला गती पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने...
राज्यात ठिकठिकणी जोरदार पाऊस पुणेः राज्यातील पावसाचा प्रभाव कमी...
केळी निर्यातीसाठी ‘बनानानेट’च्या...नागपूर: राज्यातून केळीची निर्यात वाढल्यानंतर आता...
देशातील सूतगिरण्या ९५ टक्के क्षमतेने...जळगाव ः देशातील सुमारे ७१५ सूतगिरण्या ९५ टक्के...
जिल्हानिहाय ऑनलाइन निविष्ठा परवाने वाटप...पुणे: राज्यात खते, बियाणे व कीडनाशकांच्या...
ओतूरमध्ये कांद्याला किलोला कमाल ८०...पुणे: पुणे जिल्ह्यातील जुन्नर बाजार समितीच्या...
जोरदार पावसाचा अंदाज पुणे ः राज्यात पुढील पाच ते सहा दिवस काही ठिकाणी...
राज्यांचा निर्धार नि केंद्राची माघार‘जीएसटी’ अंतर्गत राज्यांना द्यावयाच्या...
भुकेला भारतजागतिक भूक निर्देशांक-२०२० नुकताच प्रसिद्ध झाला...